अँथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टोनी ब्लेअर या पानावरून पुनर्निर्देशित)
टोनी ब्लेअर
अँथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर

कार्यकाळ
२ मे १९९७ – २७ जून २००७
राणी एलिझाबेथ दुसरी
उपपंतप्रधान जॉन प्रेस्कॉट
मागील जॉन मेजर
पुढील गॉर्डन ब्राउन

जन्म ६ मे, १९५३ (1953-05-06) (वय: ६१)
एडिनबरा, स्कॉटलंड
राजकीय पक्ष मजूर पक्ष

अँथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर (इंग्लिश: Anthony Charles Lynton Blair; जन्म: ६ मे १९५३) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे. १९९७ ते २००७ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेला ब्लेअर त्याच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे चर्चेत राहिला. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने चालू केलेल्या अफगाणिस्तानइराक युद्धांना ब्लेअरने बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला. अनेक टीकाकारांनी ब्लेअरला बुशचा चमचा ही उपाधी दिली होती.

१० वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर जून २००७ मध्ये मजूर पक्षाने पक्षनेतेपदी गॉर्डन ब्राउनची निवड केली व ब्लेअरने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच मध्य पूर्वेमधील इस्रायल-पॅलेस्टाइन वाद मिटवण्यासाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीवर ब्लेअरची विशेष राजदूत ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मे २००८ मध्ये ब्लेअरने टोनी ब्लेअर फेथ फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: