दिति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदू पौराणिक साहित्यानुसार दिति (मराठी लेखनभेद: दिती; संस्कृत: दिति) ही कश्यपाची पत्नी व दैत्य वंशाची माता होती. महाभारतमते ही दक्ष प्राचेतस प्रजापतीची कन्या होती[१].

वंश[संपादन]

कश्यपापासून दितीला झालेले पुत्र दैत्य या मातृक नावाने संबोधले जातात. वाल्मीकि रामायणानुसार तिच्या पुत्रांनी, म्हणजेच दैत्यांनी अमृतप्राप्तीसाठी देवांशी युद्ध केले. या युद्धात दितीचे सर्व पुत्र मारले गेले. त्यामुळे तिने इंद्रविनाशक पुत्रप्राप्तीसाठी कश्यपाची १,००० वर्षे तपस्या केली व त्यातूनच तिने सात मरुत्गणांना जन्म दिला[१].

संदर्भ[संपादन]

  1. a b [भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (मराठी मजकूर). भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. इ.स. १९६८. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.