नवलेवाडी
Appearance
नवलेवाडी | |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ३७८२ २०११ |
दूरध्वनी संकेतांक | ०२४२४ |
टपाल संकेतांक | ४२२६०१ |
वाहन संकेतांक | महा-१७ |
निर्वाचित प्रमुख | सौ नवले (सरपंच) |
प्रशासकीय प्रमुख | ग्रामसेवक (श्रीमती गिरी) |
संकेतस्थळ | nawalewadi.com |
नवलेवाडी हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात येथील लोकांचे योगदान महत्त्वाचे होते.
या गावाला इ.स. १८७५ पासूनचा इतिहास आहे.[ संदर्भ हवा ] १९१८ साली मामलेदाराच्या खुनाच्या खटल्यात इंग्रज सरकारने दाखल केलेल्या खटल्यात या गावातील प्रभू नवले व नरसु सहादू नवले या दोघा भावंडांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
१९४२ साली पुकारलेल्या महात्मा गांधी भारत छोडो आंदोलनच्या साठी येथील २७ स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश सरकारला विविध प्रकारे जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या नेत्यांना भूमीगत अवस्थेत मदत करण्याचे काम स्त्री-पुरुषांनी केले.