लास व्हेगस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लास व्हेगास
Las Vegas

LasVegasCityMontage.jpg

Flag of Las Vegas, Nevada.svg
ध्वज
लास व्हेगास is located in नेव्हाडा
लास व्हेगास
लास व्हेगासचे नेव्हाडामधील स्थान
लास व्हेगास is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
लास व्हेगास
लास व्हेगासचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 36°10′30″N 115°08′11″W / 36.175, -115.13639गुणक: 36°10′30″N 115°08′11″W / 36.175, -115.13639

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नेव्हाडा
स्थापना वर्ष इ.स. १९०५
क्षेत्रफळ ३५१.७ चौ. किमी (१३५.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,००१ फूट (६१० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५,८३,७५८
  - घनता १,६६० /चौ. किमी (४,३०० /चौ. मैल)
  - महानगर १९,५१,२६१
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
www.lasvegasnevada.gov


लास व्हेगास हे अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या दक्षिण भागात लेक मिशिगनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून ते लॉस एंजेल्स शहराच्या ईशान्येला २६५ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.८४ लाख शहरी व १९.५१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले लास व्हेगास अमेरिकेमधील ३०वे मोठे शहर व महानगर क्षेत्र आहे.

येथील असंख्य कॅसिनो, जुगार अड्डे तसेच इतर मनोरंजन सोयींसाठी लास व्हेगास जगभर प्रसिद्ध आहे. लास व्हेगासला जगाची विरंगुळा राजधानी ह्या टोपणनावाने ओळखले जाते. येथील ४.२ मैल लांबीच्या लास व्हेगास बुलेव्हार्ड (द स्ट्रिप) ह्या रस्त्यावर जगातील काही सर्वात मोठी हॉटेल्स व कॅसिनोज स्थित आहेत.


इतिहास[संपादन]

लास व्हेगासची स्थापना इ.स. १९०५ साली रेल्वेमार्गावरील एक गाव म्हणून करण्यात आली. इ.स. १९३५ साली येथून ३० मैल अंतरावर हूव्हर धरण बांधून पूर्ण करण्यात आले व त्यानंतर ह्य शहराचा झपाट्याने विकास झाला.

भूगोल[संपादन]

लास व्हेगास नेव्हाडा राज्याच्या आग्नेय भागातील मोहावे वाळवंटाच्या अत्यंत रूक्ष परिसरात वसले असून येथील केवळ ०.०३ टक्के क्षेत्र जलव्याप्त आहे.

हवामान[संपादन]

लास व्हेगासमधील हवामान साधारणपणे उष्ण व रूक्ष आहे. येथील उन्हाळे तीव्र तर हिवाळे सौम्य असतात. येथे हिमवर्षा क्वचितच होते.

हवामान तपशील: मॅककॅरन विमानतळ
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 77
(25)
87
(30.6)
92
(33.3)
99
(37.2)
109
(42.8)
116
(46.7)
117
(47.2)
116
(46.7)
113
(45)
103
(39.4)
87
(30.6)
78
(25.6)
११७
सरासरी कमाल °फॅ (°से) 57.1
(13.94)
63.0
(17.22)
69.5
(20.83)
78.1
(25.61)
87.8
(31)
98.9
(37.17)
104.1
(40.06)
101.8
(38.78)
93.8
(34.33)
80.8
(27.11)
66.0
(18.89)
57.3
(14.06)
७९.८५
(२६.५८३)
सरासरी किमान °फॅ (°से) 36.8
(2.67)
41.4
(5.22)
47.0
(8.33)
53.9
(12.17)
62.9
(17.17)
72.3
(22.39)
78.2
(25.67)
76.7
(24.83)
68.8
(20.44)
56.5
(13.61)
44.0
(6.67)
36.6
(2.56)
५६.२६
(१३.४७७)
विक्रमी किमान °फॅ (°से) 8
(−13)
16
(−8.9)
19
(−7.2)
31
(−0.6)
38
(3.3)
48
(8.9)
56
(13.3)
54
(12.2)
43
(6.1)
26
(−3.3)
15
(−9.4)
11
(−12)
वर्षाव इंच (मिमी) 0.59
(15)
0.69
(17.5)
0.59
(15)
0.15
(3.8)
0.24
(6.1)
0.08
(2)
0.44
(11.2)
0.45
(11.4)
0.31
(7.9)
0.24
(6.1)
0.31
(7.9)
0.40
(10.2)
४.४९
(११४)
वर्षावाचे दिवस (≥ 0.01 in) 3.4 3.5 3.6 1.8 1.6 0.7 2.6 3.0 1.9 1.8 1.8 2.9 २८.६
सूर्यप्रकाश (तास) 244.9 248.6 313.1 345.0 387.5 402.0 390.6 368.9 336.0 303.8 246.0 235.6 ३,८२२
संदर्भ क्र. १: NOAA[१][२]
संदर्भ क्र. २: HKO (sun only)[३]

जनसांख्यिकी[संपादन]

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९०० २५
इ.स. १९१० ८०० +३१००%
इ.स. १९२० २,३०४ +१८८%
इ.स. १९३० ५,१६५ +१२४%
इ.स. १९४० ८,४२२ +६३%
इ.स. १९५० २४,६२४ +१९२%
इ.स. १९६० ६४,४०५ +१६१%
इ.स. १९७० १,२५,७८७ +९५%
इ.स. १९८० १,६४,६७४ +३०%
इ.स. १९९० २,५८,२९५ +५६%
इ.स. २००० ४,७८,४३४ +८५%
इ.स. २०१० ५,८३,७५६ +२२%

२०१० च्या जनगणनेनुसार लास व्हेगास शहराची लोकसंख्या ५,८३,७५६ इतकी होती जी २००० सालापेक्षा २२ टक्क्यांनी अधिक आहे. स्थापनेपासून लास व्हेगासची लोकसंख्या सतत वाढतच राहिली आहे. येथील अनुकूल हवामान, पर्यटन उद्योगामुळे उपलब्ध असलेल्या नोकर्‍या इत्यादी कारणांस्तव अमेरिकेमधील इतर भागांमधून येथे स्थलांतर सुरूच आहे.

अर्थव्यवस्था[संपादन]

पर्यटन हा लास व्हेगासमधील सर्वात मोठा उद्योग आहे. येथील रूक्ष जमिनी कोणत्याही प्रकारच्या शेतीस अनुकूल नाही.

दालन[संपादन]

बेलाजियो  
हॉटेल पॅरिस लास व्हेगासमधील आयफेल टॉवरची प्रतिकृती  
एम.जी.एम. ग्रँड  
सीझर्स पॅलेस  

शहर रचना[संपादन]

लास व्हेगास स्ट्रिपचे विस्तृत चित्र

संदर्भयादी[संपादन]

  1. NCDC: U.S. Climate Normals. May 6, 2010 रोजी पाहिले.
  2. Record Max/Min Temperature. May 5, 2009 रोजी पाहिले.
  3. Climatological Normals of Las Vegas. May 6, 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: