Jump to content

ऋषी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्यचेतनेच्या स्तरावर दृष्टि, श्रुति आणि विवेक कार्य करत असतात. म्हणजेच सत्याचे थेट दर्शन, सत्याचे थेट श्रवण, त्यातून काय योग्य काय अयोग्य यासंबंधी केला जाणारा विवेक या गोष्टी त्यांच्याकडे असतात. ज्याच्या ठिकाणी ही सत्यचेतना जागृत आहे आणि दृष्टि, श्रुति आणि विवेक हे कार्यरत आहेत त्याला 'ऋषि', 'कवि', 'द्रष्टा' असे म्हणतात. [] ज्यांना श्रुति ग्रंथ यथावत समजतो अशा लोकांना ऋषी म्हणतात. रामायण-महाभारतात आणि अन्य पुराण ग्रंथांत अनेक ऋषींची नावे आली आहेत.

ऋषींचे प्रकार

[संपादन]

ऋषींचे चढत्या क्रमाने सात प्रकार पडतात. राजर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी, परमर्षी. देवर्षी, महर्षी आणि ब्रह्मर्षी

काही प्रसिद्ध ऋषींची नावे

[संपादन]
  • अगस्ती
  • अंगिरस
  • अत्री - ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात यांची सूक्ते आहेत.
  • अथर्वण
  • अयास्य (ऋषी) - ऋग्वेदामध्ये (१०-१०८-८) अयास्य ऋषींचा उल्लेख येतो. []
  • कक्षीवान
  • कण्व
  • कश्यप
  • गौतम
  • जमदग्नी
  • धौम्य
  • नारदमुनी
  • प्रियमेध
  • भारद्वाज - ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलात यांची सूक्ते आहेत.
  • भृगू
  • मरीची
  • वसिष्ठ - ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात यांची सूक्ते आहेत. ऋग्वेदातील यांच्या सूक्तांमध्ये सहजता आहे.
  • वामदेव - ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलात यांची सूक्ते आहेत.
  • ल्मिकी
  • विश्वामित्र - ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलात यांची सूक्ते आहेत. त्यामध्ये सामर्थ्य आणि तेजस्विता दिसते.
  • मधुच्छंदस् - हे ऋषी विश्वामित्रांचे पुत्र होते. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील पहिली दहा सूक्ते यांची आहेत.
  • जेत्रि - हे ऋषी मधुच्छंदस् यांचे पुत्र होते. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील अकरावे सूक्त यांचे आहे. मधुच्छंदस् आणि जेत्रि यांच्या सूक्तांमधून एकूण वेदविचारातील सुसंगती चांगली स्पष्ट होते; म्हणून वेदांचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने ही सूक्ते महत्त्वाची आहेत असे श्रीअरविंद यांना वाटते.
  • शर्कर
  • साकमश्व
  • सांदीपनी
  • त्वष्टा
  • मेधातिथी कण्व - ऋग्वेदातील यांची सूक्ते स्वरमय आणि प्रवाही आहेत.
  • गृत्समद - ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात यांची सूक्ते आहेत. यांनी बृहस्पती-सूक्त लिहिले आहे. (वेद-रहस्य: पान १५९)
  • दीर्घतमस् औचथ्य - ऋग्वेदातील यांची सूक्ते खोल व गहन अर्थाची आहेत.[]
  • मुद्गल - या ऋषीची कथा महाभारतात आलेली आहे. ऋषी दुर्वास यांनी त्यांना सदेह स्वर्गलोकी जाण्याचा वर दिलेला असतो.
  • दुर्वास
  • घोर - कण्व ऋषींचे पिता
  • महाचमस्य - तैत्तरिय उपनिषदात महाचमस्य ऋषींनी चवथ्या व्याहृतीचा - महर् चा शोध लावला. (वेद-रहस्य: पान १६०)
  • नोध

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम