Jump to content

अशोक चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अशोकराव चव्हाण

कार्यकाळ
डिसेंबर ८, इ.स. २००८ – नोव्हेंबर ११, इ.स. २०१०
राज्यपाल के. शंकरनारायणन
मागील विलासराव देशमुख
पुढील पृथ्वीराज चव्हाण
मतदारसंघ भोकर

कार्यकाळ
१६ मे, इ.स. २०१४ – २३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील भास्करराव पाटील (खतगावकर)
पुढील प्रतापराव गोविंदराव चिखलीकर
मतदारसंघ नांदेड
कार्यकाळ
इ.स. १९८७ – इ.स. १९८९
मागील शंकरराव चव्हाण
पुढील व्यंकटेश काब्दे

जन्म २८ ऑक्टोबर, १९५८ (1958-10-28) (वय: ६६)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (१४ फेब्रुवारी २०२४)
मागील इतर राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९७२-२०२४)
पत्नी
अमिता अशोकराव चव्हाण (ल. १९८४)
अपत्ये सुजया व श्रीजया
निवास साई निलयम् , नांदेड, मुंबई व औरंगाबाद
गुरुकुल यशवंत महाविद्यालय, नांदेड
धर्म हिंदू
संकेतस्थळ संकेतस्थळ

अशोक शंकरराव चव्हाण (२८ ऑक्टोबर , १९५८ - हयात) हे ८ डिसेंबर, २००८ ते ११ नोव्हेंबर, २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ५ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केली आणि ८ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते. चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत, ज्या दोघांनीही विधीमंडळाच्या दोन व संसदीय दोन्ही सभागृहाचे सदस्यत्व मिळविलेले आहे.

इ.स. २००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघतून अशोकराव चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी दोनदा निवड झाली होती.

आरोप

[संपादन]

इ.स. २०१० साली आदर्श हाउसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.[ संदर्भ हवा ]

१४/०३/२०१२ रोजी संरक्षणमंत्री ए.के. ॲंटनी यांनी लोकसभेत सांगितल्याप्रमाणे अशोक शंकरराव चव्हाण हे मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी एक आरोपीं आहेत.[]

भुषविलेली संवैधानिक पदे

[संपादन]
  1. खासदार (लोकसभा पोटनिवडणूक-१९८७)
  2. राज्यमंत्री (१९९२).
  3. वि.प. सदस्य (१९९३).
  4. आमदार, मुदखेड (१९९९).
  5. कॅबिनेटमंत्री (महसूल, परिवहन)
  6. मुख्यमंत्री (२००८-२०१०).
  7. लोकसभा सदस्य (२०१४).
  8. विधानसभा सदस्य, भोकर विधानसभा मतदारसंघ
  9. राज्यसभा सदस्य (२०२४).

भाजप प्रवेश

[संपादन]

१२ फेब्रुवारी २०२४ रोजी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला तसेच आमदारकीचा राजीनामा लगेचच विधानसभा अध्यक्षांकडे दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पक्षातर्फे राज्यसभेचे खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले.[][]

राजकिय कारकीर्द []

[संपादन]
  • १९८४ : काँग्रेस पक्षात प्रवेश आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस झाले.
  • मार्च १९८७ - नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा संसदेत निवडून आले
  • १९८९ : लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या डॉ. व्यंकटेश काब्दे कडून पराभूत झाले.
  • १९९२ : शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तसेच उस्मानाबाद आणि बुलढाण्याचे पालकमंत्री झाले.
  • फेब्रुवारी १९९३ : विधान परिषदेवर नियुक्ती झाली.
  • ऑक्टोबर १९९९ : तत्कालीन मुदखेड विधानसभेतून ३५,००० च्या मताधिक्याने विजयी झाले.
  • २ नोव्हेंबर १९९९ : विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री झाले.
  • सप्टेंबर २००३ : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री झले.
  • ऑक्टोबर २००४ : मुदखेड मतदारसंघातून ७० हजार मतांनी विजयी झाले. उद्योग खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती झाली.
  • २००८ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.
  • ऑक्टोबर २००९ : भोकर मतदारसंघातून १ लाख मताधिक्याने विजयी झाले.
  • नोव्हेंबर २००९ : दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागले.
  • २०१० : आदर्श घोटाळ्याचा आरोप, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
  • मे २०१४ : नांदेड लोकसभा मतदारसंघातून ८२ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले.
  • जानेवारी २०१७ : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.
  • मे २०१९ : भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून ४२ हजार मतांनी पराभूत झाले .तसेच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • ऑक्टोबर २०१९ - भोकरमधून ९७५०० मताधिक्याने विजयी झाले.
  • डिसेंबर २०१९ - महविकास आघाडीत सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले.
  • २०२२ - शिंदे गटाने बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. सबब मंत्रिपद गेले.

भाजप अंतर्गत

[संपादन]
  • फेब्रुवारी २०२४ - काँग्रेस पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि राज्यसभेत खासदार झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Chavan, amongst 13 named in Adarsh Scam: Antony
  2. ^ "BJP Fields JP Nadda, Ashok Chavan For Rajya Sabha, Sena Names Milind Deora". NDTV.com. 2024-02-15 रोजी पाहिले.
  3. ^ a b "अशोक चव्हाणांकडून काँग्रेसला पहिला मोठा हादरा; ५५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश". २४ फेब्रुवारी २०२४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-02-24 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील:
विलासराव देशमुख
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
डिसेंबर ८, इ.स. २००८नोव्हेंबर ११, इ.स. २०१०
पुढील:
पृथ्वीराज चव्हाण