Jump to content

मॅन बुकर पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅन बूकर पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅन बुकर पुरस्कार
literary award
स्थापनाएप्रिल 1969 संपादन
मूळ लेबलBooker Prize संपादन
प्रायोजकCrankstart Foundation संपादन
याचे नावाने नामकरणBooker Group संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
प्रदाताBooker Prize Foundation संपादन
मुख्यालयाचे स्थानलंडन संपादन
समीक्षा गुण3.2 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://thebookerprizes.com/ संपादन
Related categoryCategory:Booker Prize–winning works संपादन
यादी आहेlist of winners and nominated authors of the Booker Prize संपादन

मॅन बुकर पुरस्कार किंवा बुकर पुरस्कार हा इंग्रजी भाषेतील कादंबरीला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे जी युनायटेड किंग्डम किंवा आयर्लंड येथे प्रकाशित झाली आहे. १९६९ मध्ये स्थापनेच्या वेळी हा फक्त राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशातील लेखकांना दिला जात असे; पण २०१४ पासून हा सर्व इंग्रजी कादंबऱ्यांना देण्यात येतो.[१][२] हे सर्वात प्रतिष्ठित साहित्यातील पुरस्कारांपैकी एक मानले जाते, आणि विजेत्याला £५०,००० दिले जाते, तसेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळते जी सामान्यतः कादंबरी व लेखकाच्या इतर कामांच्या विक्रीत लक्षणीय वाढ करते.

बुकर प्राइज फाउंडेशन दरवर्षी लेखक, प्रकाशक आणि पत्रकार तसेच राजकारणी, अभिनेता, कलाकार आणि संगीतकार असलेल्या पाच-सदस्यीय समितीची नेमणूक करते जी विजेत्या पुस्तकाची निवड करते.[३]

ही समिती आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, देखील देते जो अशा कादंबरींकरिता आहे ज्या इंग्रजीत भाषांतरित केलेल्या आहे आणि युनायटेड किंग्डम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झाल्या आहे. लघुकथा संकलने देखील आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी पात्र असतात. £५०,००० ची बक्षीस रक्कम विजेत्या पुस्तकाच्या लेखक आणि अनुवादकामध्ये समान प्रमाणात वाटली जाते.[४] तिसरा पुरस्कार, बाल साहित्याचा बुकर पुरस्कार, हा २०२५ मध्ये सुरू करण्यात आला, ज्याचा पहिला विजेता २०२७ मध्ये घोषित केला जाणार आहे.[५]

