इ.स. १९४२
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे |
वर्षे: | १९३९ - १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- जानेवारी १३ - अमेरिकेने जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात पाठविण्यास सुरुवात केली.
- जानेवारी २५ - दुसरे महायुद्ध - थायलंडने युनायटेड किंग्डम व अमेरिके विरुद्ध युद्ध पुकारले.
- जानेवारी २६ - दुसरे महायुद्ध - आयर्लंडमध्ये अमेरिकन सैन्य उतरले.
- फेब्रुवारी ३ - दुसरे महायुद्ध - नाझींनी पिएर लव्हालला फ्रांसच्या पंतप्रधानपदी बसवले.
- फेब्रुवारी ७ - क्रोएशियातील बान्या लुका गावात नाझींनी ५५१ मुलांसह २,३०० नागरिकांना मारले.
- फेब्रुवारी १५ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
- फेब्रुवारी २२ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्समध्ये पराभव अटळ दिसताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
- फेब्रुवारी २४ - व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
- फेब्रुवारी २७ - दुसरे महायुद्ध - जपानच्या लढाउ विमानांनी अमेरिकेच्या विमानवाहू जहाज यु.एस.एस. लॅंगली बुडवले.
- मार्च ३ - दुसरे महायुद्ध - जपानी वायुदलाने पश्चिम ऑस्ट्रेलियातील ब्रूम गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार.
- मार्च ८ - दुसरे महायुद्ध - जावामध्ये नेदरलॅंड्सच्या सैन्याने जपान समोर शरणागती पत्करली.
- मार्च ८ - दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकले.
- एप्रिल १८ - दुसरे महायुद्ध - पिएर लव्हाल विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- एप्रिल २६ - मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.
- मे ४ - दुसरे महायुद्ध - कॉरल समुद्राची लढाई सुरू.
- मे ९ - दुसरे महायुद्ध - बेलग्रेडमध्ये ज्यू व्यक्तिंची सैनिकांकडून सामूहिक हत्या.
- मे १२ - दुसरे महायुद्ध - खार्कोवची दसरी लढाई.
- मे १२ - ज्यूंचे शिरकाण - ऑश्वित्झ कॉॅंसेन्ट्रेशन कॅम्पमध्ये १,५०० ज्यू व्यक्तिंना विषारी वायूने मारण्यात आले.
- मे २२ - दुसरे महायुद्ध - मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात पदार्पण केले.
- मे ३० - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डमच्या १,००० विमानांनी जर्मनीच्या कोलोन शहरावर तुफान बॉम्बफेक केली.
- मे ३१ - दुसरे महायुद्ध - जपानच्या पाणबुड्यांनी सिडनीवर हल्ला केला.
- मे ३१ - दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेने ईंग्लंडमधील कोव्हेन्ट्र गावावर बॉम्बफेक केली.
- जून ७ - दुसरे महायुद्ध - जपानचे सैनिक एल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु व किस्का बेटांवर उतरले.
- जून ८ - दुसरे महायुद्ध - जपानच्या पाणबुड्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी व न्यूकॅसल शहरांवर बॉम्बफेक केली.
- जून २१ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने टोब्रुक जिंकले.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै २८ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाच्या अध्यक्ष जोसेफ स्टालिनने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणाऱ्या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.
- ऑगस्ट ७ - दुसरे महायुद्ध - ग्वादालकॅनालची लढाई सुरू.
- ऑगस्ट ८ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत ६ जर्मन व्यक्तींना हेर असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड.
- ऑगस्ट ८ - चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉॅंग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला.
- ऑगस्ट ९ - चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.
- डिसेंबर १६ - ज्यूंचे शिरकाण - हाईनरिक हिमलरने रोमा(जिप्सी) लोकांना कत्तलीसाठी ऑश्विझला पाठविले.
जन्म
[संपादन]- जानेवारी २ - डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी.
- जानेवारी १७ - मुहम्मद अली, अमेरिकन मुष्टीयोद्धा.
- फेब्रुवारी ११ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- फेब्रुवारी १४ - मायकेल ब्लूमबर्ग, न्यू यॉर्कचा महापौर.
- फेब्रुवारी २४ - जोसेफ लीबरमन, अमेरिकन राजकारणी.
- मार्च १ - रिचर्ड मायर्स, अमेरिकन सेनापती.
- मार्च ११ - पिटर आयरी, अभिनेता.
- मे ९ - जॉन ऍशक्रॉफ्ट, अमेरिकन सेनेटर.
- मे २४ - अली बाकर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै १३ - हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
- जुलै २६ - व्लादिमिर मेचियार स्लोव्हेकियाचा पंतप्रधान.
- ऑगस्ट ४ - डेव्हिड लॅंग, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- सप्टेंबर १६ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
- सप्टेंबर २५ - पीटर पेथेरिक, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर १४ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.
मृत्यू
[संपादन]- फेब्रुवारी ११ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.
- मे ३ - थोर्वाल्ड स्टॉनिंग, डेन्मार्कचा पंतप्रधान.