अदिति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अदिति (संस्कृत: अदितिः ; IAST: Āditi) वैदिक देवता. हि आदित्यांची माता, दक्षप्रजापतीची कन्या व कश्यपप्रजापतीची पत्नी. आठ पुत्रांपैकी आठव्या सूर्याला तिने टाकल्याने तो नभस्थ झाला. ही तपस्येमुळे विष्णुमाता व सर्वदेवमाता झाली, असे पुराणे सांगतात. नरकासुराने नेलेली हिची कुंडले कृष्णाने नरकासुरमर्दन करून परत आणून दिली. [१]

आदितीला बारा मुलगे होते, त्यापैकी मित्र, वरुण, धाता, आर्यमा (अर्यमन), अंशुमान,भग , विवस्वान, आदित्य, पर्जन्य, इंद्र,त्वष्टा,पूषा, विष्णु आहेत.[२]


पौराणिक कथा[संपादन]

कश्यप मरीचि ऋषी यांचा पुत्र आहे, कश्यप ऋषींना अदिती आणि दिती या दोन बायका होत्या. देवांचा जन्म आदितीच्या गर्भाशयातून झाला आणि दैत्यांचा जन्म दितीच्या गर्भाशयातून झाला. श्रीकृष्णाची आई देवकी 'अदितीचा अवतार' असल्याचे म्हटले जाते.[३][४]

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "अदिति". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "अदिति". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-12-29.
  3. ^ "अदिति". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-12-29.
  4. ^ "अदिति - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". bharatdiscovery.org. 2019-12-29 रोजी पाहिले.