Jump to content

रोहिणी (नक्षत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोहिणी नक्षत्र हे आकाशात दिसणाऱ्या २७ नक्षत्रांपैकी (तारकापुंजांपैकी) एक आहे.

नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत


हे सुद्धा पहा

[संपादन]

भारतीय २७ नक्षत्रांपैकी चवथे नक्षत्र. यातील पाच तारे मिळून इंग्रजी V (व्ही) सारखा वा समद्विभुज त्रिकोणासारखा आकार दिसतो. या त्रिकोणाचा शिरोबिंदू पश्चिमेस असून दक्षिणेकडील भुजेच्या टोकास रोहिणी (आल्डेबरन) हा तेजस्वी तारा आहे. मृगाचे तोंड व कृत्तिका यांना जोडणारी रेषा या नक्षत्रातून जाते. याचा समावेश वृषभ व मिथुन राशींत केला असून आल्डेबरन हा योग तारा या वृषभाचा तांबूस डोळा आहे, असे मानलेले आहे. या ताऱ्याचे शास्त्रीय नाव अल्फा टौरी असून तो होरा ४ ता. ३२ मि. ५६ से. आणि क्रांती उ. १६० २४' २३” [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] येथे दिसतो. याची ⇨ प्रत ०.८७ वर्णपटीय प्रकार K5, दीप्ति-प्रकार III असून हा ताबंडा महातारा आहे [⟶ तारा]. ६८ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या या ताऱ्याची दीप्ती सूर्याच्या दीप्तीच्या ४०० पट व त्याचे पृष्ठीय तापमान ३,६००० के. (सूर्यापेक्षा कमी) आढळले आहे. हा युग्मतारा असून याचा सहचर १३ प्रतीचा व याच्यापासून ३१” दूर आहे. याच्या दृश्य बिबांचा व्यास ०'.२३ असून तो सूर्याच्या व्यासाच्या ५६ पट असल्याचे आढळले आहे. आल्डेबरन या अरबी शब्दाचा अर्थ अनुचर (मागून जाणारा) असा असून हा कृत्तिकेमागून उगवत असल्याने याला कृत्तिकेचा अनुचर मानतात. आकाशातील १५ तेजस्वी ताऱ्यांपैकी हा एक असून दृष्टिरेषेशी काटकोन करणाऱ्या दिशेत याची वार्षिक गती ०”.२० येते. चंद्र मधून मधून याचे पिधान करतो. मघा, ज्येष्ठ, चित्रा या ताऱ्यांप्रमाणे तेजस्वी असल्याने चंद्र अगदी जवळ येईपर्यंत हा दिसत असतो. पिधानाच्या क्षणी चंद्राची पूर्वेकडील कडा याला अगदी टेकल्यासारखी दिसते व पुढच्याच क्षणी तो चंद्रबिंबाआड जाऊन दिसेनासा होतो. यामुळे पिधानाचा हा देखावा सुंदर असतो. असे पिधान तासभर चालते. ५ सप्टेंबर १४९७ रोजी कोपर्निकस यांनी असे विधान पाहिल्याचा उल्लेख आढळतो. रोहिणीचे पिधान वरचेवर होते. त्यामुळे सत्तावीसपैकी या पत्नीवर चंद्राचे विशेष प्रेम असून त्याबद्दल दक्षप्रजापतीने चंद्राला क्षयाचा शाप व नंतर त्यावरील उःशापही दिला, अशी पुराणकथा आहे.

यातील उरलेले शकटावे चार तारे हायडीझ या खुल्या तारकागुच्छात येतात. या तारकागुच्छात शेकडो तारे असून त्याचा व्यास १६ प्रकाशवर्षे आहे. यातील तारे सु. १३० प्रकाशवर्षे दूर असून ते सेकंदाला ४५ किमी. एवढ्या वेगाने मृगाकडे जात आहेत. रोहिणी नक्षत्र ऑक्टोबरात दिसू लागते व मार्चमध्ये मावळते. म्हणून याचा पावसाळ्याशी संबंध जोडला जातो आणि यावरून पावसाळी अर्थाचे हायडीझ हे नाव आले असावे. हे नक्षत्र फेब्रुवारीच्या सुरुवातीस रात्री नऊच्या सुमारास मध्यमंडळावर येते.ब्रह्मा किंवा प्रजापती हा या नक्षत्राचा स्वामी तर शकट किंवा देवालय ही याची आकृती मानली आहे. चंद्र हा रोहिणीचा पती आणि बुध हा रोहिणीचा मुलगा मानला आहे. फलज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे नक्षत्र ध्रुव, स्थिर, ऊर्ध्वमुख व अंधलोचन मानले असून ते शुक्राचे स्वगृह व चंद्राचे उच्च स्थानही मानतात.