वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर | |
---|---|
![]() वर्षा उसगांवकर | |
जन्म |
वर्षा उसगांवकर २८ फेब्रुवारी, १९६८ गोवा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, नाटके) |
भाषा | कोंकणी भाषा, मराठी भाषा |
प्रमुख चित्रपट |
गंमत जंमत |
वडील | अच्युत काशिनाथ उसगांवकर |
आई | माणिक उसगांवकर |
पती |
अजय शर्मा (ल. २०००) |
वर्षा उसगांवकर(जन्म : २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.
महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले. अजय शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला.[१]
वर्षा उसगांवकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता 'गंमत-जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. गंमत जंमत नंतर खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस, लपंडाव यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित 'यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी दूध का कर्ज हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात महाभारत या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषकसारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित आत्मविश्वास चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे ब्रम्हचारी हे नाटक गाजले आहे. 'वक्त', 'चौदाहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत. 500px|चौकट|मध्यवर्ती
चित्रपट कारकीर्द[संपादन]
वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांमधून अभिनयास प्रारंभ केला. त्यांनी सचिन पिळगांवकर, अशोक सराफ यांसारख्या प्रसिद्ध अभिनेेेेत्या नटांबरोबर कार्य केले आहे.
समाजकार्य[संपादन]
वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.
चित्रपट[संपादन]
- ब्रह्मचारी
मराठी चित्रपट-[संपादन]
-|हिंदी चित्रपट[संपादन]
चित्रपट | साकारलेली भूमिका | वर्ष |
---|---|---|
दिलवाले कभीना हारे |
|
|
दूध का कर्ज |
|
|
साथी | ||
हनीमून |
|
|
हफ्ता बंद |
|
|
तिरंगा |
दूरचित्रवाणी मालिका[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- मराठी तारका संकेतस्थळ Archived 2007-12-07 at the Wayback Machine.
- ^ देसाई, माधवी (२०११). गोमन्त सौदामिनी. कोल्हापूर: माणिक प्रकाशन. pp. २४१-242.