"सीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→सीतेचे देऊळ: आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
==सीतेचे देऊळ== |
==सीतेचे देऊळ== |
||
देवळातली सीतेची मूर्ती नेहमी रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्तींबरोबर असते. परंतु [[महाराष्ट्र।महाराष्ट्रातील]] [[यवतमाळ]] जिल्ह्यात राळेगावनजीकच्या रावेरी नावाच्या खेड्यात रामाविना असलेल्या सीतेचे मंदिर आहे. तेथे लव, कुश आहेत, पण राम नाही. शेतकरी संघटनेचे [[शरद जोशी]] यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. रामाशिवायच्या सीतेचे भारतातले ते बहुधा एकमेव देऊळ असावे. श्रीलंकेत मात्र सीतेची मंदिरे बघण्यास मिळतात. |
देवळातली सीतेची मूर्ती नेहमी रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्तींबरोबर असते. परंतु [[महाराष्ट्र।महाराष्ट्रातील]] [[यवतमाळ]] जिल्ह्यात राळेगावनजीकच्या रावेरी नावाच्या खेड्यात रामाविना असलेल्या सीतेचे मंदिर आहे. तेथे लव, कुश आहेत, पण राम नाही. शेतकरी संघटनेचे [[शरद जोशी]] यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. रामाशिवायच्या सीतेचे भारतातले ते बहुधा एकमेव देऊळ असावे. श्रीलंकेत मात्र सीतेची मंदिरे बघण्यास मिळतात. |
||
==सीता हा मध्यवर्ती विषय असलेली पुस्तके== |
|||
* सीता (पाच खंडांत विभागलेले पुस्तक, मूळ हिंदी लेखक देवदत्त पटनाईक, मराठी अनुवाद विदुला टोकेकर) |
|||
२२:४६, ५ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
सीता | |
राम पंचायतन | |
मराठी | सीता |
संस्कृत | सीता |
कन्नड | ಸೀತೆ |
तमिळ | சீதை |
वडील | राजा जनक |
पती | श्रीराम |
अपत्ये | लव, कुश |
अन्य नावे/ नामांतरे | जानकी, वैदेही, |
सीता ही रामायणातील प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखा आहे. रामायणातील मुख्य नायक राम याची ही पत्नी होय. पतिनिष्ठ पत्नी म्हणून, तसेच शुद्धचरित, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून ही आदर्शवत मानली जाते.
ही विदेहाचा जनककुलोत्पन्न राजा सीरध्वज जनक यास जमीन नांगरताना गवसली व सीरध्वजाने हिला दत्तक कन्या म्हणून वाढवले. उपवर झाल्यावर हिचा विवाह स्वयंवरपद्धतीने इक्ष्वाकु कुळातील रामाशी झाला. विवाहानंतर अल्पकाळातच दुर्दैववशात हिला पती राम व दीर लक्ष्मण यांच्यासह राजगृहाचा त्याग करून वनवासास जावे लागले. वनवासकाळादरम्यान दंडकारण्यात वास्तव्य करत असताना हिला लंकेचा राजा रावण याने अपहरण करून लंकेस नेऊन स्थानबद्ध केले. यातून राम व रावण यांच्यात युद्ध उद्भवले व त्यात रामाने रावणाचा वध केला. त्यानंतर हिने अग्निदिव्य करून स्वतःचे पावित्र्य सिद्ध केले व तत्पश्चात रामाने हिला अयोध्येस स्वगृही नेले. अयोध्येस गेल्यावर रामास हिच्यासह राज्याभिषेक करवण्यात आला. ही गर्भवती असताना, हिच्या पावित्र्याविषयी लोकांमध्ये बोलवा उठल्यामुळे रामाने हिला टाकून दिले. अश्या परिस्थितीत हिने वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात आसरा घेतला व तेथेच हिला लव व कुश असे दोघे जुळे पुत्र झाले. कुमारवयाचे झाल्यावर लव-कुशांची त्यांचा पिता राम याच्याशी भेट घडून आली. अखेरीस हिने धरणीच्या, अर्थात स्वतःच्या मातेच्या, उदरात प्रवेश करून जीवनप्रवास संपवला.
सीतेचे देऊळ
देवळातली सीतेची मूर्ती नेहमी रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्तींबरोबर असते. परंतु महाराष्ट्र।महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात राळेगावनजीकच्या रावेरी नावाच्या खेड्यात रामाविना असलेल्या सीतेचे मंदिर आहे. तेथे लव, कुश आहेत, पण राम नाही. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. रामाशिवायच्या सीतेचे भारतातले ते बहुधा एकमेव देऊळ असावे. श्रीलंकेत मात्र सीतेची मंदिरे बघण्यास मिळतात.
सीता हा मध्यवर्ती विषय असलेली पुस्तके
- सीता (पाच खंडांत विभागलेले पुस्तक, मूळ हिंदी लेखक देवदत्त पटनाईक, मराठी अनुवाद विदुला टोकेकर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |