लोकदैवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री.ज्योतिबा प्रसन्न

लोकदैवत ही समाजजीवन आणि लोकसंस्कृती या विषयांशी संबंधित संकल्पना आहे.[१]

इतिहास[संपादन]

केशवराज मंदिर आसूद गाव (दापोली) येथील लोकदेवता

समाजजीवनामधे लोकांच्या मनातील श्रद्धेतून विविध देवतांचा विकास झाला आहे. या देवतांना लोकदैवते असे म्हटले जाते. स्थानिक पातळीवर या देवतांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान असते. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात वेदपूर्व काळापासून लोकदैवत ही संकल्पना मान्यता पावलेली दिसून येते.[२] केवळ महाराष्ट्रात अथवा भारतातच[३] नाही तर संपूर्ण जगभरात[४] विविध संस्कृतींमध्ये लोकदैवत ही संकल्पना पूजनीय मानली गेली आहे.[५][६]

स्वरूप आणि विकास[संपादन]

लोकदैवत हे मूर्तीच्या रूपात पूजिले जाते किंवा काही वेळा एकादी शिळा, दगड, काठी, एखादी रिकामी राखीव सोडलेली जागा असेही लोकदैवताचे स्वरूप असते. देवीच्या उपासनेतील लज्जागौरी हे लोकदेवतांच्या उपासनेतील वैशिष्ट्यपूर्ण दैवत आहे.[७] विष्णू, शंकर, गणपती या पुराणकालीन देवतांचे अंशही स्थानिक पातळीवर लोकदैवतांमध्ये पूजनीय मानले जातात. गावातील शेताच्या बांधावर असलेली म्हसोबा, विरोबा, क्षेत्रपाल ही दैवते शंकराची रूपे मानली जातात. गावाच्या वेशीचे रक्षण करणारा हनुमान हा सुद्धा लोकदैवत म्हणून मान्यता पावलेला आहे. देवीच्या उपासनेतील काळूबाई, मांढरदेव, लज्जागौरी, साती आसरा, जाखाई यासुद्धा लोकदेवता म्हणूनच पूजिल्या जातात.[८] या देवतांच्या स्थानाईक पातळीवर आख्यायिका प्रचलित असतात आणि श्रद्धेने त्याकडे पाहिले जाते.[९]

देवराई ही सुद्धा लोकदेवतांच्या उपासनेतील महत्त्वाची संकल्पना आहे.जंगलाचा एखादा विशिष्ट भाग हा ग्रामदेवता किंवा स्थानदेवता यासाठी राखीव ठेवला जातो आणि त्यावर संबंधित देवतेचे नियंत्रण असते अशी समाजाची धारणा असते. या देवराईतील खाली पडलेले पानदेखील उचलून आणण्याला मनाई असते.[१०]

महाराष्ट्रातील लोकदैवते[संपादन]

महाराष्ट्र राज्यातील जेजुरी येथील खंडोबा,[११] वाडी रत्‍नागिरी- कोल्हापूर येथील ज्योतिबा, माहूर येथील रेणुकामाता ही प्रसिद्ध लोकदैवते आहेत.[१२] या लोकदैवतांच्या उपासक समुदायाला समाजात महत्त्वाचे स्थान आहे. वाघ्या-मुरळी, पोतराज, गोंधळी, भुत्या अशा विविध उपासकांच्या उदरनिर्वाहाची काळजी देखील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून घेतली जाते हे आधुनिक काळातही अनुभवाला येते.[१३]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "लोकदैवत आणि लोककलेचा जागर". महाराष्ट्र टाइम्स. 2020-09-13 रोजी पाहिले.
 2. ^ HADAP, SHILPA; JOGLEKAR, P.P. (2008). "A STUDY OF CULT IMAGES OF KONKAN: TRADITIONS, RELIGIOUS BELIEFS AND ICONOGRAPHY". Bulletin of the Deccan College Research Institute. 68/69: 215–229. ISSN 0045-9801.
 3. ^ Masilamani-Meyer, Eveline (2004). Guardians of Tamilnadu: Folk Deities, Folk Religion, Hindu Themes (इंग्रजी भाषेत). Otto Harrassowitz Verlag. ISBN 978-3-931479-61-9.
 4. ^ Dorson, Richard M. (2016-05-19). Folktales Told Around the World (इंग्रजी भाषेत). University of Chicago Press. ISBN 978-0-226-37534-2.
 5. ^ "लोकदैवतांचे विश्व (Lokdaivatanche Vishwa)". मराठी विश्वकोश. 2018-12-13. 2020-09-13 रोजी पाहिले.
 6. ^ "भक्तों ने लोकदेवता तेजाजी के थान पर दर्शन कर की पूजा, मेले स्थगित". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2020-08-29. 2020-09-17 रोजी पाहिले.
 7. ^ Pattanaik, Devdutt (2000-09). The Goddess in India: The Five Faces of the Eternal Feminine (इंग्रजी भाषेत). Inner Traditions / Bear & Co. ISBN 978-0-89281-807-5. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 8. ^ भोसले, द. ता. (2001). संस्कृतीच्या पाऊलखुणा. पुणे: पद्मगंधा प्रकाशन. p. 18. ISBN 978-93-82161-59-2.
 9. ^ "महाराष्ट्राचा 'महावृक्ष'". सामना. Archived from the original on 2020-03-22. 2020-09-17 रोजी पाहिले.
 10. ^ "देवराईंच्या संवर्धनाची गरज". सकाळ. 2023-03-14 रोजी पाहिले.
 11. ^ गायकवाड, मेघा सुखदेव (2005). दक्षिण भारतातील खंडोबा: एक जागृत दैवत. वसंत बुक स्टॉल.
 12. ^ Cendavaṇakara, Sadānanda (1964). Āmacyā dahā devatā. Sāhitya-Rasa Mālā Prakāśana.
 13. ^ ढेरे, रामचंद्र (प्रथमावृती 1996). लोकसंस्कृतीचे उपासक. पुणे: पद्मगंधा प्रकाशन. pp. 20–68. ISBN 978-93-84416-46-1. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)