Jump to content

नावजीबुवा साळुंखे-किवळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संत नावजीनाथ या पानावरून पुनर्निर्देशित)

नावजीनाथ साळुंखे(ससे पाटील,किवळकर),हे श्री केदारनाथाचे(ज्योतिबाचे) भक्त होते.देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नग्रहन करायचे नाही असा त्यांच नित्यक्रम होता.

जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल-फुले वाहिली जातात त्या पादुका परमभक्त नावजी बुवांच्या. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान किवळ (ता. कराड) येथील नावजी साळुंखे (पाटील) यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा बैठ्या स्वरूपातील पुतळा आहे.

ज्योतिबा

श्री ज्योतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदिर कराडजवळच्या किवळ येथील संत नावजीनाथ नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.

नावजीनाथाचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे.त्यांनी गावात तळे,विहीर,विठ्ठ्ल ,मारुती मंदिर,ग्रामपंचायत कट्टा,मुस्लिम समाजासाठी मशिद ही कामे केली.

आरती नावजीनाथांची[संपादन]

आरती नावजीसंत | ससेवंशा माझी कांत |
किवळ पुण्यभूमी नांदे भा‍गीर्थी कांत |
  .....आरती नावजीसंत 
दया दास परिवारे सुखे नांदती सारे |
दारिद्र्य कष्टकाळ उभे नावजी द्वारी |
  .....आरती नावजीसंत 
विमल भाव नावजीचा पू‍र्ण भक्त केदाराचा |
नवविध भक्ती पंथ बसु केला जो‍तिर्लिग |
  .....आरती नावजीसंत 
नावजी भक्तासाठी कष्टी झाले जग जेठी |
वारुवार स्वार झाले प्रेमे पाउले भेटी |
  .....आरती नावजीसंत 
नावजी पुत्र कांता धन्य जनाबाई माता |
भेटले जोतिर्लिग झाले भाव बंधमुक्त |
  .....आरती नावजीसंत 
प्रपंच हे ताटकरी त्रिवी दत्ताचे निरंजनी |
सदाभावे शुभपाती ओवाळीला हरी |
  .....आरती नावजीसंत 
अखंड ही अल्पसेवा द्यावी नावजी देवा |
रघुनाथ लीन पावे माथा ठेवी वरदहस्त |
  .....आरती नावजीसंत 

बाह्य दुवे[संपादन]