Jump to content

कपिल देव निखंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कपिलदेव निखंज या पानावरून पुनर्निर्देशित)
कपिल देव
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज
जन्म ६ जानेवारी, १९५९ (1959-01-06) (वय: ६५)
चंडीगढ,भारत
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (१४१) १६ ऑक्टोबर १९७८: वि पाकिस्तान
शेवटचा क.सा. १९ मार्च १९९४: वि न्यू झीलँड
आं.ए.सा. पदार्पण (२५) १ ऑक्टोबर १९७८: वि पाकिस्तान
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९७५ – १९९२ हरयाणा
१९८४ – १९८५ वॉर्सस्टशायर
१९८१ – १९८३ नॉर्थम्पटनशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १३१ २२५ २७५ ३०९
धावा ५२४८ ३७८३ ११३५६ ५४६१
फलंदाजीची सरासरी ३१.०५ २३.७९ ३२.९१ २४.५९
शतके/अर्धशतके ८/२७ १/१४ १८/५६ २/२३
सर्वोच्च धावसंख्या १६३ १७५* १९३ १७५*
चेंडू २७७४० ११२०२ ४८८५३ १४९४७
बळी ४३४ २५३ ८३५ ३३५
गोलंदाजीची सरासरी २९.६४ २७.४५ २७.०९ २७.३४
एका डावात ५ बळी २३ ३९
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ९/८३ ५/४३ ९/८३ ५/४३
झेल/यष्टीचीत ६४/– ७१/– १९२/– ९९/–

२४ जानेवारी, इ.स. २००८
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. == क्रिकेट क्षेत्रातील योगदान ==कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव आज त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करतो आहे (जन्म १९५९, चंडीगढ) . रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९७६-७७ च्या हंगामात जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकूण ३६ धावा देत ८ बळी घेतले. हा सामना हरयाणाने जिंकला. नंतरच्या साखळी सामन्यांमधून कपिलची कामगिरी यथातथाच राहिली असली तरी उप-उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालविरुद्ध त्याने दुसऱ्या डावात केवळ नऊ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. उप-उपांत्या सामन्यात हरयाणाची गाठ मुंबईशी पडली आणि हरयाणाने लढत गमावली असली तरी कपिलदेवने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. १९७८-७९ च्या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कपिलने ६२ धावा काढल्या. दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यातील सात बळीनी त्याला उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवून दिला आणि याच हंगामात कपिल पहिली कसोटी खेळला – पाकिस्तानविरुद्ध. १९७९-८० च्या हंगामात दिल्लीविरुद्ध १९३ धावांची खेळी हे त्याचे पहिले प्रथमश्रेणी शतक. या हंगामात तो हरयाणाचा कर्णधार होता आणि त्याच्या संघाने अतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. १९९०-९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना कपिलने (आणि हरयाणानेही) गाजवला. संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला, अ‍ॅबी कुरुविला अशा दिग्गजांचा समावेश असलेल्या मुंबई संघाला हरयाणाने पराभूत केले. हरयाणाच्या संघातील काही खेळाडू होते : दीपक शर्मा, अजय जडेजा, चेतन शर्मा, विजय यादव. मिळालेल्या शिकारींकडे पाहिल्यास कपिल त्याच्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत फारसा यशस्वी ठरला असा निष्कर्ष काढता येणार नाही पण त्याच्या बाऊन्सर्सची दहशत पाक फलंदाजांनी घेतली होती आणि त्याचा फायदा इतर गोलंदाजांना नक्कीच मिळाला होता. सादिक मोहम्मदला त्याने एका बहिर्डुल्यावर टिपले होते. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. भारतीयाचे कसोट्यांमधील हे पहिले अर्धशतक. मग कपिलने एक पंचांकडे फलंदाज बाद असल्याचा आग्रह धरण्यासाठीचा अपवाद वगळता, कारकिर्दीत केव्हाही मागे वळून पाहिले नाही. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर त्याचे पहिले कसोटी शतक आले, अवघ्या १३० चेंडूंमध्ये. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौऱ्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौऱ्यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता.

