एर इंडिया एक्सप्रेस
एर इंडिया एक्सप्रेस भारतातील केरळमधून स्वस्त दराने विमानसेवा देणारी एर इंडियाला सहाय्यकारी अशी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी पहिली एरलाइन्स आहे.[१] तिचे मुख्यालय कोची येथे आहे. या एरलाइन्सकडून मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये सेवा दिल्या जात आहेत. एर इंडिया लि.ला साहाय्यकारी असणाऱ्या एर इंडिया चार्टर लिमिेटेडच्या मालकीची आहे. सध्या प्रत्येक आठवडयाला १०० उडडाणे मुख्यत्वेकरून तामिळनाडूच्या दक्षिण राज्यामधून सुर ु आहेत.
इतिहास
[संपादन]मध्यपूर्व आशियामध्ये स्थायिक झालेल्या मल्याळी समाजातील लोकांच्या स्वस्त विमानसेवेच्या सततच्या मागणीमुळे मे २००४ मध्ये या विमानसेवेची स्थापना झाली. २९ एप्रिल २००५ रोजी तिरुवअंनंतपुरमपासून अबुधाबीपर्यंत पहिले उडडाण या विमानसेवेने केले.[२] दि. २२ फेब्रुवारी २००५ रोजी ७३७-८६ क्यू हे बोइंग विमान हे या कंपनीच्या ताफ्यातील पहिले विमान होते.
संयुक्त व्यवस्था
[संपादन]ह्या एरलाइन्सचे मुंबईमधील नरीमन पॉइंट येथील एर इंडिया इमारतीमध्ये मुख्यालय आहे.[३] डिसेंबर २०१२ मध्ये एर इंडिया सदस्य समितीने १ जानेवारी २०१३ पासून कंपनीचे मुख्यालय कोचीन येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.[४] केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री, के. सी. वेणुगोपाल यांनी १ जानेवारी २०१३ पासून टप्य्याटप्य्याने मुख्यालय कोचीन येथे स्थलांतरित करत असल्याचे जाहीर केले आहे.[५] या एरलाइन्सचा अभियांत्रिकी विभाग तिरुवअनंतपुरम येथे स्थलांतरित झालेला आहे. तिरुवअनंतपुरमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एर इंडिया चार्टर लि.च्या या एरलाइन्सच्या बोइंग ७३७-८०० विमानांची देखभाल, दुरुस्ती व इतर सुविधा ( एमआरओ ) प्राप्त करून घेण्यापूर्वी महत्त्वाची असणारी ‘सी’ तपासणी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सी दर्जाची तपासणी होऊ शकणारे त्रिवेंद्रम हे तिसरे शहर आहे. ३००० उड्डाणे किंवा १५ महिने यापैकी जे आधी पूर्ण होईल त्या विमानांसाठी सी दर्जाची तपासणी आवश्यक आहे. अभियंते विमानाच्या उड्डाणाचे नियंत्रण, विमानातील नादुरुस्त भागांची दुरुस्ती व विमानाच्या अंतर्गत व्यवस्थेची चाचणी इ. बाबी नेमून दिलेल्या मोजमापावर सी दर्जाची तपासणी केली जाते. सुरुवातीच्या काळात त्रिवेंद्रममध्ये एका वेळी २ विमानांना आणि आठवड्यात ३ विमानांची संपूर्ण तपासणी या एमआरओ सुविधेमध्ये होते. १६ डिसेंबर २०११ रोजी जवळजवळ ६.०७ हेक्टरमध्ये .११० कोटी रुपये किंमतीची एमआरओ सुविधा पार पाडली जात होती.
ताफा
[संपादन]डिसेंबर २०२५ च्या सुमारासची एर इंडिया एक्सप्रेसची विमाने:[६][७][८][९]
| विमान | सेवेत | खरेदीवर | प्रवासी क्षमता | नोंदी |
|---|---|---|---|---|
| एरबस ए३२०-२०० | १९ | — | १८० | जुनी विमाने टप्प्याटप्प्याने ताफ्यातून बाहेर काढली जातील[१०] |
| एरबस ए३२०नियो | १२ | — | १८६ | ४ विमाने एर इंडिया कडून हस्तांतरित केली जाणार आहेत[११][१२] |
| एरबस ए३२१नियो | २ | — | १९२ | |
| २ | २३२ | |||
| बोईंग ७३७-८०० | २६ | — | १८९ | जुनी विमाने टप्प्याटप्प्याने ताफ्यातून बाहेर काढली जातील[१०] |
| बोईंग ७३७ मॅक्स ८ | ५१[१३] | १६९ | ≤ १८९[१३] | २० पर्यायांसह ऑर्डर[१४][१५][१६] |
| बोईंग ७३७ मॅक्स १० | — | ठरायचे आहे | ||
| एकूण | ११२ | १६९ | ||
विमानांतर्गत सेवा
[संपादन]स्वस्त दरात सेवा देण्याऱ्या या विमानामध्ये प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे अल्पोपहार पुरविण्यात येतो. प्रवाशांसाठी थोडया प्रमाणात मनोरंजनाची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
अपघात आणि दुर्घटना
[संपादन]२२ मे २०१० रोजी एर इंडिया एक्सप्रेस विमान ८१२ बोइंग ७३७-८०० दुबई-मंगलोर मार्गावर मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना अपघात होऊन विमानातील १६६ जणांपैकी १५२ प्रवासी आणि ६ वैमानिक मृत्युमुखी पडले होते.[१७][१८][१९][२०][२१] २५ मे २०१० रोजी एर इंडिया एक्सप्रेस बोइंग ७३७-८०० दुबई ते पुणे मार्गावर प्रवास करताना सहवैमानिकाने विमानाचा ताब घेतला असताना अचानक वेगाने ७००० फूट खाली झेपावू लागले. परंतु त्याच वेळी कॉकपिटच्या बाहेर गेलेल्या वैमानिकाने परत कॉकपटमध्ये येऊन विमानाचा ताबा घेतला व पुढचा अनर्थ टाळला होता.[२२][२३][२४]
शेपटीतील कौशल्य
[संपादन]एर इंडियाचा एक्सप्रेसच्या प्रत्येक विमानाच्या शेपटीवर भारतीय संस्कृती, प्राचीन इतिहास आणि परंपरा यांचा मिलाफ असलेले नक्षीकाम दिसून येते.
