नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: noneआप्रविको: none
माहिती
स्थळ नवी मुंबई, भारत
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१४,७६४ ४,५०० डांबरी धावपट्टी
१४,७६४ ४,५०० डांबरी धावपट्टी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील मुंबई शहराजवळचा प्रस्तावित विमानतळ आहे. हा विमानतळ कोपर-पनवेल भागात बांधण्याचा आराखडा आहे. यात भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकार (सिडको द्वारे) यांचे प्रत्येकी १३% तर ७६% खाजगी भांडवल असेल.

प्रस्तावित रचना[संपादन]

हा विमानतळ ११.४ किमी² प्रदेशात विस्तारलेला असेल. यावर ४,५०० मीटर लांबीच्या दोन समांतर धावपट्ट्या असतील. याचे प्रवासी टर्मिनल २,५०,००० मीटर² क्षेत्रफळाचे असेल तर मालसामानाचा धक्का १,००,००० मीटर² क्षेत्रफळाचा असेल. येथून दरवर्षी ५-५.५ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल.[१] आयकाओ या संस्थेने या प्रमाणांना मान्यता दिलेली असून सध्या याच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात येत आहेत.[२] या प्रकल्पासाठी ३२ ते ४० अब्ज रुपयांचा खर्च अंदाजित आहे. हा विमानतळ मुंबई-पनवेलमधील रा.म.क्र. ४ब वर सध्याच्या सहार विमानतळापासून ३५ किमी अंतरावर प्रस्तावित आहे. ही जागा निवडताना नव्या मुंबईतील वाढती लोकसंख्या, औद्योगिक आणि व्यापारी संकुले तसेच ती वाढण्यासाठी असलेला मोठा वाव हा मुख्य निकष होता. एरबस ए-३८० आणि बोईंग ७४७-८ सारख्या अतिप्रचंड विमानांनाही या विमानतळावर ये-जा करणे सोपे होईल अशा दृष्टिने या विमानतळाची रचना करण्यात येईल.

याची उभारणी चार टप्प्यांत करण्यात येईल. पहिला टप्पा २००८-२०१२ दरम्यान असेल. ४.२ अब्ज रुपये खर्च करुन या टप्प्यात या टप्प्यात एक कोटी प्रवासीक्षमता असलेला तळ उभारण्यात येईल. २०१५-२०१७ दरम्यानच्या दुसर्‍या टप्प्यात १.९ अब्ज रुपये खर्चून याची क्षमता दोन कोटी प्रवाशांची करण्यात येईल. तिसर्‍या टप्प्यात (२०२०-२२) प्रवासीक्षमता तीन कोटी करण्यासाठी १.६ अब्ज रुपये खर्ची पडतील तर चौथ्या टप्प्यात (२०२६-२८) ही क्षमता ४ ते ५ कोटी होईल व त्यासाठी अजून २.३ अब्ज रुपये वापरण्यात येतील. २०३०पर्यंत या विमानतळावरुन तीन कोटी प्रवासी ये-जा करतील असा अंदाज आहे.

या विमानतळाची उभारणी सरकारी तसेच खाजगी भांडवलातून करण्यात येईल. ठाणे-बेलापूर, तळोजा येथील औद्योगिक वसाहती, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून मालसामान तर पुण्यापासून उत्तर मुंबईपर्यंतच्या पट्ट्यातील प्रवासी या विमानतळाचा उपयोग करतील असा अंदाज आहे.

वाद[संपादन]

या विमानतळाच्या उभारणीवरुन अनेक वाद निर्माण झाले. जरी साधारण तारखा ठरल्या असल्या तरी अजूनही बांधकाम सुरू करण्यासाठीची मुदत ठरवण्यात आलेली नाही. विमानतळाला गरजेची असलेली जागाही अजून ताब्यात घेतली गेलेली नाही. आत्ताचे जागामालक त्यांना सिडकोने देऊ केलेल्या मोबदल्यावर नाखूष आहेत. याशिवाय विमानतळावरील पाण्याचा निचरा होताना पनवेललगतची खारजमीन तसेच इतर गटार व नाल्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे व बिनसरकारी संस्था याविरुद्ध आंदोलन करीत आहेत.[३] जगातील इतर शहरांप्रमाणे मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ गाव/शहरापासून दूर बांधून तेथे ये-जा करण्यासाठी रस्ते/लोहमार्ग बांधावे अशीही एक मागणी आहे. यामागे उद्योगधंदे व शेतीसाठी वापरली जाणारी जमीन विमानतळांसाठी न वापरता पडीक जमीन वापरली जावी हा हेतू असतो.

सद्यस्थिती[संपादन]

मे १४, २००८ रोजी केन्द्रीय वनपर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला तात्पुरती मंजूरी दिली आणि २३ नोव्हेंबर २००८ रोजी सगळ्या हरकती काढून घेतल्या.[४].[५] मार्च, २०१० पर्यंत निविदा मागवणे अपेक्षित होते.

खर्च[संपादन]

या विमानतळासाठी एकूण ९० अब्ज रुपये खर्च केले जातील.[६] पैकी पहिल्या टप्प्यात ४० अब्ज रुपयांचा व्यय अपेक्षित आहे.[७]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Article about the airport in The Hindu Business Line
  2. ^ Cidco
  3. ^ http://cidcoindia.com/cidco/naviair.aspx
  4. ^ "Navi Mumbai Airport Gets MoEF Green Signal". The Financial Express. 16 May 2008. 2 December 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "Second Mumbai airport takes off". The Indian Express. 22 November 2010. 23 November 2010 रोजी पाहिले.
  6. ^ "New airport for Mumbai". Straitstimes.com. 2010-11-22. 2010-12-02 रोजी पाहिले.
  7. ^ Ashutosh Limaye. "Navi Mumbai airport nod to see housing prices jump: Experts - CNBC-TV18". Moneycontrol.com. 2010-12-02 रोजी पाहिले.


साचा:Coord missing