नेव्हिल चेम्बरलेन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आर्थर नेव्हिल चेम्बरलेन (मार्च १८, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ९, इ.स. १९४०) हा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. हुजुर पक्षाचा नेता असलेला चेम्बरलेन मार्च १९३७ ते मे १९४० पर्यंत सत्तापदावर होता.
चेम्बरलेनला त्याच्या अॅडॉल्फ हिटलरला झुकते माप देण्याच्या धोरणाबद्दल आणि १९३८चा म्युनिक तह करण्याबद्दल प्रसिद्धी मिळाली. या तहानुसार चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलांड प्रदेश जर्मनीच्या हवाली करण्यात आला. जर्मनीने केलेल्या पोलंडवरील आगळीकीनंतर चेम्बरलेनने सप्टेंबर ३, इ.स. १९३९ रोजी युद्ध पुकारले व पुढील आठ महिने युनायटेड किंग्डमचे नेतृत्त्व केले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||