आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फील्ड मार्शल आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन (मे १, इ.स. १७६९ - सप्टेंबर १४, इ.स. १८५२) हा एक इंग्लिश सेनापती होता.
ब्रिटन च्या इतिहासातील एक अंत्यंत चाणाक्ष सेनापती, ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून वेलस्ली याचे नाव प्रसिद्ध आहे. नेपोलियन सारख्या महान सेनापतीला त्याने वारंवार जेरीस आणले व वॉटर्लूच्या युद्धात त्याचा अंतिम पराभव करुन युरोपमधील नेपोलियनची सद्दी संपुष्टात आणून जगाच्या इतिहासाला वेगळे वळळ दिले. वेलेस्ली भारताच्या, खासकरून मराठ्यांच्या इतिहासात एक महत्वाची व्यक्ति आहे. नेपोलियनला जेरीस आणायच्या आगोदर त्याने मराठ्यांच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमांमुळे मराठी साम्राज्याला देखिल उतरती कळा आणली व काही वर्षातच मराठी साम्राज्य लयाला गेले.
अनुक्रमणिका |
[संपादन] भारतातील दिवस
[संपादन] म्हैसुर मधिल संघर्ष
१८९६ मध्ये त्याने भारतातील रेजमेंट मध्ये नियुक्ति करुन घेतलि. त्यामागील त्याचा चाणाक्ष हेतु होताच. पुढील वर्षिच त्याचा भावाची ( रिचर्ड वेलस्ली ) नियुक्ति भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून झालि. व त्याचा फायदा त्याने आपलि बढती करुन घेण्यास केला. १७९८ मधिल टिपु सुलतान बरोबरील युद्धात त्याला आर्मि डिव्हिजनची जवाबदारी देण्यात आलि. टिपुचा पाडाव झाल्यानंतर रिचर्डने त्याची नियुक्ति श्रीरंगपट्ट्ण चा गव्हर्नर म्हणून केलि.
[संपादन] मराठ्यां विरुद्धची मोहिम
दुस-या बाजीरावने इंग्रजांशी संगनमत केल्यावर शिंदे आणि इंग्रजाच्यात दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. मराठ्यांच्या बरोबरील युद्धात त्याने भॉगोलिक परिस्थितीचा वापर आपल्या सैन्याचा बचावासाठि कसा करावा यात तो निपुण झाला. त्याने मराठ्यांचा जालना जिल्ह्यात आष्टी येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पराभव केला. तसेच अकोला जिल्ह्यातील आडगाव येथे पुन्हा मराठ्यांवर मात केलि. अमरावती जिल्ह्यातील गाविलगड येथे किल्यावर आक्रमण करुन पुन्हा एकदा पराभव केला. त्याने किल्ला जिंकल्यानंतर देखिल किल्याचे महत्वाचे भाग निकामी केले. त्यानंतर इंग्रजाची मराठ्याविरुद्धच्या पुढील युद्धात किल्यांवरील युद्धात हिच योजना कायम राहिली.
[संपादन] स्पेन पोर्तुगाल मधिल आघाडि
भारतातील अनेक आघाड्यांवरील बजावलेली कामगीरी पाहुन वेलस्लीला परत इंग्लंडला बोलवणे आले. सुरुवातिला वेलस्लीला पोर्तुगालच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. तिथेहि त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली.
यावेळेस नेपोलियन चा पुर्ण युरोपवर दहशत होती. समुद्रावर व जगात इतरत्र जरी इंग्रजांची चलती असलि तरी नेपोलियने संपुर्ण युरोपवर आपले स्वामित्व गाजवायला सुरुवात केलि होती. एवढा प्रबळ शेजारी असणे इंग्लंडला परवडणारे नव्हते. वेलस्लीने पटकन जाणले कि फ्रेंच सैन्य बहुतांशी अश्या व देशात लढते ज्या ठिकाणी चांगल्या दळणवळणाच्या सोइ आहेत. त्याने पोर्तुगाल मध्ये पहिल्या प्रथम फ्रेंचाचे रसद व दळणवळणाचे रस्ते तोडुन टाकले. आणि अनेक पोर्तुगीजांना फ्रेंचाविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. त्याच्या युद्धाआगोदरची तयारी अंत्यंत काटेकोर असे व शत्रुला आपल्या सोइच्या जागी युद्ध करण्यास भाग पाडे.
