Jump to content

भारद्वाज ऋषी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऋषी भारद्वाज हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत. दंडकारण्याजवळ त्यांचा आश्रम होता. ते आयुर्वेदनिपुण होते.

मुद्‌गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथांत दिलेल्या कथांनुसार, अंगारक किंवा मंगळ हा ऋषी भारद्वाज यांचा पुत्र आहे.

चरक संहिता नुसार त्यांनी इंद्राकडून आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले होते. ब्रम्हदेव, बृहस्पति व इंद्रा नंतर ते चौथे व्याकरण प्रवक्ता होते. त्यांनी व्याकरण, आयुर्वेदासहित धनुर्वेद, राजनीतिशास्त्र, यंत्रसर्वस्व, अर्थशास्त्र, पुराण, शिक्षा इत्यादी विषयांवर आधारित अनेक ग्रंथ लिहिले.

ते शिक्षाशास्त्री, राजतंत्र मर्मज्ञ, अर्थशास्त्री, शस्त्रविद्या विशारद, आयुर्वेद विशारद, विधि वेत्ता, अभियांत्रिकी विशेषज्ञ, विज्ञान व्यक्ता व मंत्रद्रष्टा होते. भारद्वाज ऋषी हे विमान शास्त्रामध्ये निपुण होते, त्यांनी विमानाचे प्रकार जसे प्रवासी विमान, लश्करी विमान, अंतराळ यान वर्णन केले आहे.

सप्तर्षी
अत्रीभारद्वाजगौतमजमदग्नीकश्यपवसिष्ठविश्वामित्र