ऐझॉल
ऐझॉल | |
भारतामधील शहर | |
मिझोरम विद्यापीठ, सॉलोमन चर्च व ऐझॉल विमानतळ |
|
देश | भारत |
राज्य | मिझोरम |
जिल्हा | ऐझॉल जिल्हा |
क्षेत्रफळ | ९ चौ. किमी (३.५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,७१५ फूट (१,१३२ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,९३,४१६ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
aizawl.nic.in |
ऐझॉल हे भारत देशाच्या मिझोरम राज्याच्या राजधानीचे शहर व ईशान्य भारतामधील एक प्रमुख शहर आहे. ऐझॉल शहर मिझोरमच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ३,७१५ फूट इतक्या उंचीवर वसले आहे. २०११ साली सुमारे ३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ऐझॉल मिझोरमचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र आहे. ऐझॉलमध्ये मिझोरम राज्य सरकारचे कार्यालय, विधानसभा व ऐझॉल उच्च न्यायालय स्थित आहेत. येथे प्रामुख्याने मिझो वंशाच्या लोकांचे वास्तव्य असून मिझो ही मिझोरमची एक राजकीय भाषा आहे.
इतिहास
[संपादन]ऐझॉल गावाची स्थापना ब्रिटिशांच्या काळात केली गेली व येथे १८९० च्या दशकात ब्रिटिशांनी एक किल्ला बांधला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऐझॉल व जवळची खेडी एकत्रित करून ऐझोल शहराची निर्मिती झाली. ब्रिटिश काळापासूनच येथे ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला होता. आजच्या घडीला ऐझॉलमधील ९० टक्क्याहून अधिक रहिवासी ख्रिस्ती धर्मीय आहेत.
वाहतूक
[संपादन]लेंगपुई विमानतळ हा ऐझॉल व मिझोरमला उर्वरित भारतासोबत जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. येथून दिल्ली, कोलकाता व गुवाहाटी ह्या प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग ऐझॉलला आगरताळा, इम्फाळ व सिलचरसोबत जोडतात. बैराबी हे मिझोरममधील एकमेव रेल्वे स्थानक ऐझॉलच्या ८० किमी उत्तरेस स्थित आहे. बैराबी ते ऐझॉल रेल्वेमार्गाचे काम प्रस्तावित आहे.