१८१० मध्ये त्याने सर्वोत्तम फ्रेंच मार्शल आंद्रे मासिना पोर्तुगाल मधुन माघार घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने स्पेनमधिल फ्रेंचाची ठाण्यांवर प्रतिआक्रमण सुरु केले व त्यात सालामांका विटोरिया येथे लाक्षणीय विजय मिळवले.
नेपोलियनच्या रशियामधिल घोडचुकिनंतर १८१४ मध्ये नेपोलियन साम्राज्या कोसळले. त्यानंतर वेलस्लीने फ्रांसमध्ये आक्रमण करुन टुलोज येथे विजय मिळवला
[संपादन] वाटर्लुचे युद्ध
१८१५ नेपोलियन एल्बा येथुन नजर कैदेतुन सुटल्या नंतर पुन्हा पॅरिसला आला व आपले साम्राज्या पुनःप्रस्थापित करण्याच्या उद्दोगाला लागला. त्याने आपले मोठे सैन्या पुन्हा एकत्र केले व आपल्या जुन्या शत्रुंविरुद्धा आघाडि उघडलि. हॉलंड , प्रशिया, बेल्जियम व ब्रिटन यांनी देखिल प्रत्युतर म्हणून नेपोलियन विरुद्ध संयुक्त आघाडि उघडली. या आघाडिचे नेतुर्त्व वेलस्ली कडे देण्यात आले. व १८ जुन १८१५ रोजी वाटर्लु येथे दोन्हि फॉजा एकमेकांना भिडल्या.
वेलस्ली ने नेहेमीच्या पद्धतीने युद्ध केले. त्याने युद्धभूमीवर आगोदर येउन आपल्या सैन्यासाठि टेकडीच्या उताराची उपयुक्त जागा निवडली होती. त्याने आपले सैन्य नेपोलियनच्या सैन्याला आडवे घातले व युद्द करायला भाग पाडले. नेपोलियन जाणत होता कि आत्ता युद्ध करणे फायद्यात नाहि आहे. पण नेपोलियनने अजुन वाट बघितली असती तर पाठिमागुन येणारे प्रशियन सैन्याशी देखिल त्याला लढावं लागलं असतं म्हणून त्याने वेल्सलीच्या सैन्यावर आक्रमण सुरु केले. सुरुवातीला वेल्सलीने बचावाचे घोरण स्वीकारले व प्रशियन सैन्याच्या आगमनाची वाट पहात होते दरम्यान नेपोलियनची विविध आक्रमणे त्याच्या सैन्याने मोठ्या धैयाने परतवून लावली. व सरतेशेवटी नेपोलियनने आपले शेवटचे ईंपिरियल गार्डचे आक्रमण केले व ते देखिल फसले. इंपिरियल गार्ड नंतर नेपोलियन कडे अजुन काहि भारी शिल्लक नव्हते. हे पाहुन वेल्सलीने आपल्या सैन्याला आक्रमणाचा आदेश दिला व काहि वेळातच नेपोलियनच्या महान सेनेची पळता भुई थोडि केलि व त्याच्या सैन्याचा पाडाव झाला.
[संपादन] साहित्यात
इंग्रजी भाषेमध्ये बेर्नाड क्रोमवेल यांची प्रसिद्ध शार्पे या काल्पनिक व्यक्तिमत्वाबद्दल कांदबर्यांची शृंखला आहे. यात रिचर्ड शार्पे नावाचा ब्रिटिश सैन्यामधिल साधा सैनिक त्याच्या सुरुवातिच्या काळापासुनच ते नेपोलियनच्या युद्धापर्यंत वेलिंग्टनच्या दलात असतो. या व्यक्तिमत्वाबरोबरच वेलिग्टनची लष्करी कारकिर्द सादर करायचा प्रयत्न केला आहे. याच कादंबर्यावर आधारित शार्पेज सिरिज म्हणून ब्रिटनमध्ये दुरदर्शन मालिका दाखवली जाते. यात सीन बीन याने रिचर्ड शार्पेची भूमिका केली आहे तर ह्युज फ्रेजर याने वेलिंग्टनची भूमिका केलि आहे.
[संपादन] संदर्भ
- William Crompton- 100 Military leaders who shaped the world history- Gemini publication Delhi india
- Benard Cromwell- Sharpe's Story and Sharpe`s Fortress

