रुथ प्रवर झाबवाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुथ प्रवर झाबवाला ह्या जन्माने जर्मन असलेल्या आणि भारतीय पारशी सायरस झाबवाला यांच्याशी विवाह करून भारतीय बनलेल्या लेखिका होत्या. विख्यात ब्रिटिश लेखक ई.एम. फॉस्टर यांच्या कादंबऱ्यांवर आधारित अ रूम विथ अ व्ह्यू आणि हॉवर्डस एंड; या दोन चित्रपटांच्या पटकथा लेखनासाठी रुथ यांना दोन वेळा अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या हीट अँड डस्ट या कादंबरीला प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कारही देण्यात आला. नवी दिल्लीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचा २५ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला. सन २०११ मध्ये त्यांनी भारताविषयी लिहिलेले अ लव्हसॉंग फॉर इंडिया हे लघुकथांचे पुस्तक गाजले.