Jump to content

रॉजर फेडरर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉजर फेडरर
पूर्ण नाव रॉजर फेडरर
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
वास्तव्य बासेल, स्वित्झर्लंड
जन्म ८ ऑगस्ट, १९८१ (1981-08-08) (वय: ४३)
बासेल, स्वित्झर्लंड
उंची १.८६ मी (६ फु १ इं)
सुरुवात १९९८
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत $१०,१६,०५,०८५
एकेरी
प्रदर्शन १०८७ - २४५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (फेब्रुवारी २, २००४)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ०३ (१५ ऑगस्ट २०१७)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००४, २००६, २००७, २०१०, २०१७)
फ्रेंच ओपन विजयी (२००९)
विंबल्डन विजयी (२००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९, २०१२)
यू.एस. ओपन विजयी (२००४, २००५, २००६, २००७, २००८)
इतर स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धा सुवर्ण (२००८) (दुहेरी)
दुहेरी
प्रदर्शन १२९ - ८९
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २४ (जून ९, इ.स. २००३)
शेवटचा बदल: सप्टेंबर २२, इ.स. २०११.


ऑलिंपिक पदक माहिती
स्वित्झर्लंडस्वित्झर्लंड या देशासाठी खेळतांंना
पुरूष टेनिस
सुवर्ण २००८ बीजिंग दुहेरी
रौप्य २०१२ लंडन एकेरी

रॉजर फेडरर (जर्मन: Roger Federer) हा स्वित्झर्लंड देशाचा एक टेनिसपटू आहे. याला ग्रिन कोर्टचा बादशहा या नावाने सुद्धा संबोधले जाते. अनेक टेनिस तज्ज्ञांच्या व क्रीडा समिक्षकांच्या मते फेडरर टेनिसच्या इतिहासातील आजतगायतचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. फेडररने आजवर सर्वाधिक (१८) एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या केवळ ७ पुरुष टेनिस खेळाडूंमध्ये फेडररचा समावेश होतो. २००४ ते २००८ दरम्यान फेडरर सलग २३७ आठवडे एटीपीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता (एकूण २८५ आठवडे). २०१२ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून त्याने जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान मिळवले. आजवर २८ ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्यांचे सामने खेळलेला फेडरर सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या किमान ५ वेळा गाठणारा टेनिस इतिहासातील एकमेव पुरुष खेळाडू आहे.

फेडररने आजवर १७ मास्टर्स टेनिस स्पर्धा (दुसऱ्या क्रमांकावर) जिंकल्या असून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने स्टॅनिस्लास वावरिंकासोबत स्वित्झर्ल्डंसाठी पुरुष दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक तर २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये एकेरी स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.

फेडररला आजवर सर्वाधिक वेळा (सलग ४ वेळा) लॉरियस वार्षिक क्रीडापटूचा खिताब मिळाला आहे. २०१२ साली आजवरचे जगातील सर्वोत्तम १०० टेनिस खेळाडू ह्या टेनिस वाहिनीने काढलेल्या यादीत फेडरर सर्वोच्च स्थानावर आहे. तसेच २०११ साली नेल्सन मंडेला ह्यांच्याखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विश्वासू व सन्माननीय व्यक्ती असा कौल फेडररला चाहत्यांनी दिला.[][] रफायेल नदालनोव्हाक जोकोविच सोबत फेडररची प्रतिस्पर्धा जगातील सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रतिस्पर्धांपैकी एक मानली जाते. रॉजर फेडरर एक ग्रेट टेनिस प्लेयर आहे.

खाजगी जीवन

[संपादन]

रॉजर फेडररचा जन्म ८ ऑगस्ट १९८१ रोजी बासेल जवळील आर्लेसहाइम येथे झाला. त्याचे वडील रॉबर्ट फेडरर हे स्विस तर आई लिनेट ड्युरांड दक्षिण आफ्रिकेत जन्मलेली डचफ्रेंच वंशाची आहे.[] रॉजर फेडरर स्वित्झर्लंड व दक्षिण आफ्रिका ह्या दोन्ही देशांचा नागरिक असून तो जर्मन, फ्रेंचइंग्लिश भाषांमध्ये निपुण आहे. लहानपणी फेडरर टेनिससोबत बॅडमिंटन, क्रिकेटबास्केटबॉल हे खेळ खेळायचा. आजही अनेक मुलाखतींमध्ये आपण क्रिकेट खेळाचे चाहते आहोत असे तो सांगतो. तो भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरला दोन वेळा भेटला आहे.

फेडररने ११ एप्रिल २००९ रोजी अनेक वर्षांची प्रेयसी मर्का हिच्यासोबत विवाह केला. मर्का ही स्वतः एक व्यावसायिक टेनिस खेळाडू असून फेडररशी तिची ओळख २००० उन्हाळी ऑलिंपिक दरम्यान झाली. २००२ साली मर्का दुखापतीमुळे टेनिसमधून निवृत्त झाली व ती फेडररसाठी काम करते. फेडरर व मर्काला दोन जुळ्या मुली व दोन जुळी मुले आहेत.

फेडरर जगातील अनेक परोपकारी संस्थांना मदत करतो. त्याने आजवर हरिकेन कत्रिना, इ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी, २०१० हैती भूकंप इत्यादी नैसर्गिक संकटपीडित लोकांना मदत करण्यासाठी प्रदर्शनीय टेनिस स्पर्धा आयोजित केल्या आहेत. २००३ साली त्याने खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी व गरीबांना मदत करण्यासाठी रॉजर फेडरर फाउंडेशनची स्थापना केली.

सध्या जगातील सर्वात विख्यात व प्रतिष्ठित लोकांच्या यादीत फेडररचा ३१ वा क्रमांक आहे.[]

कारकीर्द

[संपादन]

फेडररचे एकेरी टेनिसमधील आजवरचे प्रदर्शन अद्वितीय आहे. तो आजवर विक्रमी २४ वेळा ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्यांमध्ये पोचला आहे व १७ वेळा विजयी झाला आहे. त्याने ७ वेळा विंबल्डन, ५ वेळा यूएस ओपन, ४ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन तर एकदा फ्रेंच ओपन जिंकल्या आहेत. २००३ ते २०१० ह्या आठ वर्षांमध्ये दर वर्षी त्याने किमान एक स्पर्धा जिंकली तसेच २००४, २००६ व २००७ साली त्याने चार पैकी ३ ग्रँड स्लॅम जिंकल्या. ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये त्याने आजवर विक्रमी २४४ एकेरीचे सामने जिंकले आहेत.

ग्रँड स्लॅम एकेरीमधील प्रदर्शन

[संपादन]
स्पर्धा १९९८ १९९९ २००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९ २०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ SR वि–प विजय %
ऑस्ट्रेलियन ओपन ती फे ती फे चौ फे चौ फे वि उ फे वि वि उ फे उवि वि उ फे उ फे उ फे उ फे ती फे उ फे वि ५ / १८ ८७–१३ ८७.००
फ्रेंच ओपन प फे चौ फे उपू फे प फे प फे ति फे उ फे उवि उवि उवि वि उपू फे उवि उ फे उपू फे चौ फे उपू फे गैरहजर १ / १७ ६५–१६ ८०.२५
विंबल्डन प फे प फे उपू फे प फे वि वि वि वि वि उवि वि उपू फे उपू फे वि दु फे उवि उवि उपू फे ७ / १८ ८४–११ ८८.४२
यू.एस. ओपन ति फे चौ फे चौ फे चौ फे वि वि वि वि वि उवि उ फे उ फे उपू फे चौ फे उ फे उवि गैरहजर ५ / १६ ७८–११ ८७.६४
विजय-पराजय 0–0 0–2 7–4 13–4 6–4 13–3 22–1 24–2 27–1 26–1 24–3 26–2 20–3 20–4 19–3 13–4 19–4 18–4 10–2 7–0 18 / 69 314–51 86.03
प फे - पहिली फेरी, दु फे - दुसरी फेरी, ति फे - तिसरी फेरी, चौ फे - चौथी फेरी
उपू फे - उपांत्यपूर्व फेरी, उ फे - उपांत्य फेरी, उवि - उप-विजयी, वि - विजेता

