ख्रिश्चन धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रोटेस्टंट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ख्रिश्चन धर्म 
एकेक्षी धर्म जे पहिल्या शतकात स्थापन झाले होते ज्यात येशू हा देवाचा पुत्र आहे असे विश्वास.
StJohnsAshfield StainedGlass GoodShepherd Portrait.jpg
प्रकार प्रमुख धार्मिक गट
उपवर्ग अब्राहमिक धर्म
याचे नावाने नामकरण
संस्थापक
स्थापना
अधिकार नियंत्रण
विकिडाटा
Blue pencil.svg

ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पॅलेस्टाईन (सध्याचा इस्रायल देश) येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेंथलेहम गावी झाला.ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून तुर्कस्तान पर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारा पर्यंत पसरले होते. पालेस्तीन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळ आली तेव्हा गालील प्रांतातील बेंथलेहम या गावी येशूचा जन्म झाला. त्या वेळी पालेस्तीन देशावर रोमन सत्ता अधिकार गाजवीत होती. सम्राट ऑगस्टस हा या साम्राज्याचा सम्राट होता. त्याने गालील प्रांताचा मांडलिक राजा म्हणून हेरोद राजाला नेमले होते. याच्याच अमदानीत येशूचा जन्म झाला. येशू (मूळ हिब्रू शब्द यहोशवा - यहोवा माझे तारण आहे.) या हिब्रू नावाचा अर्थ तारणारा असा आहे. तर ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त केलेला असा होतो. ख्रिस्तोस हा शब्द मसीहा (म्हणजे तारणारा) या हिब्रू शब्दाचे ग्रीक भाषेतील रूपांतर आहे. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या ३०व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण संपूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. यहुदी धर्मानुसार (जुना करार) पापी मानवाच्या तारणासाठी परमेश्वराने तारणारा (मूळ हिब्रू शब्द मसीहा) पाठविण्याचे अभिवचन दिले होते. जुन्या करारात या मसीहाबद्दल अनेक भविष्ये वर्तविली गेली होती. येशू हाच तारणारा (मसीहा) आहे अशी ख्रिस्ताच्या शिष्यांची खात्री झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधिकाऱ्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून तत्कालीन रोमन सत्ताधीशांच्या करवी त्याला क्रुसावर खिळवून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. असा ख्रिस्ती धर्मीयांचा विश्वास आहे. त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार केला. बायबल (जुना व नवा करार) हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. १. कॅथोलिक, २ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ३. प्रोटेस्टंट . या पंथांतही (विशेषतः प्रोटेस्टंट पंथात) प्रेस्बिटेरियन, कॅल्व्हिनिस्ट आदी अनेक उपपंथ आढळतात. [ संदर्भ हवा ]

ख्रिस्ती धर्मपंथ : ख्रिस्ती धर्मात मुखत्वे तीन धर्मपंथ आढळून येतात. १. रोमन कॅथोलिक २. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स,३. प्रोटेस्टंट. रोमन कॅथोलिक पंथ हा धर्मातील कर्मठ परंपराचे जतन करतो. रोमन कॅथोलिक पंथ रोमच्या पोपची धार्मिक सत्ता मान्य करते. हा ख्रिस्ती धर्मातील सुधारणावादी विचारांचे समर्थन करतो. रोमन कॅथोलिक पंथ आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ यांच्याशिकवणुकीत व विचारात विशेष फरक नाही. फक्त ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ हा रोमच्या पोपची सत्ता मान्य करीत नाही तर त्याऐवजी कॉनस्तंटटीनोपलची सत्ता सर्वोच्च मानतात. या पंथांच्या धार्मिक श्रद्धा, धार्मिक विधी या बाबतीत बरीच मतभिन्नता असली तरी येशू ख्रिस्ताबाबत असलेले तीन घटक सर्वांनाच मान्य आहेत. ते तीन घटक खालीलप्रमाणे :

१. ख्रिस्ताचा जीवन वृत्तांत : येशू ख्रिस्ताच्या जीवन व कार्यासंबंधी सर्वे घटनांचे संकलन करणारे वृत्तांत (चार शुभवर्तमाने - Four Gospels)

२. धर्मसिद्धांत : येशु ख्रिस्त ही एकमेव अद्वितीय व्यक्ती व परमेश्वराचा पुत्र असून त्याच्या द्वारेच मानवाला तारणप्राप्ती होऊ शकते. तो देव व मानव यांच्यातील एकमेव मध्यस्थ आहे.

३. मानवी जीवन : परमेश्वराबद्दल व आपल्या सहकाऱ्याबद्दल प्रेम बाळगून जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करतो, म्हणजेच ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती व्यक्ती प्रयत्न करते.[ संदर्भ हवा ]

आणखी उपपंथ (एकूण ४३,००० ते ५५,०००)[संपादन]

  • अँग्लिकन कम्यूनियन
  • इंडिपेन्डन्ट कॅथाॅलिकिझम
  • ओरियंट आॅर्थोडाॅक्सी
  • चर्च आॅफ द ईस्ट
  • रेस्टोरेशनिझम आणि नाॅन ट्रिनिटेरियानिझम

संदर्भ[संपादन]

पंथ-उपपंथ

विश्वास[संपादन]

ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो ईश्वर असून मनुष्य झाला, मानवतेचा रक्षक, जो तारणारा, त्यामुळे ख्रिस्ती लोक येशूला ख्रिस्त किंवा मसीहा म्हणतात.

ज्याची हिब्रू बायबल (यहुदी लोकांचे धर्मपुस्तक व ख्रिस्ती लोकांचे जुना करार)मध्ये भविष्यवाणी केली होती तोच हा येशू मसीहा आहे असा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे.[ संदर्भ हवा ]

भारतातील ख्रिश्चन[संपादन]

Nasrani cross

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात ख्रिश्चन धर्म हा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. ख्रिस्तीधर्मीय भारताच्या लोकसंख्येच्या २.३ टक्के आहेत. भारतात या धर्माचे आगमन संत थॉमस याच्या येण्यानंतर झाले. भारताच्या ४ राज्यांत ख्रिश्चन हे बहुसंख्याक आहेत.[ संदर्भ हवा ]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.