Jump to content

नोव्हाक जोकोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नोवाक जोकोविच या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हाक जोकोविच
Новак Ђоковић (सर्बियन)

२०१४ रोम मास्टर्स दरम्यान
देश सर्बिया ध्वज सर्बिया
वास्तव्य मोनॅको
जन्म २२ मे, १९८७ (1987-05-22) (वय: ३७)
बेलग्रेड, सर्बिया (तत्कालीन युगोस्लाव्हिया)
उंची १.८८ मी (६ फु २ इं)
सुरुवात इ.स. २००३
शैली उजव्या हाताने; बॅकहँड दोन्ही हातांनी
बक्षिस मिळकत १४९ दशलक्ष अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन 1124–222
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
पहिला (४ जुलै २०११)
क्रमवारीमधील सद्य स्थान पहिला (१४ जून २०२१)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००८, २०११, २०१२, २०१३, २०१५,२०१६, २०१९, २०२०, २०२१)
फ्रेंच ओपन विजयी (२०१६, २०२१)
विंबल्डन विजयी (२०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९)
यू.एस. ओपन विजयी (२०११, २०१५, २०१८)
इतर स्पर्धा
टूर फायनल्स
दुहेरी
प्रदर्शन ३१ - ४४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
११४ (३० नोव्हेंबर, इ.स. २००९)
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१५.


ऑलिंपिक पदक माहिती
सर्बियासर्बिया या देशासाठी खेळतांंना
टेनिस - पुरुष
कांस्य २००८ बीजिंग एकेरी

नोव्हाक जोकोविच (सर्बियन: Новак Ђоковић, Novak Đoković;) (२२ मे, इ.स. १९८७; बेलग्रेड, युगोस्लाव्हिया - हयात) हा एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. नोलजोकर ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२, २०१३ ,२०१५ ,२०१६, २०१९, २०२० व २०२१ साली ऑस्ट्रेलियन ओपन, २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९ साली विंबल्डन व २०११, २०१५ व २०१८ साली यू.एस. ओपन आणि २०१६ व २०२१ साली (फ्रेंच ओपन) ह्या १९ ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा आतापर्यंत जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिस खेळाडू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला डेव्हिस करंडक जिंकून देणाऱ्या संघामध्ये जोकोविच होता.

२०११ व २०१५ ही वर्षे जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरली आहेत. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना जॉन मॅकएन्रोच्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ व २०१५ ह्या दोन्ही वर्षांमध्ये त्याने प्रत्येकी ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिस खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिस खेळाडू रफायेल नदालला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील ऑस्ट्रेलियन ओपन ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले.

सर्बिया, बाल्कन तसेच भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या देशांमधील तो सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानला जातो. जोकोविचला आजवर अनेक सर्बियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत. पीट सॅम्प्रास ह्या माजी अव्वल टेनिस खेळाडूने आजवर पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जोकोविचचे वर्णन केले आहे.

जोकोविच आपल्या तडाखेबाज खेळासोबत खेळकर स्वभावासाठी देखील लोकप्रिय आहे. इतर टेनिस खेळाडूंच्या नकला करणे तसेच सामन्यादरम्यान तसेच सामना संपल्यानंतर टिवल्याबावल्या करणे इत्यादी विनोदी उद्योगात तो पारंगत आहे.

