"शशी कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०३: ओळ १०३:
* उत्सव
* उत्सव
* कलयुग
* कलयुग
* ३६ चौरंगी लेन
* न्यू दिल्ली टाईम्स
* न्यू दिल्ली टाईम्स
* विजेता
* विजेता
* जुनून (सहनिर्माते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर)


==पुरस्कार==
==पुरस्कार==

२०:०४, १२ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

शशी कपूर
चित्र:Signed photo of Indian actor Shashi Kapoor (2).jpg
शशी कपूर
जन्म शशी कपूर
१८ मार्च १९३८
कलकत्ता, पश्चिम बंगाल
मृत्यू ४ डिसेंबर २०१७ (वय वर्षे -७९)
मुंबई
इतर नावे बलबीर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९४२ - १९९९
भाषा हिंदी भाषा
प्रमुख चित्रपट जब जब फूल खिले, प्यार का मौसम
पुरस्कार

पद्मभूषण (२०११)

दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१४)
वडील पृथ्वीराज कपूर
पत्नी जेनिफर
अपत्ये कुणाल, करण, संजना (कन्या)

शशी कपूर (जन्म : कलकत्ता, १८ मार्च १९३८; मृत्यू : मुंबई, ४ डिसेंबर २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमा होताच.

शशी कपूर यांचे शशी कपूर यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. त्यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांतील महत्त्वाचे चित्रपट म्हणजे १९४८मध्ये आलेला आग आणि १९५१मध्ये आलेला आवारा. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.

त्यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले.

पृुथ्वी थिएटर्सचे पुनरुज्जीवन

बंद पडत चाललेल्या पृथ्वी थिएटर्सचे पुनरुज्जीवन ही शशी कपूर यांची अभिनयक्षेत्राला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.

शशी कपूर यांचे हिंदी चित्रपट

  • आग (बालकलाकार)
  • आ गले लग जा
  • आमने सामने
  • आवारा (बालकलाकार)
  • कन्यादान
  • कभी कभी
  • काला पत्थर
  • चार दीवारें
  • चोर मचाये शोर
  • चोर सिपाही
  • जब जब फूल खिले
  • त्रिशूल
  • दानापानी (बालकलाकार)
  • दीवार
  • दो अौर दो पाँच
  • धर्मपुत्र
  • नींद हमारी ख्वाब तुम्हारे
  • न्यू दिल्ली टाईम्स
  • प्यार का मौसम
  • फकीरा
  • बचपन (बालकलाकार)
  • मीना (बालकलाकार)
  • मोहब्बत इसको कहते है
  • राजा साब
  • रूठा ना करो
  • रोटी कपडा अौर मकान
  • वक्त
  • शर्मीली
  • शशीराज (बालकलाकार)
  • शान
  • संग्राम (बालकलाकार)
  • सत्यम् शिवम् सुंदरम्
  • सुहाग
  • हम तो चले परदेस
  • हसीना मान जायेगी

ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपट

  • द डिसीव्हर्स
  • प्रिटी पॉली
  • बॉम्बे टॉकी
  • शेक्सपिअर वल्लाह
  • साईड स्ट्रीट
  • सिद्धार्थ
  • द हाऊसहोल्डर
  • हीट अॅन्ड डस्ट

भारतीय पण इंग्रजी चित्रपट

  • इन कस्टडी
  • मुहाफीज
  • सॅमी अॅन्ड रोझी गेट लेड


दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • अजूबा
  • गेस्ट हाऊस
  • पोस्ट बॉक्स ९९९ (साहाय्यक दिग्दर्शक)

शशी कपूर निर्माते असलेले चित्रपट

  • उत्सव
  • कलयुग
  • ३६ चौरंगी लेन
  • न्यू दिल्ली टाईम्स
  • विजेता
  • जुनून (सहनिर्माते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर)

पुरस्कार