Jump to content

सुहासिनी मुळ्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Suhasini Mulay (es); Suhasini Mulay (ast); Сухасини Малай (ru); Suhasini Mulay (de); Suhasini Mulay (ga); سوهاسینی مولای (fa); Suhasini Mulay (ro); スーハシニー・ムーレイ (ja); Suhasini Mulay (tet); סוהסיני מולאי (he); Suhasini Mulay (ace); सुहासिनी मुले (hi); సుహాసిని ములే (te); ਸੁਹਾਸਿਨੀ ਮੁਲਾਏ (pa); সুহাসিনী মুলে (as); Suhasini Mulay (map-bms); सुहासिनी मुले (bho); সুহাসিনী মুলে (bn); Suhasini Mulay (fr); Suhasini Mulay (jv); सुहासिनी मुळ्ये (mr); Suhasini Mulay (bjn); Suhasini Mulay (sl); Suhasini Mulay (id); Suhasini Mulay (nl); Suhasini Mulay (su); Suhasini Mulay (min); Suhasini Mulay (gor); Suhasini Mulay (sq); Suhasini Mulay (bug); Suhasini Mulay (en); سوهاسيني مولاي (ar); Suhasini Mulay (ca); سوہاسینی مولای (pnb) हिंदी फिलिम ऐक्ट्रेस (bho); ভারতীয় টেলিভিশন অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); actriu índia (ca); भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक व निर्माता (mr); actores a aned yn 1950 (cy); Indian actress (en-gb); بازیگر سینما و بازیگر تلویزیون اهل هند است (fa); actriță indiană (ro); actriz india (gl); aktris India yang aktif berakting di film Bollywood dan Marathi serta televisi (id); Indian actress (en-ca); שחקנית הודית (he); Indiaas actrice (nl); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); ban-aisteoir Indiach (ga); індійська акторка (uk); ਬਾਲੀਵੁੱਡ, ਮਰਾਠੀ ਅਤੇ ਅਸਾਮੀ ਫ਼ਿਲਮਾਂ ਦੇ ਨਾਲ ਨਾਲ ਟੈਲੀਵਿਜ਼ਨ ਵਿੱਚ ਇੱਕ ਭਾਰਤੀ ਅਭਿਨੇਤਰੀ ਹੈ। ਉਸ ਨੇ ਗੁਲਜ਼ਾਰ ਦੀ ਫ਼ਿਲਮ ਹੂ ਤੂ ਤੂ ਵਿਚ ਆਪਣੀ ਅਦਾਕਾਰੀ ਲਈ 1999 ਵਿਚ ਸਰਬੋਤਮ ਸਹਿਯੋਗੀ ਅਭਿਨੇਤਰੀ ਦਾ ਰਾਸ਼ਟਰੀ ਫ਼ਿਲਮ ਪੁਰਸਕਾਰ ਜਿੱਤਿਆ ਸੀ। {{Cite news|url=http://www (pa); Indian actress in Bollywood, Marathi and Assamese films as well as television (en); ممثلة هندية (ar); actriz india (es); بھارتی اداکارہ اے۔ اس نے گلزار دی فلم ہو تو تو وچ اپنی اداکاری لئی 1999 وچ سبتوں ودھیا شراکت دار اداکارہ دا قومی فلم انعام جتیا سی۔ {{Cite news|url=http://www (pnb) Suhasini Mule, Suhasini Mullay (en)
सुहासिनी मुळ्ये 
भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक व निर्माता
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर २०, इ.स. १९५०
पाटणा
कार्य कालावधी (प्रारंभ)
 • इ.स. १९६९
नागरिकत्व
व्यवसाय
आई
 • Vijaya Mulay
वैवाहिक जोडीदार
 • Atul Gurtu
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुहासिनी मुळ्ये (जन्म २० नोव्हेंबर १९५०) ह्या हिंदी, मराठी, आसामी चित्रपट तसेच टेलिव्हिजनमधील एक भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक व निर्माता आहेत. अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरचे नामांकन व राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहे. तसेच दिग्दर्शक व निर्माता म्हणून त्यांना चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.[१][२][३][४]

प्रारंभिक जीवन[संपादन]

सुहासिनी यांचा जन्म पाटणा येथील एका मराठी भाषिक कुटुंबात झाला जिथे त्यांचे बालपण गेले. त्या फक्त तीन वर्षांच्या असताना त्यांनी त्यांचे वडील गमावले आणि त्यांचे संगोपन त्यांच्या आई, प्रख्यात माहितीपट निर्माते आणि चित्रपट इतिहासकार विजया मुळ्ये यांनी केले. आईमुळे सुहासिनी चित्रपटाकडे आकर्षित झाल्या.[५]

वैयक्तिक जीवन[संपादन]

मुळ्ये अनेक वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या जी १९९० मध्ये संपली. १६ जानेवारी २०११ रोजी त्यांचे आर्य समाजातील भौतिकशास्त्रज्ञ प्रा. अतुल गुर्टू यांच्याशी लग्न झाले.[६]

कारकीर्द[संपादन]

१९६५ मध्ये त्यांना पियर्स साबणाने मॉडेल म्हणून निवडले. याच जाहिरातीत मृणाल सेनचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी मुळ्येंनाभुवन शोम (१९६९) चित्रपटासाठी निवडले.[७]

भुवन शोम भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला असला तरी सुहासिनीने अभिनयाला करिअर म्हणून पाठपुरावा केला नाही. त्याऐवजी त्यांनी माँत्रिऑल, कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये माती रसायनशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्रातील विशेषीकरणासह कृषी तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यांनी मास कम्युनिकेशनमध्ये पदवी देखील मिळवली आणि त्याच विद्यापीठातून चित्रपट, रेडिओ, टीव्ही, पत्रकारिता आणि मुद्रण या विषयात पदवी प्राप्त केली.

त्या १९७५ मध्ये भारतात परतल्या आणि जन अरण्य या बंगाली चित्रपटात सत्यजित राय यांच्या सहाय्यक म्हणून काम केले.[८] नंतर त्या मृणाल सेनच्या मृगयामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रुजू झाल्या.[९] तेव्हापासून, त्या सक्रियपणे चित्रपटांची निर्मिती करत आहेत आणि ६० हून अधिक माहितीपट बनवले आहेत. त्यापैकी चारसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले आहेत.

भुवन शोमच्या जवळपास ३० वर्षांनंतर, त्यांनी गुलजारच्या हू तू तू या चित्रपटाद्वारे मुख्य बॉलीवूड सिनेमात उत्कृष्ट पुनरागमन केले ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[१०] तेव्हापासून त्या बॉलिवूडमध्ये थरल्या महिलांच्या सहाय्यक भूमिका साकारत आहे.

त्यांनी जाने क्या बात हुई, क्यूंकी सास भी कभी बहू थी, मिसमॅच्ड, द फेम गेम, या सारक्या टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे.

फिल्मोग्राफी[संपादन]

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका Notes
१९६९ भुवन शोम गौरी
१९७२ ग्रहण
१९८० भवनी भवाई
१९८२ रामनगरी रामची पत्नी
१९८२ अपरूपा अपरूपा आसामी
१९८४ अपेक्षा अपरूपा चा हिंदी चित्रपट
१९८७ सडकछाप
१९९३ शतरंज सौ. उषा वर्मा
१९९९ हू तू तू मालती बाई राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री
२००१ लगान यशोदामाई
दिल चाहता है सिडची आई
ये तेरा घर ये मेरा घर
२००२ फिल्हाल
हमराज राजची आजी
दिवानगी न्यायाधिश
२००३ बाझ
कुछ ना कहो डॉ. मल्होत्रा
खेल दादी
२००४ हम कौन हैं? अनीता
२००५ हनन
पेज थ्री
सेहर प्रभा कुमार
सितम
बाह! लाईफ हो तो ऐसी दादी
२००६ हमको तुमसे प्यार है दुर्गाची आई
यु होता तो क्या होता नम्रता
नक्षा
होप ॲन्ड अ लिटील शुगर सौ. ओबेरॉय
२००७ बीग ब्रदर
धमाल
स्पीड
२००८ मित्था
जोधा अकबर राणी पद्मावती
माय फ्रेन्ड गणेशा २
चमकू
२००९ १३ बी आई
मेरे ख्वाबोमें जो आये
द व्हाईत लॅन्ड
तुम्हारे लिये
बिट्स ॲन्ड पिसेस
रंग रसीया
२०१३ कल्ब ६० सौ. मनसुखानी
२०१४ गांधी ऑफ द मंथ सौ. कुरीयन
२०१५ प्रेम रतन धन पायो सावित्री देवी
हमारी अधुरी कहानी हरीची आई
२०१६ रॉकी हॅन्डसम कार्ला
मोहञो दाडो लाशी
पीडा सौ. मलीक
२०१७ बसंती ब्ल्युज सौ. पटेल

