डेव्हिड लॉइड जॉर्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिड लॉइड जॉर्ज

कार्यकाळ
७ डिसेंबर १९१६ – २२ ऑक्टोबर १९२२
राजा पाचवा जॉर्ज
मागील एच.एच. आस्क्विथ
पुढील ॲंड्रु बोनार लॉ

जन्म १७ जानेवारी १८६३ (1863-01-17)
मॅंचेस्टर इंग्लंड
मृत्यू २६ मार्च, १९४५ (वय ८२)
कार्नाव्हॉनशायर, वेल्स
सही डेव्हिड लॉइड जॉर्जयांची सही

डेव्हिड लॉइड जॉर्ज, ड्वायफोरचा पहिला अर्ल लॉइड-जॉर्ज (इंग्लिश: David Lloyd George, 1st Earl Lloyd-George of Dwyfor; १७ जानेवारी, इ.स. १८६३ - २६ मार्च, इ.स. १९४५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०८ ते १९१६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील लष्करी व राजकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात एच.एच. आस्क्विथला मोठ्या प्रमाणावर अपयश आले. त्यामुळे त्याला हटवून लॉइड जॉर्जला पंतप्रधानपदी आणण्यात आले.

वेल्सचा रहिवासी असलेला तसेच पेशाने वकील असणारा लॉइड जॉर्ज हा आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. वेल्श ही त्याची मातृभाषा तर इंग्लिश ही दुय्यम भाषा होती. आपल्या उत्साही वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच ब्रिटनमध्ये अनेक सामाजिक बदल घडवून आणलेल्या लॉइड जॉर्जचे नाव ब्रिटिश इतिहासात मानाने घेतले जाते.


बाह्य दुवे[संपादन]