महादेव कोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महादेव कोळी जमातीबद्दल लिखित, मौखिक आणि ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ आढळतात.त्याद्वारे महादेव कोळी समजबद्दल निश्चितच अंदाज बांधता येतो.

वस्तीस्थान[संपादन]

महादेव कोळी समाजाचे मूळ वस्तीस्थान हे सह्याद्री पर्वतरांग आहे. महादेव कोळी समाजाचे लोक हे बालाघाट आणि महादेव डोंगर रांगेतून हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आले. असे कॅप्टन मँकीटोश यांनी केलेल्या लेखणात म्हणलं आहे. त्यांची देवदेवता आणि गोत्र हे जुन्नर परिसरात मोठया प्रमाणात आहे त्यामुळेच महादेव कोळी समाजाचे पहिले वस्तीस्थान येथेच होते.

सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील सुरगाणापर्यंत जवळपास 120 मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे. आजच्या काळात पुणे, ठाणे, अहमदनगर, नाशिक, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात महादेव कोळी समाजाचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. महादेव कोळी समाज हा पूर्वीपासून जंगलाजवळ आणि नदी-खोरे यांच्या दऱ्याखोऱ्यात वसलेला आहे. महादेव कोळी समाज ज्या भागात राहतो त्याला मावळ,नहेर,डांगण असे म्हणले जाते. कोकणात देखील मोठ्या प्रमाणात या समाजाची वस्ती आहे.

महादेव कोळी समाजाचे गावे ही सलग आणि सारखे असतात. यांच्या गावातील वस्ती ह्या एकरूप असतात. घरे ही कौलरू आणि दगड, विटा, माती यांनी तयार केलेली असतात. या समाजात सालोख्याचे वातावरण नेहमी दिसते.महादेव कोळी ज्या प्रदेशात राहत असे त्यास पूर्वीस कोळवण असे संबोधले जात असे. कोळवण म्हणजे कोळ्यांचे वन किंवा कोळ्यांचे रान होय.याचाच अर्थ महादेव कोळयांची वस्ती प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यात असे म्हणून त्यांना 'डोंगर कोळी' असे देखील म्हणत.

उपजीविका व व्यवसाय[संपादन]

महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातला रान मेवा गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.[१] तसेच अकोले तालुक्यातील महादेव कोळी समाज देखील रानं मेव्यावर विशिष्ट भर देतो.

महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर झालेला संहार[संपादन]

शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. [२]

संदर्भ[संपादन]

  • Transactions of the Bombay geographical Society
  • Ahmadnagar Gazetteer
  • The Tribes And castes of the Central Provinces of India
  • The Tribes And castes of Bombay
  • Report of the auxiliary And territorial forces committee.
  • The mahadev kolis
  • Imperial gazetteer of India
  • Census of India 1901
  • ठाणे गॅझेटीअर- 1882,
  • अहमदनगर गॅझेटीअर - 1881