दूरदर्शन[संपादन]

वर्ष कार्यक्रम भूमिका टिपण्णी
२००७ चलदी दा नाम गद्दी
२००१ मन
२००६ क्यूंकी सास भी कभी बहू थी कौशल्या मल्होत्रा (तान्याची आई)
२००६ जब लव हुआ
२००६ कुलवधू
पिया का घर
ममता
जाने क्या बात हुई
तिथीर अतिथी
एक था रस्टी मिस बीन
विरासत
प्रिन्सेस डॉली और उसका मॅजिक बॅग
गीत - हुई सबसे परायी मानची आजी स्टार वन
दिल से दिया वचन
क्या मस्त है लाइफ डिस्ने चॅनलवर टीव्ही शो
हम- एक छोटे गांव की बडी कहानी हम लॉगचे रिमेक
देवों के देव... महादेव पार्वतीची आजी
२०१२ होंगे जुदा ना हम अनिरुद्धची आजी
२०१६ देश की बेटी नंदिनी राजवीरची आजी
२०१४ उडान शकुंतला सिंग
२०१४ एव्हरेस्ट शिखाची आई
२०२० मिसमॅच्ड ऋषीची आजी (दादी)
२०२२ द फेम गेम कल्याणी नेटफ्लिक्स

पुरस्कार[संपादन]

वर्ष पुरस्कार श्रेणी चित्रपट परिणाम सं.
१९८३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ॲन इंडियन स्टोरी विजयी [११]
१९८८ भोपाळ: बियोन्ड जेनोसाईड विजयी [१२]
१९८९ सर्वोत्कृष्ट शैक्षणिक/प्रेरक/शिक्षणात्मक चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चिठ्ठी विजयी [१३]
१९९८ सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द ऑफिशीयल आर्ट फॉर्म विजयी [१४]
२००० फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हु तू तू नामांकन [१५]
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विजयी [१६]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Quest for creativity". The Tribune. 24 November 2002.
 2. ^ Interview with actor Suhasini Mulay indiantelevision.com, 20 March 2003.
 3. ^ SUHASINI MULAY ... just begun' South Asian, 20 February 2003.
 4. ^ "RISEUP campaign: Women Who Rise up and Walk Away from Social Stereotypes".
 5. ^ Chatterji, Shoma A (25 May 2019). "Akka Vijaya Mulay - Mother, Activist, Filmmaker, Author (1921-2019)". The Citizen (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 24 January 2020. 20 February 2021 रोजी पाहिले.
 6. ^ Shah, Kunal M (11 March 2011). "Suhasini Mulay ties the knot at 60". The Times of India. Archived from the original on 15 May 2012. 21 February 2021 रोजी पाहिले.
 7. ^ Sengupta, Aditi (25 January 2019). "The man who found Gauri". @businessline (इंग्रजी भाषेत). 17 February 2021 रोजी पाहिले.
 8. ^ "EXCLUSIVE: Suhasini Mulay donates Louis Malle's camera for preservation: He gave it to my mother for me". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 22 January 2021. 23 April 2021 रोजी पाहिले.
 9. ^ "What I Learnt From Mrinal Sen About Filmmaking, and Being a Good Human". The Wire. 31 December 2018. 20 February 2021 रोजी पाहिले.
 10. ^ "Streaming Guide: Gulzar movies". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 5 May 2020. 20 February 2021 रोजी पाहिले.
 11. ^ "30th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 30 March 2022 रोजी पाहिले.
 12. ^ "35th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 30 March 2022 रोजी पाहिले.
 13. ^ "36th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 9 January 2012 रोजी पाहिले.
 14. ^ "45th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 28 March 2022 रोजी पाहिले.
 15. ^ "45th Filmfare Awards winner". Archived from the original on 25 March 2012. 29 June 2020 रोजी पाहिले.
 16. ^ "46th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. Archived (PDF) from the original on 25 July 2020. 2 September 2020 रोजी पाहिले.