अंतिम फेऱ्या: २८ (१८ - १०)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेता २००३ विंबल्डन (1) गवताळ ऑस्ट्रेलिया मार्क फिलिपोसिस 7–6(7–5), 6–2, 7–6(7–3)
विजेता २००४ ऑस्ट्रेलियन ओपन (1) हार्ड रशिया मरात साफिन 7–6(7–3), 6–4, 6–2
विजेता २००४ विंबल्डन (2) गवताळ अमेरिका अँडी रॉडिक 4–6, 7–5, 7–6(7–3), 6–4
विजेता २००४ यू.एस. ओपन (1) हार्ड ऑस्ट्रेलिया लेटन ह्युइट 6–0, 7–6(7–3), 6–0
विजेता २००५ विंबल्डन (3) गवताळ अमेरिका अँडी रॉडिक 6–2, 7–6(7–2), 6–4
विजेता २००५ युएस ओपन (2) हार्ड अमेरिका आंद्रे अगासी 6–3, 2–6, 7–6(7–1), 6–1
विजेता २००६ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड सायप्रस मार्कोस बघदातिस 5–7, 7–5, 6–0, 6–2
उप-विजेता २००६ फ्रेंच ओपन (1) माती स्पेन रफायेल नदाल 6–1, 1–6, 4–6, 6–7(4–7)
विजेता २००६ विंबल्डन (4) गवताळ स्पेन रफायेल नदाल 6–0, 7–6(7–5), 6–7(2–7), 6–3
विजेता २००६ यूएस ओपन (3) हार्ड अमेरिका अँडी रॉडिक 6–2, 4–6, 7–5, 6–1
विजेता २००७ ऑस्ट्रेलियन ओपन (3) हार्ड चिली फर्नान्डो गाँझालेझ 7–6(7–2), 6–4, 6–4
उप-विजेता २००७ फ्रेंच ओपन (2) माती स्पेन रफायेल नदाल 3–6, 6–4, 3–6, 4–6
विजेता २००७ विंबल्डन (5) गवताळ स्पेन रफायेल नदाल 7–6(9–7), 4–6, 7–6(7–3), 2–6, 6–2
विजेता २००७ युएस ओपन (4) हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 7–6(7–4), 7–6(7–2), 6–4
उप-विजेता २००८ फ्रेंच ओपन (3) माती स्पेन रफायेल नदाल 1–6, 3–6, 0–6
उप-विजेता २००८ विंबल्डन (1) गवताळ स्पेन रफायेल नदाल 4–6, 4–6, 7–6(7–5), 7–6(10–8), 7–9
विजेता २००८ यूएस ओपन (5) हार्ड युनायटेड किंग्डम अँडी मरे 6–2, 7–5, 6–2
उप-विजेता २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (1) हार्ड स्पेन रफायेल नदाल 5–7, 6–3, 6–7(3–7), 6–3, 2–6
विजेता २००९ फ्रेंच ओपन (1) माती स्वीडन रॉबिन सॉडरलिंग 6–1, 7–6(7–1), 6–4
विजेता २००९ विंबल्डन (6) गवताळ अमेरिका अँडी रॉडिक 5–7, 7–6(8–6), 7–6(7–5), 3–6, 16–14
उप-विजेता २००९ युएस ओपन (1) हार्ड आर्जेन्टिना हुआन मार्तिन देल पोत्रो 6–3, 6–7(5–7), 6–4, 6–7(4–7), 2–6
विजेता २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (4) हार्ड युनायटेड किंग्डम अँडी मरे 6–3, 6–4, 7–6(13–11)
उप-विजेता २०११ फ्रेंच ओपन (4) माती स्पेन रफायेल नदाल 5–7, 6–7(3–7), 7–5, 1–6
विजेता २०१२ विंबल्डन (7) गवताळ युनायटेड किंग्डम अँडी मरे 4–6, 7–5, 6–3, 6–4
उप-विजेता २०१४ विंबल्डन (2) गवताळ सर्बिया नोव्हाक जोकोविच 7–6(9–7), 4–6, 6–7(4–7), 7–5, 4–6
उप-विजेता २०१५ विंबल्डन (3) गवताळ सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–7(1–7), 7–6(12–10), 4–6, 3–6
उप-विजेता २०१५ युएस ओपन (2) हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 4–6, 7–5, 4–6, 4–6
विजेता २०१७ ऑस्ट्रेलियन ओपन (5) हार्ड स्पेन रफायेल नदाल 6–4, 3–6, 6–1, 3–6, 6–3

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Federer, Mandela are world's most respected & trusted". ATP World Tour. 19 September 2011.
  2. ^ "Mandela pips Federer". Times LIVE South Africa. 21 September 2011.
  3. ^ René Stauffer (2007). The Roger Federer Story: Quest for Perfection. New Chapter Press. p. 4. ISBN 0-942257-39-1.
  4. ^ "Roger Federer". 2012-05-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
अमेरिका अँडी रॉडिक
स्पेन रफायेल नदाल
सर्बिया नोव्हाक जोकोविच
{{{title}}}
२ फेब्रुवारी २००४ – १८ ऑगस्ट २००८
६ जुलै २००९ – ७ जून २०१०
९ जुलै २०१२ – चालू
पुढील
स्पेन रफायेल नदाल
स्पेन रफायेल नदाल