लॉस एंजेलस मेमोरिअल कोलेझियम
Appearance
(लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलेझियम या पानावरून पुनर्निर्देशित)
लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलेझियम | |
---|---|
कोलोझियमवरील अमेरिकन फुटबॉलचा एक सामना | |
स्थान | लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका |
उद्घाटन | १ मे इ.स. १९२३ |
पुनर्बांधणी | इ.स. २००५ |
आसन क्षमता | ९३,६०७ |
संकेतस्थळ | www.lacoliseumlive.com |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ १९३२ उन्हाळी ऑलिंपिक १९८४ उन्हाळी ऑलिंपिक |
लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलेझियम (इंग्लिश: Los Angeles Memorial Coliseum) हे अमेरिका देशाच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक स्टेडियम आहे. १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी वापरले गेलेले हे जगातील एकमेव स्टेडियम आहे.
हे स्टेडियम इ.स. १९२३ साली पहिल्या महायुद्धात बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले. १९३० साली ऑलिंपिकच्या २ वर्षे आधी ह्या स्टेडियमची क्षमता वाढवण्यात आली.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत