Jump to content

आगरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आगरी व्यक्ती

आगरी समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. पनवेल,उरण आणी ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत.या तीन तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर कल्याण,भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, मुंबई,पेण,अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत,वाडा,वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक़्यात पण आगरी लोकावस्ती मोठया प्रमाणात आढळते.

मुंबई, ठाणे, रायगड,पालघर जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. आगरी जात क्षत्रिय आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना मासळी अधिक प्रिय म्हणून ते खाडीमध्ये अथवा समुद्रात जाऊन मासे पकडतात.मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच गोड्या पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. बंगाली लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात मत्स्यबीज सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.आगरी समाजामध्ये तरे,म्हात्रे, पाटील, भोईर, केणे,भगत, गावंड, ठाकूर,मधवी, अधिकारी, मोकल, कडवे, दळवी, कासार,थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी घरत, माळी, शेळके, शिंगोळे, लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर आडनावाची लोक जास्त आहेत.

वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला, ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता, पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्‍नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.

तर हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.

१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.

मुंबादेवीचे देऊळ.

महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच बारा खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते, तेंव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले तेंव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला ,ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं . ( संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect )

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे प्रभादेवी, मुंबई येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.

तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात. (https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)

किल्ले सागरगड

Top of fort in Monsoon

दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली.तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात , त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत. मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस,वरई,संजाण,वाघळीपा,बलसाड येथे सुर्यवंशी मराठा,रजपुत मराठा,खानदेशी,आगळे आगरी या नावाने संबोधिले जाते.


बारा पाटील,चौदा पाटील,बावन्न पाटील 

एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी शिवडी, धाकटी शिवडी, भोईवाडा,ठाकूरवाडी, बामनोली, नायगाव,वडाळा,माटुंगा, खडा माटुंगा, गोवारी (वडाळा स्टेशन), शीव (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता. काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन डोंगरी,चिंचबंदर,भायखळा, उमरखाडी भागात स्थायिक झाले.गोवंडी, मानखुर्द,तुर्भे,गवाण,माहूल, चेंबूर भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी,पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, रोहा, कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस रेवदंडा, सुडकोली, श्रीवर्धन, म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास बारा गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.

आगरी बांधवांच्या गावात मधोमध गावदेवी किंवा जरीमरीचे देऊळ असते. सोबत हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरूक्मिणी,महादेव, गणपती, शंकर यांचीही देवळे असतात.वाघेश्वरी, बापदेव, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठयाबाया ही समाजाची मुख्य दैवते आहेत.

चरी-कोपरचा शेतकरी संप

[संपादन]

विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि. २७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.

जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.

बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.

(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)

उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.

असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्‍नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव

समाजकारण आणि राजकारणातील सहभाग

[संपादन]

माजी आमदार दत्ता पाटील, माजी खासदार दि.बा. पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगड मध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले. मीनाक्षी पाटील यांनी विधान सभेत मंत्री म्हणून काम पाहिले. तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते. पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाई दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे. पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत. आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.१९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता ,कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एस वाय बी एच्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.[]

लोकसभेतील नेते [खासदार ]

[संपादन]

१) सोनू भाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते

२) कपिल मोरेश्वर पाटील हे २०१९ मध्ये भिवंडी लोकसभा संघामधुन निवडणुकींत विजयी होणारे आगरी समाजातील नेते आहेत.

३) रामशेठ ठाकूर पनवेल

४)सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ(बाळ्या मामा) २०२४ [भिवंडी लोकसभा]

विधानसभेतील नेते [आमदार ]

[संपादन]

१) प्रमोद रतन पाटील ( राजु दादा ) कल्याण ग्रामीण

२)महेंद्र दळवी ( अलिबाग )

३)रवी सेठ पाटील ( पेण )

४)प्रशांत ठाकुर ( पनवेल )

५)मंदा म्हात्रे ( बेलापूर )

६)गणेश नाईक ( ऐरोली )

७)गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )

८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )

९) संदीप नाईक (ऐरोली )

१०) बाळाराम पाटील(कोकण शिक्षक मतदार)

११) जयंत पाटील (विधान परिषद)

१२)ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदार संघ)

== आगरी समाजातील नेते

१) कै. मा.आ.दिना बामा पाटील- मुंबई

२) कै. दि.बा.पाटील -लोकनेते,पनवेल. 3) विवेकानंद शंकर पाटील (उरण)

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "नवशक्ती". नवशक्ती.कॉम.[permanent dead link]
  • [१]
  • [www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]

आगरी समाजाचा इतिहास