उत्तराषाढा
Appearance
उत्तराषाढा हे एक नक्षत्र आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]भारतीय नक्षत्रमालिकेतील एकविसावे नक्षत्र. या नक्षत्राचा पहिला चरण (चतुर्थांश) धनू राशीत व पुढचे तीन चरण मकर राशीत येतात. (पाश्चात्य) धनूपैकी सिग्मा [नंकी, भोग २५८० ४८·९’; शर–३० २८·१’; प्रत २·१४, → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा या नक्षत्राचा योगतारा (प्रमुख तारा) आहे व धनूपैकीच झीटा हाही यात आहे. काहींच्या मते धनूपैकी फाय व टाउ हे तारेही उत्तराषाढात आहेत. या नक्षत्राची देवता विश्वेदेव आणि आकृती हत्तीच्या दातासारखी आहे.
ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)