विजेते

[संपादन]
वर्षलेखकशीर्षकप्रकारदेशसंदर्भ
१९६९पी.एच. न्यूबीसमथिंग टू आन्सर फॉरकादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९७०बर्निस रुबेन्सद इलेक्टेड मेंबरकादंबरीवेल्स ध्वज वेल्स
१९७०
[a]
जे.जी. फॅरेलट्रबल्सकादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९७१व्ही.एस. नायपॉलइन अ फ्री स्टेटलघुकथाFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१९७२जॉन बर्जरजी.प्रायोगिक कादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९७३जे.जी. फॅरेलद सीज ऑफ कृष्णपूरकादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९७४
[b]
नेडिन गॉर्डिमरद कंझर्वेशनिस्टकादंबरीदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
स्टॅनली मिडलटनहॉलिडेकादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९७५रुथ प्रवर झाबवालाहीट अँड डस्टऐतिहासिक कादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
जर्मनी ध्वज जर्मनी
१९७६डेव्हिड स्टोरीसॅव्हिलकादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९७७पॉल मार्क स्कॉटस्टेइंग ऑनकादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९७८आयरिस मरडॉकद सी, द सीतत्त्वज्ञान कादंबरीआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
इंग्लंड ध्वज इंग्लंड
१९७९पेनेलोप फिट्झगेराल्डऑफशोरकादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९८०विल्यम गोल्डिंगराइट्स ऑफ पॅसेजकादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९८१सलमान रश्दीमिडनाइट्स चिल्ड्रनअद्भूतकथाइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९८२थॉमस केनीलीशिंडलर्स आर्कचरित्र कादंबरीऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९८३जे.एम. कोएत्झीलाइफ अँड टाइम्स ऑफ मायकेल केकादंबरीदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
१९८४अनिता ब्रुकनरहोटेल दु लॅककादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड
१९८५ केरी हुल्मे द बोन पीपल रहस्यकथा न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
१९८६ किंग्सले एमिस द ओल्ड डेव्हिल्स विनोदी कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९८७ पेनेलोपी लाइव्हली मून टायगर कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९८८ पीटर केरी ऑस्कर अँड लुसिंडा कादंबरी ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९८९ काझुओ इशिगुरो द रिमेन्स ऑफ द डे ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९० ए.एस. बायट पझेशन ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९१ बेन ओक्री द फॅमिश्ड रोड अद्भूतकथा नायजेरिया ध्वज नायजेरिया
१९९२
[b]
मायकेल ओंडाची द इंग्लिश पेशंट ऐतिहासिक वर्णनात्मक कथा कॅनडा ध्वज कॅनडा
बॅरी अन्सवर्थ सेक्रेड हंगर ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९३ रॉडी डॉयल पॅडी क्लार्क हा हा हा कादंबरी आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९९४ जेम्स केल्मन हाऊ लेट इट वॉज, हाऊ लेट वर्णनात्मक Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९५ पॅट बार्कर द घोस्ट रोड युद्ध कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९६ ग्रॅहाम स्विफ्ट लास्ट ऑर्डर्स कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९७ अरुंधती रॉय द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज कादंबरी भारत ध्वज भारत
१९९८ इयान मॅकईवान ॲम्स्टरडॅम कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९९ जे.एम. कोएत्झी डिसग्रेस कादंबरी दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
२००० मार्गारेट अ‍ॅटवुड द ब्लाइंड असॅसिन ऐतिहासिक कादंबरी कॅनडा ध्वज कॅनडा
२००१ पीटर केरी ट्रू हिस्ट्री ऑफ द केली गँग ऐतिहासिक कादंबरी ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
२००२ यान मार्टेल लाइफ ऑफ पाय साहसकथा कॅनडा ध्वज कॅनडा
२००३ डीबीसी पिएर व्हरनॉन गॉड लिटल मार्मिक विनोद ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
मेक्सिको ध्वज मेक्सिको
२००४ॲलन हॉलिंगहर्स्टद लाइन ऑफ ब्युटीऐतिहासिक कादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२००५जॉन बॅनव्हिलद सीकादंबरीआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
२००६किरण देसाईद इनहेरिटन्स ऑफ लॉसकादंबरीभारत ध्वज भारत
२००७ॲन एनराइटद गॅदरिंगकादंबरीआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
२००८अरविंद अडिगाद व्हाइट टायगरकादंबरीभारत ध्वज भारत
२००९हिलरी मॅन्टेलवुल्फ हॉलऐतिहासिक कादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०१०हॉवर्ड जेकबसनद फिंकलर क्वेश्चनविनोदी कादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०११ज्युलियन बार्न्सद सेन्स ऑफ ॲन एंडिंगकादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०१२हिलरी मॅन्टेलब्रिंग अप द बॉडीजऐतिहासिक कादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०१३एलीनोर कॅटनद ल्युमिनरीझऐतिहासिक कादंबरीन्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
२०१४रिचर्ड फ्लानागनद नॅरो रोड टू द डीप नॉर्थऐतिहासिक कादंबरीऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
२०१५मार्लन जेम्सए ब्रीफ हिस्ट्री ऑफ सेव्हन किलिंग्सऐतिहासिक/प्रायोगिक कादंबरीजमैका ध्वज जमैका
२०१६पॉल बिट्टीद सेलआउटउपहासात्मक कादंबरीFlag of the United States अमेरिका
२०१७जॉर्ज सॉंडर्सलिंकन इन द बार्डोऐतिहासिक/प्रायोगिक कादंबरीFlag of the United States अमेरिका
२०१८ॲना बर्न्समिल्कमनकादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०१९
[b]
मार्गारेट अ‍ॅटवुडद टेस्टामेंट्सकादंबरीकॅनडा ध्वज कॅनडा
बर्नार्डिन एव्हारिस्टोगर्ल, वुमन, अदरप्रायोगिक कादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०२०डग्लस स्टुअर्टशुग्गी बेनकादंबरीFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
Flag of the United States अमेरिका
२०२१डॅमन गालगुटद प्रॉमिसकादंबरीदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
२०२२शेहान करुणातिलकद सेव्हन मूनस ऑफ माली आल्मेडाकादंबरीश्रीलंका ध्वज श्रीलंका
२०२३पॉल लिंचप्रॉफेट साँगडिस्टोपियन कादंबरीआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड[६]
२०२४समांथा हार्वेऑर्बिटलकादंबरीइंग्लंड ध्वज इंग्लंड[७]
२०२५डेव्हिड सोलॉयफ्लेशकादंबरीहंगेरी ध्वज हंगेरी[८]
  1. ↑ नंतर जाहीर केला गेला.
    १९७१ मध्ये, या बक्षिसाचे नियम बदलण्यात आले व त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांना बक्षिस देण्याचे ठरले, मागच्या वर्षीच्या कादंबऱ्यांना नाही. परिणामी, १९७० मध्ये प्रकाशित झालेली कोणतीही कादंबरी बुकर पुरस्कार जिंकू शकत नव्हती. हा २०१० मध्ये "लॉस्ट मॅन बुकर पुरस्कार" जे.जी. फॅरेल यांच्या ट्रबल्स कादंबरीला देऊन दुरुस्ती केली गेली.
  2. 1 2 3 विभागून देण्यात आला.


संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "'A surprise and a risk': Reaction to Booker Prize upheaval". BBC News. 18 September 2013. 19 September 2013 रोजी पाहिले.
  2. ↑ Sutherland, John (9 October 2008). "The Booker's Big Bang". New Statesman. 27 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2024 रोजी पाहिले.
  3. ↑ "The Booker Prize | The Booker Prizes". thebookerprizes.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-24 रोजी पाहिले.
  4. ↑ "The Booker Prizes". Booker Prize Foundation.
  5. ↑ Saunders, Emma (24 October 2025). "Booker Prize launches new award for children's fiction including young judges". BBC News.
  6. ↑ Allardice, Lisa (2023-11-27). "'This is a wake-up call': Booker winner Paul Lynch on his novel about a fascist Ireland". The Guardian (इंग्रजी भाषेत). ISSN 0261-3077. 2024-02-06 रोजी पाहिले. Lynch, now 46,...
  7. ↑ Creamer, Ella (12 November 2024). "Samantha Harvey's 'beautiful and ambitious' Orbital wins Booker prize". The Guardian. 12 November 2024 रोजी पाहिले.
  8. ↑ "David Szalay: अंतर्मुखतेचा भाष्यकार". 6 जानेवारी 2026 रोजी पाहिले.