Jump to content

अंगिरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंगिरस अथवा अंगिरा वज्रकुलोत्पन्न एक प्रसिद्ध वैदिक ऋषी होते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख मनु, ययाति, दध्यच्, प्रियमेघ, कण्व, अत्रि, भृगु इत्यादी ऋषींसोबत आढळतो. ते सप्तर्षी व दहा प्रजापतींमध्ये गणले जातात.

अंगिरस ऋषी यांनी आपल्या मंत्रशक्तीने सूर्याचा व स्वर्लोकाचा शोध लावला असे सांगितले जाते. []

अंगिरस हे नांव वेदांमध्ये अंगिरा किंवा अंगिरस् अशा दोन स्वरूपात येते. बृहस्पतीला उद्देशून अंगिरस् हे पूर्वज नाम (गोत्रनाम) म्हणून येते. नंतरच्या काळात अंगिरस् हे प्राचीन ऋषींमध्ये गणले जाऊ लागले. अंगिरस् हे ऋषिसमूहाचे नाव झाले.

मुळातले सात अंगिरस ऋषी हे मानवसमाजाचे पूर्वज - 'पितरो मनुष्याः ।" असे मानले जातात. त्यांनी प्रकाशाचा शोध लावला. त्यांनी सूर्याला प्रकाशमान केले आणि सत्यधामाच्या दिशेने म्हणजे ऊर्ध्वदिशेने ते गतिमान् झाले. काही सूक्तांमध्ये त्यांना पितृदेवता किंवा यमाचे स्त्रीअश्व असे म्हटले आहे.

ते मनुष्यजातीचे पूर्वज होते. वैदिक धर्माचे संस्थापक होते.

अंगिरस ऋषी हे अग्नीच्या ज्वालाशक्तीचे आणि भृगूंच्या सौरशक्तीचे प्रतीक असण्याची शक्यता आहे, असे दिसते.[]

ते केवळ ऋषी नाहीत तर ते योद्धे म्हणूनही काम करतात. आनंदलोकातील मधुरतेमध्ये त्यांचा निवास असतो. ते अग्निशक्तीप्रमाणेच बृहस्पती-शक्तीचेही प्रतीक आहेत. [] (वेदरहस्य: पा. १५०)

ते ज्वालापुत्र आहेत. ते सोमरस देणारे व स्वीकारणारे आहेत. ते ऋचांचे गायक आहेत. ते चिरतरुण आहेत. (वेदरहस्य: पा. १५५)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम