कतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कतार
دولة قطر
दौलत कतार
कतारचा ध्वज कतारचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: अस्-सलाम अल्-आमिरी
कतारचे स्थान
कतारचे स्थान
कतारचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
दोहा
अधिकृत भाषा अरबी
सरकार अमिराती (संपूर्ण एकाधिकारशाही)
 - राष्ट्रप्रमुख तमीम बिन हमाद अल थानी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३ सप्टेंबर १९७१ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ११,४३७ किमी (१४८वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१० २१,५५,४४६[१] (१४२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२३.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २९८.४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,४५,८९४ अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८०३[३] (अति उच्च) (३८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन कतारी रियाल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ QA
आंतरजाल प्रत्यय .qa
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९७४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


कतार (अरबी: قطر‎) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१४ साली कतारची लोकसंख्या सुमारे २१ लाख होती ज्यापैकी केवळ ११ टक्के लोक कतारी नागरिक होते व उर्वरित सर्व रहिवासी येथे स्थलांतरित होऊन आलेले आहेत.

प्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.

वार्षिक दरडोई उत्पन्नानुसार कतार जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचेनैसर्गिक वायूचे साठे आहेत. कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था विकसित आहे. अरब जगतात व अरब संघात कतारचे मोठे सामर्थ्य आहे. २०२२ फिफा विश्वचषकासाठी कतारची यजमानपदी निवड झाली आहे. अल जजीरा, कतार एअरवेज इत्यादी कतारी कंपन्या झपाट्याने वाढत आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतुःसीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Populations". Qsa.gov.qa. Archived from the original on 2010-07-09. 2010-10-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Report for Selected Countries and Subjects (PPP valuation of country GDP)". IMF. October 2014.
  3. ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: