नारी शक्ती पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्त्री शक्ती पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
नारी शक्ती पुरस्कार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद इ.स. २०१९ च्या पुरस्कार प्राप्त महिलांसोबत
देश भारत
प्रदानकर्ता महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार
Formerly called स्त्री शक्ती पुरस्कार
Reward(s) १ - २ लाख
प्रथम पुरस्कार १९९९
शेवटचा पुरस्कार -
संकेतस्थळ नारी शक्ती पुरस्कार

नारी शक्ती पुरस्कार हा एक भारत सरकार तर्फे दिला जाणारा, महिलांसाठींचा सर्वोच्च पुरस्कार आहे. असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तिगत महिलेस किंवा संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सहा विविध वर्गवारीत दिला जातो.[१]

कठिन परिस्थितित एखादी महिला आपली हिम्मत आणि अंतस्थ शक्ती नुसार जे अतुल्य कार्य करते, त्याचा हा सन्मान असून याद्वारे महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे हा उद्देश असून अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते[२][३] यात पुरस्कार विजेत्या महिलेस किंवा संस्थेस एक लाख रुपये आणि एक प्रमाण पत्र दिल्या जाते. या पुरस्काराची सुरुवात 'स्त्री शक्ती पुरस्कार' नावाने इ.स.१९९९ मध्ये झाली.[१]

पुरस्काराचे वर्गीकरण[संपादन]

या पुरस्काराचे नाव भारतीय इतिहासातील प्रसिद्ध स्त्रियांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[४][५]

  • देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार

१८व्या शतकातील माळव प्रांतातील एक राणी

  • कण्णगी पुरस्कार

प्रसिद्ध तामिळ महिला 'कण्णगी'च्या नावावर आधारित.

  • माता जिजाबाई पुरस्कार

१७ शतकातील मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्या नावावर आधारित.

  • राणी गाएदिनलिउ ज़ेलियांग पुरस्कार

२०व्या शतकातील एक नागा आध्यात्मिक तथा राजनीतिक महिला, राणी गाएदिनलिउ ज़ेलियांगच्या नावावर आधारित.

  • राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

झाशीची राणी तथा एक स्वातंत्र्य सेनानी राणी लक्ष्मीबाईच्या नावावर आधारित.

  • राणी रुद्रम्मा देवी पुरस्कार

१३व्या शतकातील दक्षिणात्य राणी रुद्रम्मा देवीच्या नावावर आधारित।

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "न्यायाधीश गीता मित्तल 'नारी शक्ति पुरस्कार' से सम्मानित". Jagranjosh.com. 2018-03-09. Archived from the original on १३ सप्टेंबर २०२१. 2018-09-14 रोजी पाहिले.
  2. ^ "अंतर्राष्ट्रीय महिला दिवस: नारी शक्ति पुरस्सार से सम्मानित होने वाले 33 अनसुने हीरोज". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). Archived from the original on 2018-09-14. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "राष्ट्रपति ने प्रदान किए नारी शक्ति सम्मान | DD News". ddnews.gov.in (हिंदी भाषेत). Archived from the original on 14 March 2018. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Stree Shakti Puraskar" (PDF). Ministry of Women and Child Development. Archived from the original (PDF) on 10 January 2012. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Women's Award". Ministry of Women and Child Development. Archived from the original on 9 October 2001. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.