"नरेंद्र मोदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ४५: | ओळ ४५: | ||
==पूर्व जीवन== |
==पूर्व जीवन== |
||
मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले.तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|संघाचे]] पूर्ण वेळ प्रचारक बनले.[[इ.स.१९९१|१९९१]] मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला.[[इ.स. १९९५|१९९५]] मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. |
|||
भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली. |
|||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
भारतीय जनता पक्षाचे जहाल नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी [[चहा]]ची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच दाखवून दिले. |
भारतीय जनता पक्षाचे जहाल नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी [[चहा]]ची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच दाखवून दिले. |
||
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे [[केशुभाई पटेल]] पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावून कसलेला राजकारण म्हणून आपली क्षमता |
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे [[केशुभाई पटेल]] पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावून कसलेला राजकारण म्हणून आपली क्षमता लोकांना मान्य करायला लावली. |
||
[[शंकरसिंह वाघेला]] व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती. |
[[शंकरसिंह वाघेला]] व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती. |
||
ओळ ५७: | ओळ ५७: | ||
राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले. या विकासपुरुषाचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याने झालेला उत्कर्ष अवाक करणारा आहे. |
राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले. या विकासपुरुषाचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याने झालेला उत्कर्ष अवाक करणारा आहे. |
||
फक्त २००२ मधील |
फक्त २००२ मधील गुजराथमधल्यात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्वीकार्यतेस 'खो' घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांच्या चेहर्यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकत होता. दुसर्या एखाद्या नेत्यास असला आरोप खचितच अतिशय महागात पडला असता, पण नरंद्र मोदींच्या बाबतीत तसे झाले नाही. ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
२२:२६, १३ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
नरेंद्र मोदी | |
विद्यमान | |
पदग्रहण २६ मे २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
---|---|
मागील | मनमोहन सिंग |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे २०१४ | |
मागील | मुरली मनोहर जोशी |
गुजरात राज्याचे मुख्यमंत्री
| |
कार्यकाळ ७ ऑक्टोबर २००१ – २२ मे २०१४ | |
मागील | केशुभाई पटेल |
पुढील | आनंदीबेन पटेल |
जन्म | १७ सप्टेंबर, १९५० वडनगर, मेहसाणा जिल्हा,गुजरात |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | जसोदाबेन |
निवास | ७, रेस कोर्स पथ, नवी दिल्ली |
धर्म | हिंदू |
सही | |
संकेतस्थळ | Official website Government website |
नरेंद्र दामोदरदास मोदी (गुजराती: નરેંદ્ર દામોદરદાસ મોદી, जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते.ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला.२००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजप चे स्ट्रॅटेजिस्ट होते.
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.गुजरात च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात.त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते.परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.
वैयक्तिक माहिती
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक ठरले.
पूर्व जीवन
मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले.तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले.१९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला.१९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भारतीय जनता पक्षाचे जहाल नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच दाखवून दिले.
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावून कसलेला राजकारण म्हणून आपली क्षमता लोकांना मान्य करायला लावली.
शंकरसिंह वाघेला व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती.
राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले. या विकासपुरुषाचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याने झालेला उत्कर्ष अवाक करणारा आहे.
फक्त २००२ मधील गुजराथमधल्यात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्वीकार्यतेस 'खो' घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांच्या चेहर्यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकत होता. दुसर्या एखाद्या नेत्यास असला आरोप खचितच अतिशय महागात पडला असता, पण नरंद्र मोदींच्या बाबतीत तसे झाले नाही. ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले.
पुस्तके
नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत: ती अशी :-
- कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद
- कुशल सारथी नरंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर)
- द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाइफ
- दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)
- नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके)
- नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये)
- नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक : डॉ. दामोदर)
- नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)
- मोदीच का? (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन
- स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)
- Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय)
नरेंद्र मोदी यांनी स्वतःच लिहिलेली पुस्तके
- आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
- एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
- ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी)
- सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)
बाह्य दुवे
मागील मनमोहनसिंग |
भारतीय पंतप्रधान मे २६, इ.स. २०१४-विद्यमान |
पुढील --- |
मागील केशूभाई पटेल |
गुजरातचे मुख्यमंत्री इ.स. २००१- इ.स. २०१४ |
पुढील आनंदीबेन पटेल |