"अप्सरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 24 langlinks, now provided by Wikidata on d:Q148773 |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
हिंदू पुराणांनुसार '''अप्सरा''' या स्वर्गाधिपती [[इंद्र|इंद्राच्या]] दरबारात नृत्यगायन करणाऱ्या स्वर्गीय सुंदऱ्या होत्या. [[ऋग्वेद|ऋग्वेदानुसार]] काही अप्सरा या [[गंधर्व|गंधर्वांच्या]] पत्नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांची नैतिक मूल्ये अप्सरांना बंधनकारक नसावीत असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टांपासून त्यांना दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात. |
हिंदू पुराणांनुसार '''अप्सरा''' या स्वर्गाधिपती [[इंद्र|इंद्राच्या]] दरबारात नृत्यगायन करणाऱ्या स्वर्गीय सुंदऱ्या होत्या. [[ऋग्वेद|ऋग्वेदानुसार]] काही अप्सरा या [[गंधर्व|गंधर्वांच्या]] पत्नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांची नैतिक मूल्ये अप्सरांना बंधनकारक नसावीत असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टांपासून त्यांना दूर सारण्यासाठी देवराज [[इंद्र]] या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात. अप्सरा सदैव तरुण असतात, त्यांना वृद्धत्व नाही. |
||
[[भागवत पुराण|भागवत पुराणानुसार]] [[कश्यप|कश्यप ऋषींच्या]] बारा पत्नींपैकी '''[[मुनि]]'''(ऊर्फ वसिष्ठा) ही पत्नी बऱ्याच अप्सरांची माता असल्याचे दिसते. अन्य पौराणिक वाङ्मयात कश्यपाच्या '''[[अरिष्टा]]'''(ऊर्फ प्राधा), ताम्रा व '''[[खशा]]''' |
[[भागवत पुराण|भागवत पुराणानुसार]] [[कश्यप|कश्यप ऋषींच्या]] बारा पत्नींपैकी '''[[मुनि]]'''(ऊर्फ वसिष्ठा) ही पत्नी बऱ्याच अप्सरांची माता असल्याचे दिसते. अन्य पौराणिक वाङ्मयात कश्यपाच्या '''[[अरिष्टा]]'''(ऊर्फ प्राधा), ताम्रा व '''[[खशा]]''' नामक पत्नी काही अप्सरांच्या आई असल्याचे उल्लेख आढळतात. काही कथांमध्ये स्वतः ब्रह्मदेवाने अप्सरांची निर्मिती केल्याचेही वाचायला मिळते. याशिवाय, मेरु पर्वताची रवी करून केलेल्या समुद्रमंथनातून 'रंभादि देवांगना' निघाल्याचा उल्लेखही सापडतो. |
||
[[चित्र:Apsara relief.jpg|thumb|right|[[आंग्कोर वाट]] मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या अप्सरा]] |
[[चित्र:Apsara relief.jpg|thumb|right|[[आंग्कोर वाट]] मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या अप्सरा]] |
||
पुराणकथा व [[नाट्य शास्त्र|नाट्य शास्त्राच्या]] आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत - |
पुराणकथा व [[नाट्य शास्त्र|नाट्य शास्त्राच्या]] आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत - |
||
अजगंधा, अनपाया, अद्रिका, अनवद्या, अनुचना, अंबिका, |
अजगंधा, अनपाया, अद्रिका, अनवद्या, अनुचना, अंबिका, अरुणा, अरूपा, अलंबुषा, अल्मविशा, असिता, असिपर्णिनी, असुरा, आलंबा, उत्कचोत्कृष्टा, उमलोचा, उर्वशी, ऋतुस्थला, कपिला, कर्णिका, काम्या, केशिनी, गुणमुख्या, गुणवरा, घृताची, चारुनेत्री, चित्रलेखा, तिलोत्तमा, देवी, नागदंता, निर्ऋता, पंचचूडा, पुंजिकस्थला, पुंडरीका, पूर्वचित्ती, पौलोमी, प्रभावती(ऊर्फ स्वयंप्रभा), बुदबुदा, भासी, मनु, मनोभवा, मनोरमा, महाभागा, मारीचि, मार्गणप्रिया, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, मंजुघोषा, रंभा, रक्षिता, रितुशाला, लता, लक्ष्मणा, वपु, वरंवरा, वर्गा, वंशा, विद्युता, विद्युत्पर्णा, विद्युत्प्रभा, विमनुष्या, विश्वची, शरद्वती, शिवा, शुचिका, शुचिस्मिता, शुची, समिची, सहजन्या(सहजिन्यु), सुगंधा, सुदती, सुप्रिया, सुबाहु, सुभगा, सुरजा, सुरता, सुरसा, सुलोचना, सोमा, सौदामिनी, सौरभेदी, स्वयंप्रभा(ऊर्फ प्रभावती), स्वर्णा, हासिनी, हिमा, हेमा, क्षेमा, वगैरे. या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो. |
||
इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी [[उर्वशी]], [[मेनका]], [[रंभा]] व [[तिलोत्तमा]] या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते. |
इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी [[उर्वशी]], [[मेनका]], [[रंभा]] व [[तिलोत्तमा]] या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते. |
१३:४७, २६ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्यगायन करणाऱ्या स्वर्गीय सुंदऱ्या होत्या. ऋग्वेदानुसार काही अप्सरा या गंधर्वांच्या पत्नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांची नैतिक मूल्ये अप्सरांना बंधनकारक नसावीत असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टांपासून त्यांना दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात. अप्सरा सदैव तरुण असतात, त्यांना वृद्धत्व नाही.
भागवत पुराणानुसार कश्यप ऋषींच्या बारा पत्नींपैकी मुनि(ऊर्फ वसिष्ठा) ही पत्नी बऱ्याच अप्सरांची माता असल्याचे दिसते. अन्य पौराणिक वाङ्मयात कश्यपाच्या अरिष्टा(ऊर्फ प्राधा), ताम्रा व खशा नामक पत्नी काही अप्सरांच्या आई असल्याचे उल्लेख आढळतात. काही कथांमध्ये स्वतः ब्रह्मदेवाने अप्सरांची निर्मिती केल्याचेही वाचायला मिळते. याशिवाय, मेरु पर्वताची रवी करून केलेल्या समुद्रमंथनातून 'रंभादि देवांगना' निघाल्याचा उल्लेखही सापडतो.
पुराणकथा व नाट्य शास्त्राच्या आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत -
अजगंधा, अनपाया, अद्रिका, अनवद्या, अनुचना, अंबिका, अरुणा, अरूपा, अलंबुषा, अल्मविशा, असिता, असिपर्णिनी, असुरा, आलंबा, उत्कचोत्कृष्टा, उमलोचा, उर्वशी, ऋतुस्थला, कपिला, कर्णिका, काम्या, केशिनी, गुणमुख्या, गुणवरा, घृताची, चारुनेत्री, चित्रलेखा, तिलोत्तमा, देवी, नागदंता, निर्ऋता, पंचचूडा, पुंजिकस्थला, पुंडरीका, पूर्वचित्ती, पौलोमी, प्रभावती(ऊर्फ स्वयंप्रभा), बुदबुदा, भासी, मनु, मनोभवा, मनोरमा, महाभागा, मारीचि, मार्गणप्रिया, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, मंजुघोषा, रंभा, रक्षिता, रितुशाला, लता, लक्ष्मणा, वपु, वरंवरा, वर्गा, वंशा, विद्युता, विद्युत्पर्णा, विद्युत्प्रभा, विमनुष्या, विश्वची, शरद्वती, शिवा, शुचिका, शुचिस्मिता, शुची, समिची, सहजन्या(सहजिन्यु), सुगंधा, सुदती, सुप्रिया, सुबाहु, सुभगा, सुरजा, सुरता, सुरसा, सुलोचना, सोमा, सौदामिनी, सौरभेदी, स्वयंप्रभा(ऊर्फ प्रभावती), स्वर्णा, हासिनी, हिमा, हेमा, क्षेमा, वगैरे. या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो.
इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी उर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते.
इंद्राच्या दरबारात स्थान न दिलेल्या काही अप्सरांना वनदेवीच्या वा जलकन्यांच्या स्वरूपांत पुराण कथेत स्थान मिळाले आहे. उदा. रामायणातील किष्किंधा कांडात 'हेमा' नावाच्या वनातील अप्सरेचा संदर्भ सापडतो.
रामायण, महाभारत, भागवत् पुराण, वेद या सर्वांत अप्सरांचे उल्लेख व अनेक कथा आढळतात. कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका उर्वशी आहे.
भारताबाहेर आग्नेय आशियातील अनेक कथांमध्ये व विशेषत: आंग्कोर वाट मंदिराच्या कलाकुसरीत व कोरीव कामात या अप्सरा आढळतात. हिंदू पुराणकथांव्यतिरिक्त बौद्ध, ग्रीक, रोमन आणि नॉर्डिक पुराणांतही अप्सरांचा उल्लेख आढळतो. त्या कथांनुसारही मर्त्य मानवांना किंवा देवांना वश करण्याचे कार्य अप्सरा करत.
रामायणातील अप्सरांचे संदर्भ
रामायणात बऱ्याच ठिकाणी अप्सरांचे उल्लेख आढळतात. त्यापैकी काही श्लोक खाली दिले आहेत.
अप्सु निमर्थनात् एव रसात् तस्मात् वर स्त्रिय:।
उत्पेतु: मनुज श्रेष्ठ तस्मात् अप्सरसो अभवन् ॥ १-४५-३३
हा श्लोक बालकांडात येतो. राम-लक्ष्मणांना विश्वामित्र सम्रुद्रमंथनाची कथा सांगत असताना समुद्रमंथनातून अप्सरा हे रत्न निघाल्याचे सांगतात. यानंतर येणाऱ्या श्लोकांतून अप्सरांच्या सौंदर्याचे वर्णन येते. तसेच विश्वामित्रांच्या कथेनुसार अप्सरांना आपला प्रियकर म्हणून देव, दानव, मानव या सर्वांची निवड करण्याची मुभा होती. लग्नबंधनाच्या नीतिनियमांपासून त्या मुक्त होत्या या अर्थांचे श्लोकही बालकांडात येतात.
घृताचीम् अथ विश्वाचीम् मिश्रकेशीम् अलम्बुसाम् ।
नागदन्तां च हेमां च हिमामद्रिकृतस्थलाम् ॥ २-९१-१७
अयोध्याकांडातील या श्लोकांत भारद्वाज ऋषीने केलेल्या भरताच्या आदरसत्कारात घृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलम्बुसा, नागदंता, हेमा व हिमा या अप्सरांना पाचारण केल्याचा उल्लेख येतो. या सर्व नृत्य, गायन व वादन कलांत निपुण होत्या आणि त्यांनी भरत व अयोध्येच्या सेनेला रिझवण्यासाठी नृत्य-गायन केल्याचा उल्लेखही नंतरच्या श्लोकांतून येतो.
महाभारतातील अप्सरांचे संदर्भ
महाभारतात वनपर्वात अर्जुन व उर्वशीमधील संवाद येतो. उर्वशी ही कुरुवंशातील राजा पुरुरव्याची पत्नी असल्याने आणि अर्जुन हा पुरूरव्याचा वंशज असल्याने, कामातुर उर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर उर्वशी सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात. यामुळे मी जरी कुरुकुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरूरव्याची मुले-नातवंडे येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर."
अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो. तेव्हा संतप्त होऊन उर्वशी त्याला शाप देते. हा शाप पुढे बृहन्नडेच्या रूपाने खरा ठरतो.
याप्रमाणे अनुशासनपर्वात पंचचूडा या अप्सरेची व शांतिपर्वात घृताची या अप्सरेची कथा येते. घृताचीच्या कथेत अप्सरांना आपले रूप पालटण्याची विद्या अवगत असल्याचे दिसते.
इतर संस्कृतीतील अप्सरांचे संदर्भ
कंबोडियातील अप्सरा
कंबोडियाच्या संस्कृतीवर हिंदू आणि बौद्ध धर्माचा पगडा असल्याने हिंदू देव-देवता तसेच गंधर्व, अप्सरा यांना कंबोडियाच्या संस्कृतीत एक वेगळे स्थान मिळाले आहे.
आंग्कोर वाट अप्सरा
नृत्य व वादन करणाऱ्या अनेक अप्सरा आंग्कोर वाटच्या मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या आढळतात. मंदिरातील देव देवतांना प्रसन्न राखण्यासाठी अप्सरांचे कोरीव काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
अप्सरा नृत्य
ख्मेर राज्यकाळापासून कंबोडियात अप्सरा नृत्य करण्याची प्रथा आहे. पूर्वी मंदिरात देवतांना प्रसन्न करण्याकरता हे अभिजात नृत्य केले जात असे. आज या नृत्याला कंबोडियाच्या पारंपरिक नृत्याचा दर्जा आहे. बरेचदा हे नृत्य, नृत्यनाट्य म्हणून सादर केले जाते. यक्ष, किन्नर, अप्सरा, गरुड, ऋषी अशा अनेक भूमिका या नृत्यांतून फुलवल्या जातात.
रेशमी वस्त्रे, आभूषणे, नाजूक पदन्यास व नृत्यमुद्रांद्वारे केल्या जाणाऱ्या या नृत्यांत आंग्कोर वाटच्या मंदिरातील भिंतींवर कोरलेल्या अप्सरांचे दर्शन होते.
चीन मधील मोगाओ गुहा
चीनमधील दुनहुआंग प्रांतात इ.स.पूर्व ४००व्या शतकातील बौद्ध भिक्षूंनी कोरलेल्या गुहा आहेत. हिंदू कलाकुसरीचा या गुहांवर मोठा प्रभाव दिसतो. यातील काही चित्रांत व लेण्यात अप्सरांचा समावेश आहे. या अप्सरा स्वर्गस्थ दाखविल्या असून त्या अवकाशविहार करतानाही दिसतात. काही ठिकाणी नृत्य, वादन करतानाही त्यांचे चित्रण केले आहे.
चीनमधून पुढे कोरियातही अप्सरांचा कलाकुसर व चित्रकलेत समावेश झालेला आढळतो.
जपानमधील अप्सरा
तेन्यो नावाच्या स्वर्गीय सुंदरी स्वर्गात बुद्ध व बोधिसत्त्वांसमवेत राहात असल्याचे संदर्भ मिळतात. तेन्योंचा उगम संस्कृतातील अप्सरांवरून झाल्याचे सांगितले जाते. पुढे बौद्ध धर्माच्या प्रसारासमवेत चीनमार्गे जपानात यांचा प्रसार झाल्याचे दिसते. पारंपरिक पंचरंगी किमोनो, उंची आभूषणे ल्यालेल्या या सुंदरींना जपानी चित्रकला, बौद्ध मंदिरातील कोरीवकामांत व इतर कलाकुसरींमध्ये एक आगळे स्थान आहे आणि त्यांच्या अनेक कथा जपानात सांगितल्या जातात.
(अपूर्ण)