अविस्मरणीय! कपिल देव : – क्लाइव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजने पहिल्या दोन वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्या होत्या आणि पुडेन्शियल वर्ल्डकप तिसऱ्यांदा पटकावून हॅटट्रिक करण्यासाठी लॉईडचे कॅरेबियन सहकारी उत्सुक होते. पण माझ्या मनात मात्र वेगळेच आडाखे होते. तिसऱ्या वर्ल्डकपमधील सलामीच्या लढतीत मॅंचेस्टरच्या ओल्ड टॅफर्डवर भारताने विंडीजला ३४ धावांनी हरवण्याचा चमत्कार केला. विंडीजचा वर्ल्डकपमधला हा पहिलाच पराभव आणि या विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला. यशपाल शर्माच्या दमदार खेळीने भारताला विजय मिळवून दिला. परंतु भारत वि. झिम्बाब्वे हा टर्नब्रिज वेल्स मैदानातील सामना मात्र अविस्मरणीय ठरला. या सामन्यातील माझ्या झुंजार शतकी खेळीने नाट्यपूर्ण कलाटणी दिली.

झिम्बाब्वेसारख्या नवशिक्या संघाने भारताची अवस्था ४ बाद ९ अशी करून टाकल्यावर मी मैदानात उतरलो अन् बघता बघता सामन्याचा रंग पालटला. भारताने ९ बाद २६६ अशी मजल मारली. यष्टीरक्षक किरमाणीच्या साथीने मी नवव्या विकेटसाठी नाबाद १२६धावांची भागी रचली अन् त्यात किरीचा वाटा होता फक्त २४ धावांचा. पूल, कट, ड्राईव्ह मनमुरादपणे वापर करत मी नाबाद १७५ धावांच्या खेळीत ६ षटकार, १६ चौकार लगावले.[] बीबीसीच्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे या सामन्याचं चित्रीकरण झालं नाही. एका उत्साही क्रिकेट खेळाडूसिकाने मात्र याचं व्हिडिओ शूटिंग केल्याचं सांगण्यात येतं. पण मला मात्र ही खेळी बघायला मिळालेली नाही.

झिम्बाब्वेला हरवल्यामुळे भारताचाउपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला हरवण्याचा पराक्रम केला अन् चार वर्षापूवीर् अंतिम फेरी गाठणारा इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीतच गारद झाला. तमाम इंग्लिश पाठिराख्यांची निराशा झाली. २५ जून १९८३ रोजी भारताची गाठ पडली ती विंडीजशी. इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी भारतीय संघाला कमी लेखलं होतं. ‘बस ड्रायव्हर्स व्हसेर्स कंडक्टर्स’ असे मथळे ब्रिटिश टॅबलॉइडस्मध्ये झळकले. लॉर्डसवर प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव १८३ धावातच आटोपला.श्ाीकांतने गुडघ्यात वाकून मारलेला स्क्वेअर ड्राईव्ह अप्रतिम होता. शॉट ऑफ द मॅच असं याचं वर्णन करणं उचित ठरेल. श्ाीकांतने बेडर फलंदाजी करत ३८ धावा केल्या अन् हीच सामन्यातील सवोर्च्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

