कतार एअरवेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कतार एअरवेज
आय.ए.टी.ए.
QR
आय.सी.ए.ओ.
QTR
कॉलसाईन
QATARI
स्थापना २२ नोव्हेंबर १९९३
हब हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (दोहा)
फ्रिक्वेंट फ्लायर क्यूमाइल्स
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या १४९
गंतव्यस्थाने १४६
ब्रीदवाक्य World's 5-star airline
पालक कंपनी कतार सरकार
मुख्यालय दोहा, कतार
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे कतार एअरवेजचे बोईंग ७७७ विमान

कतार एअरवेज (अरबी: القطرية,; अल कतारिया) ही मध्य पूर्वेतील कतार ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९३ साली स्थापन झालेली कतार एअरवेज दोहाजवळील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगातील १४५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. ऑक्टोबर २०१३ पासून कतार एअरवेज वनवर्ल्ड ह्या संघटनेचा सदस्य आहे.

कतार एअरवेज जगातील झपाट्याने वाढणाऱ्या विमानकंपन्यापैकी एक आहे. जुलै २०१३ पासून कतार एअरवेज स्पेनमधील एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबचा प्रमुख प्रायोजक आहे. सध्या भारतामधील खालील १० विमानतळांवर कतार एअरवेजची प्रवासी व मालवाहतूक सुरू आहे.

  1. अहमदाबाद
  2. अमृतसर
  3. बंगळूर
  4. चेन्नई
  5. दिल्ली
  6. गोवा
  7. हैदराबाद
  8. कोची
  9. कोलकाता
  10. कोळिकोड
  11. मुंबई

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: