नेहा शितोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेहा शितोळे
जन्म पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी २
वडील सुनील शितोळे
आई मनीषा शितोळे
पती
नचिकेत पूर्णपात्रे (ल. २०११)

नेहा शितोळे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २०१८ साली नेहा हिने सॅक्रेड गेम्स मध्ये मिसेस काटेकर यांची भूमिका निभावली होती[१] नंतर २०१९ साली बिग बॉस मराठी २ मध्ये प्रवेश घेतला आणि तिने दुसरा क्रमांक पटकावला.[२]

सुरुवातीचे जीवन[संपादन]

नेहाचा जन्म २७ जून रोजी पुणे येथे झाला. तिने ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे येथे आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

कारकीर्द[संपादन]

नेहा हिने २०११ मध्ये देऊळ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पोपट, दिशा आणि सुर सपाटा सारख्या चित्रपटात तिने काम केले. चित्रपटांसोबतच तिने फू बाई फू, तू तिथे मी, का रे दुरावा, कुंकू यांसारख्या मालिकांमध्येसुद्धा आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर तिने नेटफ्लिक्स सीरिज सॅक्रेड गेम्स मध्ये काटेकरबाई म्हणून आपले नाव कमावले आणि त्या कामामुळे तिला बिग बॉस मराठी २ची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत तिने दुसरे स्थान पटकावले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Remember Katekar's Wife in 'Sacred Games'? Her Instagram Account is Meme Gold". News18 (इंग्रजी भाषेत). 2018-08-09. 2020-12-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Neha Shitole: Bigg Boss Marathi 2 is a great platform to showcase my personality". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-06-18. 2020-12-04 रोजी पाहिले.