मल्हार कोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मल्हार कोळी हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. ह्या समाजातील लोक मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. यांना पानभरी कोळी असेही म्हणतात. हे नाव त्यांच्या पाणी भरण्याच्या कामावरून पडले असावे. हे ठाणे,पालघर , मुंबई व देशावर आढळतात. यांच्यात भोईर, जाधव,तुंबडा, हाडल,तांडेल,मातेरा, सुतार, केरव, लांग, पोवार, शरणपाद, शेलार, बुंधे,सोज्वळ आणि वेखंडे ही आडनावे आढळतात. पंढरपुराजवळ हे मल्हार कोळी येसकर (वेसकर) नाव लावतात. अहमदनगर जिल्ह्यातील मल्हार कोळ्यांपैकी बरेचजण शेती करतात.हे लोक मराठेशाहीत सिंहगड, तोरणाराजगड यांचे वंशपरंपरागत रक्षक (गडकरी) होते. ठाणे जिल्ह्यात अनेक मल्हार कोळी कुणब्यांत समाविष्ट झाले. १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे यांची लोकसंख्या ८९,०४७ होती.