Jump to content

मेलबर्न क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेलबोर्न क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
मेलबर्न क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान मेलबर्न, व्हिक्टोरिया
स्थापना इ.स. १८५४
आसनक्षमता १,००,०१८
मालक व्हिक्टोरिया सरकार

शेवटचा बदल
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

मेलबर्न क्रिकेट मैदान (इंग्लिश: Melbourne Cricket Ground, संक्षेपः MCG, एमसीजी) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील एक क्रिकेट मैदान आहे. १,००,१०८ इतकी आसनक्षमता असलेले एमसीजी हे ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठे तर जगातील आठव्या क्रमांकाचे मोठे क्रीडा संकुल (स्टेडियम) आहे. व्हिक्टोरिया बुशरेंजर्स हा ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट क्लब येथून खेळतो तसेच ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ देखील हे मैदान वापरतो.

एमसीजी १९५६ उन्हाळी ऑलिंपिक तसेच २००६ राष्ट्रकुल खेळांसाठीचे प्रमुख स्थान होते. तसेच १९९२ मधील क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना येथेच खेळवण्यात आला होता. क्रिकेट व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फुटबॉल, रग्बी लीग, रग्बी युनियन, फुटबॉल इत्यादी अनेक खेळांचे सामने येथे भरवले जातात.

चित्र दालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: