Jump to content

"यशवंतराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३५: ओळ १३५:
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
* यशवंतराव चव्हाण (म्युनिसिपल) मेमोरियल हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
* यशवंतराव चव्हाण (म्युनिसिपल) मेमोरियल हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
* यशवंतराव चव्हाणांचे पुतळे - कऱ्हाड, पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)





२३:०७, २४ जून २०१२ ची आवृत्ती

यशवंतराव बळवंतराव चव्हाण
चित्र:Y c chavan.jpg

कार्यकाळ
मे १, इ.स. १९६० – नोव्हेंबर १९, इ.स. १९६२
राज्यपाल श्रीप्रकाश
(१९५६–१९६२)
पी. सुब्बरायण
(१९६२)
पुढील मारोतराव कन्नमवार

कार्यकाळ
इ.स. १९७४ – इ.स. १९७७
पंतप्रधान इंदिरा गांधी
मागील सरदार स्वर्ण सिंह
पुढील अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ
इ.स. १९७१ – इ.स. १९७५
मागील इंदिरा गांधी
पुढील चिदंबरम सुब्रमण्यम

जन्म मार्च १२, इ.स. १९१३
कराड, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर २५, इ.स. १९८४
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय काँग्रेस
निवास कराड
गुरुकुल कराड
व्यवसाय राजनीतिज्ञ
धर्म हिंदू धर्म

यशवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी झेप घेतली. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी इ.स. १९१३ मध्ये जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी-निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) इ.स. १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.

इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .

- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठाची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)

- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

यशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांतली काही पुस्तके अशी :

  • यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
  • यशस्वी यशवंतराव (रा.द.गुरव)
  • यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
  • यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
  • यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (परमार रंजन)
  • आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
  • यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
  • Chavan,The Man of Crisis (B.B.Kala)
  • Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
  • Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
  • Man of Crisis (Baburao Kale)
  • YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
  • यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
  • सोनेरी पाने (भा.वि.गोगटे)
  • यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
  • घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
  • ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)
  • यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
  • मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के.पवार)
  • नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
  • कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
  • वादळ माथा (राम प्रधान)
  • यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
  • भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
  • यशवंतराव चव्हाण (प्रा.डॉ.कायंदे पाटील)

यशवंतरावांची ग्रंथसंपदा

  • आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
  • ॠणानुबंध (आत्मचरित्रपर लेख) (१९७५)
  • कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४)
  • भूमिका (१९७९)
  • महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
  • विदेश दर्शन - (यशवंतराव यांनी परदेशाहून सौ.वेणूताईंस पाठविलेल्या निवडक पत्रांचा संग्रह) (१९८८)

भाषण संग्रह/पुस्तिका

  • असे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख - १९६८)
  • उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
  • काँग्रेसच्या मागेच उभे राहा - औरंगाबाद येथील भाषण - पुस्तिका
  • कोकण विकासाची दिशा (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन - पुस्तिका -१९६०)
  • ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका - १९६१)
  • जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका - १९७३)
  • पत्र - संवाद (संपादक: स.मा.गर्गे - २००२)
  • पक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिका- पुस्तिका )
  • महाराष्ट्र- म्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका - १९६०)
  • महाराष्ट्राची धोरण सूची - (पुस्तिका - १९६०)
  • यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे - सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ - १९७१
  • युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह - १९७०)
  • लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)
  • वचनपूर्तीचे राजकारण - अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका - १९६९))
  • विचारधारा - (भाषण संग्रह - १९६०)
  • विदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) - (भाषण पुस्तिका - १९६०
  • शब्दाचे सामर्थ्य ( भाषणे - २०००; संपादक: राम प्रधान)
  • शिवनेरीच्या नौबती (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
  • सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२)
  • हवाएँ सह्याद्रिकी (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)
  • India's foreign Policy - १९७८
  • The Making of India's Foreign Policy - १९८०
  • Winds of Change - १९७३

चव्हाण नावाच्या संस्था

  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्‍नाथ भोसले रोड, मुंबई
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • यशवंतराव चव्हाण (म्युनिसिपल) मेमोरियल हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
  • यशवंतराव चव्हाणांचे पुतळे - कऱ्हाड, पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)


मागील
पद स्थापित
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मे १, इ.स. १९६० - नोव्हेंबर १९, इ.स. १९६२
पुढील
मारोतराव कन्नमवार
मागील
सरदार स्वर्ण सिंह
भारतीय परराष्ट्रमंत्री
इ.स. १९७४ - इ.स. १९७७
पुढील
अटलबिहारी वाजपेयी
मागील
इंदिरा गांधी
भारतीय अर्थमंत्री
इ.स. १९७१- इ.स. १९७५
पुढील
चिदंबरम सुब्रमण्यम