Jump to content

ज्युलियन बार्न्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्युलियन बार्न्स
जन्म नाव ज्युलियन बार्न्स
जन्म १९ जानेवारी १९४६
लिसेस्टर, इंग्लंड
मृत्यू हयात
साहित्य प्रकार कथा
कादंबरी
पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार

ज्युलियन बार्न्स (१९ जानेवारी १९४६ -अज्ञात) हे इंग्रजी भाषेतील लेखक, कादंबरीकार आहेत.

बालपण आणि शिक्षण

[संपादन]

बार्न्स यांचे आई-वडिल फ्रेंच भाषेचे शिक्षक होते. लिसेस्टर इथे बार्न्स यांचा जन्म झाला. त्यानंतर सहा महिन्यांतच त्यांनी शहर बदललं, तरीही ज्युलियन यांच्या मनात लिसेस्टर कायम राहिलं. लिसेस्टर फुटबॉल क्लबचे ते खंदे पाठीराखे होते. सिटी ऑफ लंडन स्कूलमध्ये ते शिकले आणि उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत गेले.

लेखन

[संपादन]

ते लहान असताना त्यांची आई त्याचे खूप कौतुक करायची. हीच आई त्यांची 'मेट्रोलॅण्ड' (१९८०) ही पहिली कादंबरी वाचून 'काय घाण लिहिलंयस! शिसारी येते' म्हणत त्यांच्यावर तुटून पडली होती. पौगंडावस्थेत बार्न्स मिडलसेक्सच्या नॉर्थवुडमध्ये राहिले होते. तेव्हाच्या जगण्याचं प्रतिबिंब या कादंबरीत पडलं होतं. बार्न्स यांच्या 'फ्लॉबेर्स पॅरोट' (१९८४), 'इंग्लंड इंग्लंड' (१९९८) आणि 'आर्थर ॲण्ड जॉर्ज' (२००५) या तीन कादंबऱ्यांना मॅन बुकरसाठी नामांकन मिळाले होतं. 'फ्लॉबेर्स पॅरोट' पासून त्यांनी बहुरेषीय आणि पात्रांची चरित्रं विखंडित स्वरूपात मांडणारी कथनशैली वापरायला सुरुवात केली. भाषाशास्त्राचे पदवीधर असलेल्या बार्न्सनी ऑक्सफर्ड डिक्शनरीसाठी शब्दकोशकार म्हणून काम केलं आणि त्यानंतर न्यू स्टेटस्मन आणि न्यू रिव्ह्यू ह्या नियतकालिकांत पत्रकारिताही केली. डॉन कॅवनॉफ या टोपणनावाने क्राइम फिक्शन लिहिलं. उत्तर आधुनिक युरोपियन लेखकांप्रमाणे त्यांनी पल्प फिक्शनचे घाट कादंबऱ्यांत वापरले. 'फ्लॉबेर्स पॅरोट' आणि 'आर्थर ॲण्ड जॉर्ज' या त्यांच्या कादंबऱ्या तर गुस्ताव फ्लॉबेर आणि आर्थर कॉनन डायल या लेखकांवरच बेतलेल्या आहेत.

ज्युलियन बार्न्स आज ६५ वर्षांचे आहेत. १० कादंबऱ्या, ३ कथासंग्रह आणि ३ वृत्तपत्रीय लेखनाचे संग्रह असा लेखकीय ऐवज त्यांच्या गाठीशी आहे. ३० भाषांतून त्यांचं साहित्य अनुवादित झालंय. तरीही फ्रान्समध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत.

पुरस्कार

[संपादन]

ज्युलियन बार्न्स यांच्या 'फ्लॉबेर्स पॅरोट' या कादंबरीला फ्रान्समधला प्री मेडिसिस हा मोठा पुरस्कार मिळाला तर 'टेकिंग इट ओव्हर' या कादंबरीला प्री फेमिना पुरस्कार मिळालाय.

२०११ मध्ये त्यांना मॅन बुकर पुरस्कार 'सेन्स ऑफ ॲन एंडिंग' या त्यांच्या लघु कादंबरीने यंदा मिळवला.

वैयक्तिक

[संपादन]

त्यांची पत्नी हीमेंदूच्य विकाराने २० ऑक्टोबर २००८ रोजी वारली. तेव्हा पासून ते लंडन मध्ये राहतात.

Bibliography

[संपादन]

कादंबरी लेखन

[संपादन]

Collections and Non-Fiction

[संपादन]
  • Letters from London (Picador, London, 1995) – journalism from The New Yorker, ISBN 0-330-34116-2
  • Cross Channel (1996) – stories
  • Something to Declare (2002) – essays
  • The Pedant in the Kitchen (2003) – journalism on cooking
  • The Lemon Table (2004) – stories
  • Nothing to Be Frightened Of (2008) – memoir
  • Pulse (2011) – stories

Works as Dan Kavanagh

[संपादन]
  • Duffy (1980)
  • Fiddle City (1981)
  • Putting the Boot In (1985)
  • Going to the Dogs (1987)

बार्न्स विषयी लेखन

[संपादन]
  • Peter Childs, Julian Barnes (Contemporary British Novelists), Manchester University Press (2011)
  • Sebastian Groes & Peter Childs, eds. Julian Barnes (Contemporary Critical Perspectives), Continuum (2011)
  • Vanessa Guignery & Ryan Roberts, eds. Conversations with Julian Barnes, University Press of Mississippi (2009)
  • Vanessa Guignery, The Fiction of Julian Barnes: A Reader's Guide to Essential Criticism, Palgrave Macmillan (2006)
  • Matthew Pateman, Julian Barnes: Writers and Their Work, Northcote House, (2002)
  • Bruce Sesto, Language, History, And Metanarrative In the Fiction of Julian Barnes, Peter Lang (2001)
  • Merritt Moseley, Understanding Julian Barnes, University of South Carolina Press (1997)

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे(इंग्रजी)

[संपादन]

संदर्भ (इंग्रजी)

[संपादन]
  • a b c d e f g h i Summerscale, Kate (1 March 2008). "Julian Barnes: Life as he knows it". Telegraph. Retrieved 10 August 2011.
  • Interviewed by Shusha Guppy. "The Art of Fiction No. 165, Julian Barnes". Paris Review. Retrieved 10 August 2011.
  • a b Interviewed by Denis Campbell. "My Team: Julian Barnes on Leicester City F.C.". The Observer. Retrieved 22 October 2011.
  • a b c d e "Julian Barnes Website: Biography of Julian Barnes". Julianbarnes.com. Retrieved 10 August 2011.
  • Simon, O'Hagan (1 December 2002). "Julian Barnes: I may not like it much. But I still live here". The Independent. Retrieved 17 September 2011.
  • Ellwood, Pip (14 August 2011). "Julian Barnes – The Sense Of An Ending". Entertainment Focus. Retrieved 18 October 2011.
  • a b Masters, Tim (18 October 2011). "Man Booker Prize won by Julian Barnes at fourth attempt". BBC News (BBC). Retrieved 18 October 2011.
  • Singh, Anita (18 October 2011). "Julian Barnes wins the 2011 Man Booker Prize". The Daily Telegraph (Telegraph Media Group). Retrieved 18 October 2011.
  • Polak, Richard. "Fourth time a fitting ending: Julian Barnes wins the Booker". Daiy Maverick.