"द्रौपदी मुर्मू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १४४: ओळ १४४:
== २०२२ ची राष्ट्रपती पदाची निवडणूक ==
== २०२२ ची राष्ट्रपती पदाची निवडणूक ==
{{मुख्य|भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०२२}}
{{मुख्य|भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०२२}}
२१ जुलै २०२२ मध्ये भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून मुर्मू निवडून आल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/draupadi-murmu-to-be-ndas-candidate-for-presidential-polls/articleshow/92368505.cms|title=Draupadi Murmu to be NDA's candidate for presidential polls {{!}} India News - Times of India |website=The Times of India|language=en|access-date=2022-06-21}}</ref>
२१ जुलै २०२२ रोजी भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू निवडून आल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/draupadi-murmu-to-be-ndas-candidate-for-presidential-polls/articleshow/92368505.cms|title=Draupadi Murmu to be NDA's candidate for presidential polls {{!}} India News - Times of India |website=The Times of India|language=en|access-date=2022-06-21}}</ref> २५ जुलै २०२२ रोजी, द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.


== हे देखील पहा ==
== हे देखील पहा ==

०९:२९, ३१ जुलै २०२२ ची आवृत्ती

द्रौपदी मुर्मू

विद्यमान
पदग्रहण
२५ जुलै २०२२
पंतप्रधान नरेंद्र मोदी
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
मागील रामनाथ कोविंद

कार्यकाळ
१८ मे २०१५ – १२ जुलै २०२१
मागील सय्यद अहमद
पुढील रमेश बायस

राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार), ओडिशा शासन
कार्यकाळ
६ ऑगस्ट २००२ – १६ मे २००४
कार्यकाळ
६ मार्च २००० – ६ ऑगस्ट २००२

कार्यकाळ
५ मार्च २००० – २१ मे २००९
मतदारसंघ रायरंगपूर

जन्म २० जून, १९५८ (1958-06-20) (वय: ६५)
बैदापोसी, मयूरभंज जिल्हा, ओडिशा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती शामचरण मुर्मू
अपत्ये
शिक्षण कला शाखेतील पदवी
गुरुकुल रमादेवी महिला विद्यापीठ, भुवनेश्वर

द्रौपदी मुर्मू (जन्म: २० जून, १९५८) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. २५ जुलै २०२२ रोजी त्यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.[१]

२०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार होत्या. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी निवड होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) त्या दुसऱ्या व्यक्ती [२][३] तर पहिल्या आदिवासी व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असून आत्तापर्यंतच्या सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.

त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.

वैयक्तिक आयुष्य

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाळ नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.[४][५] त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते.[६] इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली.

द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असून पैकी दोन्ही मुलगे मरण पावले आहेत.[७]

कारकीर्द

त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.[८]

त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.[८]

स्थानिक राजकारण

मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.[८]

ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.[९] २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या.[१०] त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.

राज्यपालपद

त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.[११][१२] भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.

२०२२ ची राष्ट्रपती पदाची निवडणूक

२१ जुलै २०२२ रोजी भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू निवडून आल्या.[१३] २५ जुलै २०२२ रोजी, द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.

हे देखील पहा

संदर्भ

  1. ^ "स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा". Maharashtra Times. 2022-07-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Draupadi Murmu, Former Jharkhand Governor, Is BJP's Choice For President". NDTV.com. 2022-06-21 रोजी पाहिले.
  3. ^ "BJP-led NDA names Draupadi Murmu, former governor of Jharkhand as candidate for presidential polls". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 2022-06-21 रोजी पाहिले.
  4. ^ "भाजपने राष्ट्रपती पदासाठी मूर्मू यांची निवड का केली? एका दगडात मारले अनेक पक्षी". India Darpan Live (इंग्रजी भाषेत). 2022-06-21. 2022-06-22 रोजी पाहिले.
  5. ^ "द्रौपदी मुर्मू कोण आहेत, ज्यांना भाजपने राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिलीय".
  6. ^ "Governor reaches out". Hindustan. Ranchi. 4 April 2018.
  7. ^ "Who is Draupadi Murmu?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-13. 2022-06-22 रोजी पाहिले.
  8. ^ a b c "द्रौपदी मुर्मू : सरकारी कारकून ते राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारपर्यंतचा प्रवास - BBC News मराठी". बी.बी.सी. मराठी. २३ जून २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "Draupadi Murmu Jharkhand Guv". New Indian Express. 2015-05-13 रोजी पाहिले.
  10. ^ "Narendra Modi government appoints four Governors". IBN Live. Archived from the original on 2015-05-15. 2015-05-12 रोजी पाहिले.
  11. ^ "Draupadi Murmu sworn in as first woman Governor of Jharkhand-I News – IBNLive Mobile". IBN Live. 18 May 2015. 18 May 2015 रोजी पाहिले.
  12. ^ "Modi government names new governors for Jharkhand, five NE states". The Times of India. 2015-05-12 रोजी पाहिले.
  13. ^ "Draupadi Murmu to be NDA's candidate for presidential polls | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-06-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

मागील:
रामनाथ कोविंद
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. २०२२ – -
पुढील:
-