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ↑ "'एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्यालय कोची येथे हलवणार'. ३१ डिसेंबर २०१०" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'ऑन बोर्ड एर इंडिया एक्स्प्रेस'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "आमच्याशी संपर्क साधा". एर इंडिया एक्सप्रेस. मुख्यालय : एर इंडिया एक्सप्रेस – इंडिया इमारत, नरीमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१, भारत’. ५ फेब्रुवारी २०१३
- ↑ "एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्यालय कोचीन येथे स्थलांतर करण्यास मान्यता Archived 2013-06-15 at the वेबॅक मशीन.". टाइम्स ऑफ इंडिया. १४ डिसेंबर २०१२. ५ फेब्रुवारी २०१३.
- ↑ "एर इंडिया एक्सप्रेसचा मार्ग लवकरच शहरातून सुरू". द हिंदू. ७ जानेवारी २०१३. ५ फेब्रुवारी २०१३ .
- ↑ "एर इंडिया एक्सप्रेस ताफा". फ्लाइटराडार२४ (इंग्रजी भाषेत). १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ↑ "ऑर्डर्स आणि डिलिव्हरीज". एरबस (इंग्रजी भाषेत). १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "ऑर्डर्स आणि डिलिव्हरीज". बोईंग (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "एर इंडिया एक्सप्रेसच्या ताफ्यात नवीन विमाने दाखल". एबीपी माझा. ३ ऑक्टोबर २०२३. ३ मे २०२६ रोजी पाहिले.
- 1 2 "टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली एर इंडिया एक्सप्रेसचा विस्तार". लाईव्ह मिंट (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०२५. १३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "एर इंडिया एक्सप्रेसला मूळ कंपनीकडून २० एरबस ए३२० विमाने मिळणार". फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी भाषेत). ८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
- ↑ फडणीस, अनीश (७ जुलै २०२४). "एर इंडिया २० एरबस विमानांसह एआय एक्सप्रेसचा ताफा मजबूत करणार". बिझनेस लाईन (इंग्रजी भाषेत). ८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
- 1 2 "एर इंडिया एक्सप्रेसमध्ये ५१ व्या बी७३७-८ विमानाचे स्वागत". हिंदुस्तान टाइम्स (इंग्रजी भाषेत). ३१ डिसेंबर २०२५. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ सिन्हा, सौरभ (१ जानेवारी २०२४). "एर इंडिया एक्सप्रेसने एआयएक्स विलीनीकरणासाठी एनसीएलटीकडे परवानगी मागितली". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०२४ रोजी पाहिले.
- ↑ "एर इंडियाने शाश्वत वाढीसाठी २९० बोईंग विमानांची निवड केली". बोईंग (Press release) (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी २०२३. १ जून २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "एर इंडियाची अतिरिक्त ३० बोईंग ७३७ विमानांसाठी ऑर्डर". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). २९ जानेवारी २०२६. २९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "'भारतामध्ये जेट कोसळून १५८ मुत्युमुखी , ८ बचावले'" (इंग्लिश भाषेत). 2010-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'मंगलोर मध्ये जेट विमान अपघातात १५८ मुत्युमुखी'" (इंग्लिश भाषेत). 2013-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'भारतामध्ये दुबईमधून निघालेले एर इंडियाचे विमान कोसळले'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'एर इंडियामध्ये घबराट'" (इंग्लिश भाषेत). 2010-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'मंगलोरमध्ये विमान कोसळून १६० जण ठार'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'अहवाल : सहवैमानिकाची गंभीर चूक'" (इंग्लिश भाषेत). 2015-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'एर इंडियामधील घाबरलेल्या सहवैमानिकाकडून विमान खोल गर्तेत'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'भित्रट सहवैमानिकामुळे विमानातील भारतीय प्रवासांच्या हवेत गटांगळया'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)