Jump to content

सती (हिंदू देवी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सती (हिंदू देवी)

शिव सतीला घेऊन जात आहे
मराठी सती
संस्कृत सती
निवासस्थान कैलास
वडील दक्ष राजा
आई प्रसूती
पती शिव
अपत्ये अदिती, ख्याती, रोहिणी.
या देवतेचे अवतार पार्वती
नामोल्लेख लिंग पुराण
तीर्थक्षेत्रे एकावन्न शक्तीपीठ (भारतातील आणि इतर देशातील),

सतीची पौराणिक कथा :-

सती ही देवांचे देव महादेव यांची पहिली अर्धांगिनी आणि राजा दक्ष यांची कन्या. राजा दक्ष यांना सोळा कन्या होत्या त्यातील सतीची एक रोचक कथा आहे.

राजा दक्षाला पंधरा पुत्री होत्या तरीही ते असंतुष्ट होते, कारण त्यांना एक अशी पुत्री हवी होती जी सर्व शक्तीची आदी देवता असेल त्याचबरोबर सर्वगुण संपन्न असेल, म्हणून त्यांनी " भगवती आद्य देवी " यांना प्रसन्न करण्यासाठी तप केले. आणि काही दिवसांनी आद्य देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले, तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक आणखी पुत्री व्हावी असे वरदान मागितले, तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी पुत्री बनून येईल असे वरदान दिले.

सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे, काही वर्षांनी सती मोठी झाली, आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले, ह्याबद्दल त्यांनी ब्रम्हदेवांकडे याची वाच्यता केली, तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले ही आद्य देवीची आहे म्हणजे ही आदी शक्ती देवी असल्यामुळे हिचे विवाह आद्य पुरुष शिवाशी लग्न होणे उचित होईल, ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्यांचा विवाह शिवाबरोबर लावून दिला. हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे " महाशिवरात्री " म्हणून ओळखला जातो. विवाहानंतर सती शिवाबरोबर कैलासावर राहावयास गेली. परंतु दक्ष राजा आणि शिवाचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शिवाला फारसे महत्त्व देत नसत.

एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता. त्यामध्ये सर्व देवलोकांना आमंत्रण होते, पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण केले नाही. सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली. शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की, तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तेथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील, म्हणून तू जाऊ नकोस.' परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिव शंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. तेथे जाताच सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली, की समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे, त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करावयास सुरुवात केली ते म्हणाले, " शिव हे स्मशानी, भूत-प्रेतांवर राहणारे एक शूद्र व्यक्ती आहेत, ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात. त्याचबरोबर त्यांना वस्त्र, आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे, त्यामुळे त्यांना ह्या यज्ञात मान मिळणे कठीण आहे, त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल ! ".

हे आपल्या पतीविरोधात अपमानास्पद वाक्य सतीच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता हे मनात आणून ती थांबली. ह्या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले.

असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले, त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडवनृत्य करायला सुरुवात केली, त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला, सगळीकडे निसर्गानी कोप घेतला, हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल, म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले, सुदर्शनचक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले, तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव भानावर आले आणि त्यांनी सतीचे असे तुकडे पाहून विष्णूंना श्राप दिला. ह्या शापाला मोडण्यासाठी विष्णूंनी एकावन्न सतीच्या शक्तिपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले, तेव्हा विष्णूंनी शिव-शंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची पुत्री बनून येईल आणि पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल. सतीची चाल ही भारत या देशा व्यतिरिक्त कुठेही जगाच्या पातळीवर लागू नाही.

सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात एकावन्न जागांवर पडले म्हणून यांना एकावन्न शक्तिपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायानी नावाने म्हणतात.