Jump to content

दक्ष राजाच्या मुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू धर्मात, दक्ष हा प्रजापती आहे आणि ब्रह्मादेवांचा पुत्र आहे. हिंदू साहित्यात वीरणी आणि प्रसूती या दोघीं दक्षाच्या पत्नी आहेत. [] दक्षाच्या काही उल्लेखनीय मुलींमध्ये अदिती( आदित्यांची आई), दिती( दैत्यांची आई), दानू( दानवांची आई) स्वाहा(यज्ञांची देवी आणि अग्निची पत्नी) आणि शिवाची पहिली पत्नी सती यांचा समावेश होतो. .

निर्मितीमध्ये दक्ष राजांच्या मुलींची महत्त्वाची भूमिका आहे. कारण त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह हिंदू धर्मातील अनेक देवतांशी करून दिला होता. [] महाभारतानुसार, दक्षाच्या सोळा कन्या ह्या देव, दानव आणि मानवांसह सर्व सजीवांच्या माता बनतात. []

यादी

[संपादन]

प्रसूतीच्या मुली

[संपादन]

दक्षा आणि प्रसूती ह्यांच्या मुलींची संख्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये १६ ते ६० इतकी वेगवेगळी आहे. प्रसूतीच्या मुली मनाच्या आणि शरीराच्या गुणांचे प्रतिनिधित्व करतात. [] त्यांनी वेगवेगळ्या देवतांशी लग्न केले आहे. [] विष्णु पुराणात असे म्हणले आहे की प्रसूती आणि दक्ष ह्यांना २४ मुली झाल्या. []

मुलीचे नाव जोडीदार
श्रद्धा धर्म
लक्ष्मी धर्म
धृती धर्म
तुष्टी धर्म
पुष्टी धर्म
मेधा धर्म
क्रिया धर्म
बुद्धी धर्म
लढ्ढा धर्म
वपुस धर्म
शांती धर्म
सिद्धी धर्म
किर्ती धर्म
ख्याती भृगु
संभूती मारिची
स्मृती अंगिरास
प्रिती पुलस्त्य
क्षामा पुलहा
सन्नाटी क्रतु
अनसूया अत्रि
उर्जा वशिष्ठ
स्वाहा अग्नी
स्वाधा पितर
सती शिव

विरणीच्या मुली

[संपादन]

पद्म पुराणानुसार, दक्ष राजाला त्यांची पत्नी विरणीपासून ६० कन्या झाल्या. [] सतीचा विवाह शिवाशी झाला. [] मत्स्य पुराणानुसार, यापैकी एकही मुलगी त्यांच्या वडिलांसारखी नव्हती. त्यांची देवता आणि ऋषीमुनींशी झालेल्या विवाहानुसार यादी केली आहे: [] [१०]

  1. धर्माशी १० मुलींचा विवाह झाला
  2. कश्यप ऋषींशी १३ मुलींचा विवाह झाला
  3. चंद्राशी २७ मुलींचा विवाह झाला
  4. अरिष्टनेमी ह्यांच्याशी ४ मुलींचा विवाह झाला
  5. भृगु ऋषींच्या मुलांशी २ मुलींचा विवाह झाला
  6. अंगिरस ऋषीशी दोन मुलींचा विवाह झाला
  7. कृशाश्वशी दोन मुलींचा विवाह झाला

धर्माच्या पत्नी

[संपादन]

धर्मराज ह्यांना १० पत्नी आहेत: [] [११]

  1. मरुवती
  2. वसु
  3. अरुंधती
  4. लंबा
  5. भानू
  6. उर्जा
  7. संकल्पा
  8. मुहूर्ता
  9. संध्या
  10. विश्वा

कश्यप ऋषींच्या पत्नी

[संपादन]

कश्यप ऋषी ह्यांच्याशी १३ जणीनी विवाह केला आहे: [१२] [१३]

  1. अदिती
  2. दिती
  3. दानू
  4. अरिष्टा
  5. सुरसा
  6. सुरभी
  7. विनता
  8. ताम्रा
  9. क्रोधवशा
  10. इरा
  11. कद्रू
  12. विश्वा
  13. मुनि

चंद्राच्या पत्नी

[संपादन]

चंद्राशी विवाह केलेल्या 27 कन्या ज्या नक्षत्र बनल्या आहेत: [१४]

  1. अश्विनी ,
  2. भरणी ,
  3. कृत्तिका
  4. रोहिणी ,
  5. मृगशिरा
  6. आद्रा
  7. पुनर्वसु
  8. पुष्य
  9. आश्लेषा
  10. मघा
  11. पूर्वफाल्गुनी
  12. उत्तराफाल्गुनी
  13. हस्त
  14. चित्रा
  15. स्वाती
  16. विशाखा
  17. अनुराधा किंवा राधा
  18. ज्येष्ठा
  19. मूला
  20. पूर्वाषाधा
  21. उत्तराशरा
  22. श्रावण किंवा अभिजीता
  23. धनिष्ठ
  24. शतभिषा
  25. पूर्वा भाद्रपद
  26. उत्तरभाद्रपद
  27. रेवती

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Mani, Vettam (2015-01-01). Puranic Encyclopedia: A Comprehensive Work with Special Reference to the Epic and Puranic Literature (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass. p. 193. ISBN 978-81-208-0597-2.
  2. ^ Williams, George Mason (2003). Handbook of Hindu Mythology (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. p. 106. ISBN 978-1-57607-106-9.
  3. ^ Coulter, Charles Russell; Turner, Patricia (2013-07-04). Encyclopedia of Ancient Deities (इंग्रजी भाषेत). Routledge. p. 141. ISBN 978-1-135-96390-3.
  4. ^ Chawla, Janet (2006). Birth and Birthgivers: The Power Behind the Shame. ISBN 9788124109380.
  5. ^ Sen, Ramendra Kumar (1966). "Aesthetic Enjoyment; Its Background in Philosophy and Medicine".
  6. ^ Debroy, Bibek (2022-06-30). Vishnu Purana (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. p. 40. ISBN 978-93-5492-661-7.
  7. ^ Dalal, Roshen (2010). The Religions of India: A Concise Guide to Nine Major Faiths (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. p. 93. ISBN 978-0-14-341517-6.
  8. ^ Wilkins, W.J. (2003). Hindu Mythology. New Delhi: D.K. Printworld (P) Limited. p. 373. ISBN 81-246-0234-4.
  9. ^ a b The Matsya Puranam P-I (B.D. Basu) English Translation Ch #5, Page 17
  10. ^ Matsya Purana (Sanskrit) Ch #5, Sloka 10-12
  11. ^ Matsya Purana (Sanskrit) Ch #5, Sloka 15-16
  12. ^ The Matsya Puranam P-I (B.D. Basu) English Translation Ch #5, Page 18
  13. ^ Matsya Purana (Sanskrit) Ch #6, Sloka 1-2
  14. ^ Dowson, John (2013-11-05). A Classical Dictionary of Hindu Mythology and Religion, Geography, History and Literature (इंग्रजी भाषेत). Routledge. p. 77. ISBN 978-1-136-39029-6.