Jump to content

ड्वाइट डी. आयझेनहॉवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ड्वाईट डी. आयझेहॉवर या पानावरून पुनर्निर्देशित)
ड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर

सही ड्वाइट डी. आयझेनहॉवरयांची सही

ड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर (इंग्लिश: Dwight David Eisenhower) (ऑक्टोबर १४, इ.स. १८९०; डेनिसन, टेक्सास, अमेरिका - मार्च २८, इ.स. १९६९; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हे अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष होते. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते. दोस्त सैन्यांच्या ऑपरेशन टॉर्च या इ.स. १९४२-४३ सालांतील उत्तर आफ्रिकेतील युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून फ्रान्सजर्मनी यांवरील इ.स. १९४४-४५ च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्यांनी केले. इ.स. १९५१ साली ते नाटो सैन्याचे सरसेनापती म्हणून नेमले गेले. इ.स. १९५३ सालापर्यंत त्यांनी ते सरसेनापतित्व सांभाळले.

आयसेनहॉवर यांनी साम्यवादी प्रसाराविरुद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषतः लेबेनॉनला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत आयसेनहॉवर डॉक्ट्रीनन या नावाने ओळखली जाते. त्यांनी कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअ‍ॅटो करार यांसारख्या कामांतून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, कृष्णवर्णीयांच्या समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्‍न केले.

भूषविलेली पदे

[संपादन]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • क्रुसेड्ज इन युरोप
  • द व्हाइट हाउस इयर्स
  • अ‍ॅट ईझ

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2012-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "ड्वाइट डी. आयझेनहॉवर: अ रिसोर्स गाइड (ड्वाइट डी. आयझेनहॉवर: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)