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या: १८ (१० - ८)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता २००७ यू.एस. ओपन हार्ड स्वित्झर्लंड रॉजर फेडरर ६–७(४–७), ६–७(२–७), ४–६
विजेता २००८ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड फ्रान्स जो-विल्फ्रेद सॉंगा ४–६, ६–४, ६–३, ७–६(७–२)
उप-विजेता २०१० यू.एस. ओपन (२) हार्ड स्पेन रफायेल नदाल ४–६, ७–५, ४–६, २–६
विजेता २०११ ऑस्ट्रेलियन ओपन (२) हार्ड युनायटेड किंग्डम अँडी मरे ६–४, ६–२, ६–३
विजेता २०११ विंबल्डन गवताळ स्पेन रफायेल नदाल ६–४, ६–१, १–६, ६–३
विजेता २०११ यू.एस. ओपन हार्ड स्पेन रफायेल नदाल ६–२, ६–४, ६–७(३–७), ६–१
विजेता २०१२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड स्पेन रफायेल नदाल ५-७, ६-४, ६-२, ६-७५-७, ७-५
उप-विजेता २०१२ फ्रेंच ओपन (1) मातीचे स्पेन रफायेल नदाल 4–6, 3–6, 6–2, 5–7
उप-विजेता २०१२ यू.एस. ओपन (3) हार्ड युनायटेड किंग्डम अँडी मरे 6–7(10–12), 5–7, 6–2, 6–3, 2–6
विजेता २०१३ ऑस्ट्रेलियन ओपन (4) हार्ड युनायटेड किंग्डम अँडी मरे 6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2
उप-विजेता २०१३ विंबल्डन गवताळ युनायटेड किंग्डम अँडी मरे 4–6, 5–7, 4–6
उप-विजेता २०१३ यू.एस. ओपन (4) हार्ड स्पेन रफायेल नदाल 2–6, 6–3, 4–6, 1–6
उप-विजेता २०१४ फ्रेंच ओपन (2) मातीचे स्पेन रफायेल नदाल 6–3, 5–7, 2–6, 4–6
विजेता २०१४ विंबल्डन(2) गवताळ स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–7(7–9), 6–4, 7–6(7–4), 5–7, 6–4
विजेता २०१५ ऑस्ट्रेलियन ओपन (5) हार्ड युनायटेड किंग्डम अँडी मरे 7–6(7–5), 6–7(4–7), 6–3, 6–0
उप-विजेता २०१५ फ्रेंच ओपन (3) क्ले स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका 6–4, 4–6, 3–6, 4–6
विजेता २०१५ विंबल्डन (3) गवताळ स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 7–6(7–1), 6–7(10–12), 6–4, 6–3
Winner २०१५ यू.एस. ओपन (2) Hard स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–4, 5–7, 6–4, 6–4
Winner २०१९ ऑस्टेलियन ओपन (६)एली Hard राफेल नदाल

मास्टर्स १००० एकेरी अंतिम फेऱ्या: १७ (१० - ७)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता २००७ इंडियन वेल्स हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल २–६, ५–७
विजेता २००७ मायामी हार्ड कोर्ट आर्जेन्टिना ग्वियेर्मो कॅन्यास ६–३, ६–२, ६–४
विजेता २००७ रॉजर्स कप हार्ड कोर्ट स्वित्झर्लंड रॉजर फेडरर ७–६(७–२), २–६, ७–६(७–२)
विजेता २००८ इंडियन वेल्स हार्ड कोर्ट अमेरिका मार्डी फिश ६–२, ५–७, ६–३
विजेता २००८ रोम माती स्वित्झर्लंड स्टॅनिस्लास वावरिंका ४–६, ६–३, ६–३
उप-विजेता २००८ सिनसिनाटी हार्ड कोर्ट युनायटेड किंग्डम अँडी मरे ६–७(४–७), ६–७(५–७)
उप-विजेता २००९ मायामी हार्ड कोर्ट युनायटेड किंग्डम अँडी मरे २–६, ५–७
उप-विजेता २००९ मोंटे कार्लो माती स्पेन रफायेल नदाल ३–६, ६–२, १–६
उप-विजेता २००९ रोम माती स्पेन रफायेल नदाल ६–७(२–७), २–६
उप-विजेता २००९ सिनसिनाटी (२) हार्ड कोर्ट स्वित्झर्लंड रॉजर फेडरर १–६, ५–७
विजेता २००९ पॅरिस हार्ड कोर्ट फ्रान्स गायेल मॉनफिस ६–२, ५–७, ७–६(७–३)
विजेता २०११ इंडियन वेल्स (२) हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल ४–६, ६–३, ६–२
विजेता २०११ मायामी (२) हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल ४–६, ६–३, ७–६(७–४)
विजेता २०११ माद्रिद माती स्पेन रफायेल नदाल ७–५, ६–४
विजेता २०११ रोम (२) माती स्पेन रफायेल नदाल ६–४, ६–४
विजेता २०११ रॉजर्स कप(२) हार्ड कोर्ट अमेरिका मार्डी फिश ६–२, ३–६, ६–४
उप-विजेता २०११ सिनसिनाटी(३) हार्ड कोर्ट युनायटेड किंग्डम अँडी मरे ४–६, ०–३ ret.

ऑलिंपिक पदके (१ कांस्य)

[संपादन]
निकाल क्र. तारीख स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
कांस्य १. १६ ऑगस्ट २००८ चीन बीजिंग ऑलिंपिक हार्ड कोर्ट अमेरिका जेम्स ब्लेक ६–३, ७–६(७–४)

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2012-04-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (सर्बियन भाषेत). 2010-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-05 रोजी पाहिले.
  • "नोव्हाक जोकोविच" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
मागील
स्पेन रफायेल नदाल
एटीपी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक
४ जुलै २०११ – चालू
पुढील
विद्यमान