थोरला पिट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विल्यम पिट(थोरला) | |
|
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
|
|
| कार्यकाळ ३० जुलै १७६६ – १४ ऑक्टोबर १७६८ |
|
| राजा | तिसरा जॉर्ज |
|---|---|
| मागील | चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ |
| पुढील | ऑगस्टस फिट्झरॉय |
|
|
|
| जन्म | १५ नोव्हेंबर, इ.स. १७०८ लंडन |
| मृत्यू | ११ मे, इ.स. १७७८ (वय ६९) केंट |
| सही | |
विल्यम पिट, चॅटहॅमचा पहिला अर्ल (इंग्रजी: William Pitt, 1st Earl of Chatham; नोव्हेंबर १५, इ.स. १७०८ - मे ११, इ.स. १७७८) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
या विल्यम पिटने फ्रेंच व इंडियन युद्धादरम्यान परराष्ट्रसचिवपदावर असताना कीर्ती मिळवली.अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहराला याचे नाव आहे. याशिवाय न्यू हॅम्पशायरमधील पिट्सबर्ग व व्हर्जिनियातील पिट्सिल्व्हेनिया काउंटीलाही याचेच नाव आहे. चॅटहॅमचा पहिला अर्ल असल्याने ते नाव न्यू जर्सीतील चॅटहॅम गावाला व चॅटहॅम विद्यापीठाला देण्यात आले.
या विल्यम पिटच्या मुलाचे नावही विल्यम पिट होते व तोही युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता, म्हणून वडिलांना थोरला पिट तर मुलास धाकटा पिट म्हणतात.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||||