१८३ धावांचं माफक आव्हान विंडीजने स्वीकारलं, पण बल्लू संधूच्या इनस्विंगरने गॉर्डन ग्रिनीजला चकवलं. रिचर्डसने मात्र आक्रमक खेळ करत भारतीय गोलंदाजीची पिटाई करायला सुरुवात केली तेव्हा सामना झटपट संपणार अशी अटकळ लॉर्डसवरील प्रेक्षकांनी बांधली असावी. मदनलाल, बिन्नी यांच्या मिलिटरी मिडियम पेसवर हल्ला चढवत रिचर्डसने चौकारांची आतषबाजी सुरू केली. पण मदनलालने जिद्द सोडली नाही अन् रंगात आलेल्या रिचर्डसने मदनला उंच फटका लगावला तेव्हा मीच मागे पळत ‘माईन, माईन’ असे ओरडत सहकाऱ्यांना सावध करत रिचर्डसचा तो झेल टिपला. सहकाऱ्यांनी माझी पाठ थोपटली. आलिंगन दिलं. मोहिंदरने होल्डिंगला पायचीत पकडून विंडीजचा डाव १४० धावातच संपुष्टात आणून भारताच्या विजयावर शिक्क मोर्तब केलं. लॉर्डसच्या बाल्कनीत मी जेव्हा प्रुडेन्शियल र्वल्डकप स्वीकारला तेव्हा जल्लोष झाला. लंडनमधील भारतीय संघाच्या पाठिराख्यांनी दिवाळी साजरी केली. र्वल्डकप हिरोजना रेड कापेर्ट वेलकम मिळालं. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीत भारतीय संघासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही सारेजण भारावून गेलो.

र्वल्डकप पटकावल्यामुळे भारतात क्रिकेटला अधिकच उधाण आलं. बघता बघता क्रिकेटचं एका इंडस्ट्रीत रूपांतर झालं. १९८७ च्या र्वल्डकपचं यजमानपद भारत-पाकिस्तानला लाभलं. ब्रिटिशांच्या मक्तेदारीला शह बसला अन् प्रथमच र्वल्डकप स्पधेर्च्या यजमानपदाचा मान ब्रिटिशेतर देशांना लाभला. क्रिकेटमध्ये पैसा आला, अवघा भारत क्रिकेटमय झाला. क्रिकेटचे सूर सारेजण आळवू लागले.

पुरस्कार

[संपादन]

कसोटी सामने पुरस्कार

[संपादन]

कसोटी मालिकावीर

# मालिका हंगाम मालिका प्रदर्शन
इंग्लंड संघाचा भारत दौरा १९८१/८२ ३१८ धावा (६ सामने, ८ डाव, १x१००, १x५०); २४३.१-४०-८३५-२२ (२x५WI); ३ झेल
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा १९८२ २९२ धावा (३ सामने, ३ डाव, ३x५०); १३३-२१-४३९-१० (१x५WI)
वेस्टईंडीज संघाचा भारत दौरा १९८३/८४ १८४ धावा (६ सामने, ११ डाव); २०३.-४३-५३७-२९ (२x५WI, १x१०WM); ४ झेल
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा १९८५/८६ १३५ धावा (३ सामने, ३ डाव, १x५०); ११८-३१-२७६-१२ (१x५WI); ५ झेल

सामनावीर पुरस्कार

क्र. विरुद्ध स्थळ हंगाम सामना प्रदर्शन
इंग्लंड वानखेडे, मुंबई १९८१/८२ पहिला डाव: ३८ (८x४); २२-१०-२९-१
दुसरा डाव: ४६ (५x४); १३.२-०-७०-५
इंग्लंड लॉर्ड्स, लंडन १९९२/९३ पहिला डाव: ४१ (४x४); ४३-८-१२५-५
दुसरा डाव: ८९ (१३x४, ३x६); १०-१-४३-३
पाकिस्तान गद्दाफी, लाहोर १९८२/८३ पहिला डाव: ३०.५-७-८५-८
ऑष्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड १९८५/८६ पहिला डाव: ३८ (८x४); ३८-६-१०६-८
दुसरा डाव: ३-१-३-०
इंग्लंड लॉर्ड्स, लंडन १९८६ पहिला डाव: १ धाव; ३१-८-६७-१; १ झेल
दुसरा डाव: २३*(४x४, १x६); २२-७-५२-४
६* ऑष्ट्रेलिया चेपॉक, चेन्नई १९८६/८७ पहिला डाव: ११९ (२१x४);१८-५-५२-०; २ झेल
दुसरा डाव: १ धाव; १-०-५-०
श्रीलंका बाराबती, कटक १९८६/८७ पहिला डाव: ६० धावा; २६-३-६९-४; २ झेल
दुसरा डाव: १६-४-३६-१
पाकिस्तान नॅशनल मैदान, कराची १९८९/९० पहिला डाव: ५५ (८x४); २४-५-६९-४
दुसरा डाव: ३६-१५-८२-३

ODI Match Awards

[संपादन]

Man of the Series Awards

# Series (Opponents) Season Series Performance
1 Texaco Trophy (India in England ODI Series) 1982 107 (2 Matches & 2 Innings, 1x50); 20-3-60-0
2[] Benson & Hedges World Series Cup (Australia, New Zealand) 1985/86 202 Runs (9 Innings); 20/391; 7 Catches

Man of the Match Awards

S No Opponent Venue Season Match Performance
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड Woolloongabba, Brisbane १९८०/८१ ७५ (५१b, ९x४, ३x६); १०-०-३७-१; १ Catch
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज Albion Sports Complex, Berbice, गयाना १९८२/८३ ७२ (३८b, ७x४, ३x६); १०-०-३३-२; २ Catches
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे Nevill Ground, Tunbridge Wells १९८३ १७५* (१३८b, १६x४, ६x६); ११-१-३२-१; २ Catches
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड VCA Ground, Nagpur १९८४/८५ ५४ (४१b, ३x४, ४x६); १०-१-४२-१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड Woolloongabba, Brisbane १९८५/८६ ५४* (५३b, ५x४); १०-१-२८-१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड Sharjah १९८६/८७ ६४ (५४b, ५x४, १x६); ८-१-३०-१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड Chinnaswamy स्टेडियम, Bangalore १९८७/८८ ७२* (५८b, ४x४, १x६); १०-१-५४-०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे Gujarat स्टेडियम, Ahmedabad १९८७/८८ ४१* (२५b, २x४, ३x६), १०-२-४४-२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज Sharjah १९८९/९० ४१ (५०b, २x४, १x६); ७.४-१-१९-२
१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन १९८९/९० ४६ (३८b, ४x४, १x६); ९.५-१-४५-२
११ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका Kingsmead, Durban १९९२/९३ ३० (३७b, ५x४); १०-४-२३-३

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून 'देव' खेळला...!". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-06-18. 2020-07-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Kapil Dev-CRICKETER OF THE YEAR-1983". 2007-03-24 रोजी पाहिले.
  3. ^ "ही माझी सर्वोत्तम वेळ आहे: कपिल देव". The Sportstar Vol. 25 No. 31. 8 March 2002. 14 May 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 February 2014 रोजी पाहिले.
  4. ^ MoS awarded for the preliminary games. The figures are for the whole competition.
मागील:
सुनील गावसकर
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९८२इ.स. १९८४
पुढील:
सुनील गावसकर
मागील:
सुनील गावसकर
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९८४इ.स. १९८७
पुढील:
दिलीप वेंगसरकर

बाह्य दुवे

[संपादन]
साचा:S-sportsसाचा:S-ach
मागील
Sunil Gavaskar
Indian National Test Cricket Captain
1982–83 – 1983–84
पुढील
Sunil Gavaskar
मागील
Sunil Gavaskar
Indian National Test Cricket Captain
1984–85 – 1986–87
पुढील
Dilip Vengsarkar
मागील
Derek Parker
Nelson Cricket Club
Professional

1981
पुढील
Neal Radford
मागील
Richard Hadlee
World Record – Most Career Wickets in Test cricket
434 wickets (29.64) in 131 Tests
Held record 8 February 1994 to 27 March 2000
पुढील
Courtney Walsh

साचा:Indian Test Cricket Captains साचा:India ODI Cricket Captains

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत