Jump to content

यू.एस. ओपन

Coordinates: 40°44′59.26″N 73°50′45.91″W / 40.7497944°N 73.8460861°W / 40.7497944; -73.8460861
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युएस ओपन (टेनिस) या पानावरून पुनर्निर्देशित)
यू.एस. ओपन
अधिकृत संकेतस्थळ
सुरुवात इ.स १८८१
स्थान न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क राज्य
Flag of the United States अमेरिका
स्थळ यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर
कोर्ट पृष्ठभाग हार्ड कोर्ट
बक्षीस रक्कम $ २,२०,६३,०००
पुरुष
ड्रॉ १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
सद्य विजेते ॲंडी मरे (एकेरी)
बॉब ब्रायन/माइक ब्रायन (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे रिचर्ड सीयर्स (७)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे रिचर्ड सीयर्स (६)
महिला
ड्रॉ १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
सद्य विजेत्या सेरेना विल्यम्स (एकेरी)
सारा एरानी/रॉबेर्ता व्हिंची (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे ख्रिस एव्हर्ट (६)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे मार्टिना नवरातिलोव्हा (९)
मिश्र दुहेरी
ड्रॉ ६४
सद्य विजेते इकॅटेरिना माकारोव्हा/ब्रुनो सोआरेस
ग्रँड स्लॅम
मागील स्पर्धा
२०१३ यू.एस. ओपन

यू.एस. ओपन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.

सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली ऱ्होड आयलंडच्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली फिलाडेल्फिया येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.

विजेते

[संपादन]

खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रासजिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सहा वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. महिला दुहेरीमध्ये मार्टिना नवरातिलोव्हाने यू.एस. ओपनचा चषक ९ वेळा उचलला आहे.

२०११ मधील विजेते

[संपादन]
स्पर्धा विजेता उप-विजेता स्कोर
पुरुष एकेरी सर्बिया नोव्हाक जोकोविच स्पेन रफायेल नदाल 6–2, 6–4, 6–7(3–7), 6–1
महिला एकेरी ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर अमेरिका सेरेना विल्यम्स 6–2, 6–3
पुरुष दुहेरी ऑस्ट्रिया युर्गन मेल्त्सर / जर्मनी फिलिप पेट्झश्नर पोलंड मारियुझ फ्रायस्टेनबर्ग / पोलंड मार्सिन मात्कोव्स्की 6–2, 6–2
महिला दुहेरी दक्षिण आफ्रिका लीझेल ह्युबर / अमेरिका लिसा रेमंड अमेरिका व्हानिया किंग / कझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हा 4–6, 7–6(7–5), 7–6(7–3)
मिश्र दुहेरी अमेरिका मेलनी ऊडिन / अमेरिका जॅक सॉक आर्जेन्टिना जिसेला डुल्को / आर्जेन्टिना एदुरादो श्वांक 7–6(7–4), 4–6, [10–8]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

40°44′59.26″N 73°50′45.91″W / 40.7497944°N 73.8460861°W / 40.7497944; -73.8460861

मागील
विंबल्डन
ग्रॅंड स्लॅम स्पर्धा
ऑगस्ट-सप्टेंबर
पुढील
ऑस्ट्रेलियन ओपन