Jump to content

मुक्ताईनगर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मुक्ताईनगर तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २२९ मी
हवामान
तापमान
• उन्हाळा


• ४६ °C (११५ °F)
मोठे शहर १) मुक्ताईनगर

२) अंतुर्ली

जवळचे शहर भुसावळ, जळगाव
प्रांत महाराष्ट्र
विभाग नाशिक
जिल्हा जळगाव
लोकसंख्या १,६३,४४४[] (२०११)
भाषा मराठी
आमदार चंद्रकांत निंबा पाटिल
संसदीय मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ
कोड
पिन कोड
दूरध्वनी
जनगणना कोड
आरटीओ कोड

• ४२५३०६
• +०२५८३
• ००१४ (२०११)
• एम एच १९
पुर्णा नदी, मुक्ताईनगर
चांगदेव मंदिर, मुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुका (इंग्रजी : Mukatainagar taluka) हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. हा तालुका उत्तर महाराष्ट्र मध्ये आहे[].मुक्ताईनगर शहर हे मुक्ताईनगर तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

या तालुक्याची लोकसंख्या एकूण १,६३,४४४ आहे आणि क्षेत्रफळ ६३,९६५ आहे.[]

इतिहास

[संपादन]

१९०६ नंंतर पूर्व खानदेश निर्माण झाला. इ.स. १९०६ पूर्वी पूर्व खानदेश हा खान्देश जिल्ह्यातील एक भाग होता. मुक्ताईनगर मधील क्षेत्र त्याकाळी या विभागांचा भाग होते.

शैक्षणिक सूवीधा

[संपादन]

मुक्ताईनगर तालुक्यात गो.ग.खडसे महाविद्यालय आहे , त्यात कला आणि विज्ञानचे पद्विऊत्तर , पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात.[]

हवामान

[संपादन]

मुक्ताईनगर तालुक्यामध्ये उन्हाळ्यात तापमान ४६° सेल्सियस पर्यंत होते[]

राजकारण

[संपादन]

मुक्ताईनगर तालुका हा मुक्ताईनगर तालुका मतदारसंघ भाग आहे. मुक्ताईनगर तालुक्या बरोबरच बोदवड तालुकासुद्धा या मतदार संघाचा भाग आहे. हा तालुका रावेर लोकसभा मतदारसंघ एक भाग आहे.

१९८९ पासून तर २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे येथील आमदार होते[] माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील १९६८ला येेेेथूनठी आमदारकी साठी निवळून आल्या होत्या. ती निवळणुक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील दुसरी नीवळणुक होती ; पहिल्यांदा त्या जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सध्याच्या खासदार रक्षा खडसे ह्या मुक्ताईनगर तालुक्यातील आहेत.२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार येथून निवळून आला[]

भूगोल

[संपादन]

पूर्णा नदी या तालुक्यातून पूर्व ते पश्चिम दिशेला वाहते. तालुक्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. या तालुक्याच्या पूर्व सीमेवर बुलढाणा जिल्हा आहे तर उत्तरेस मध्य प्रदेश राज्य आहे. मुक्ताईनगर तालुक्याच्या पश्चिमेस भुसावळ तालुका आहे आणि मुक्ताईनगरची दक्षिण सीमा बोदवड तालुक्याला लागून आहे.

वन्यजीवन

[संपादन]

मुक्ताईनगर तालुक्यातील उत्तरेकडील जंगलात कोल्ह्यांचे अस्तित्त्व आहे. अंतुर्ली जवळील जंगलात १ जानेवारी २०२१ला कोल्हा आढळला होता.[] १२ ऑगस्ट २०१८ला या तालुक्यातील उत्तर-पूर्व दिशेकडील जंगलात वाघ आढळून आला होता. या बातम्यांवरून निष्कर्ष काढता येतो की मुक्ताईनगर तालुक्यातील उत्तरेकडील जंगलात, डोलारखेडा गावाजवळील जंगलात वाघ आहेत.[][१०][११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ District census handbook Jalgaon. p. 172.
  2. ^ "लोकमत जळगाव - मुक्ताईनगर तालुक्याच्या दाराशी कोरोणा". जळगाव: लोकमत बातमीपत्र. २०२०. pp. १.
  3. ^ District census handbook. महाराष्ट्र: Directorate of census operations. 2014. p. 172.
  4. ^ Khadse college, Computer department (२०२०). "खडसे महाविद्यालय". मुक्ताईनगर , महाराष्ट्र: खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर. pp. १.
  5. ^ "मुक्ताईनगर मध्ये तापमान ४६°से". जळगाव, महाराष्ट्र.: लोकमत पेपर. २०२०. pp. १.
  6. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/what-eknath-khadse-said-after-defeat-of-daughter-rohini-on-muktainagar-vidhan-sabha-seat/articleshow/71741189.cms
  7. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/what-eknath-khadse-said-after-defeat-of-daughter-rohini-on-muktainagar-vidhan-sabha-seat/articleshow/71741189.cms
  8. ^ https://www.lokmat.com/jalgaon/murder-one-amalner-town-a348/amp/
  9. ^ https://m.lokmat.com/jalgaon/tiger-found-dead/
  10. ^ https://m.lokmat.com/jalgaon/it-clear-those-tigers-were-killed-muktainagar-taluka/
  11. ^ https://www.esakal.com/uttar-maharashtra/muktainagar-news-tiger-suspected-death-105013